Skip to content
Home » Tips Information in Marathi » Penguin Information in Marathi | Penguin Bird Mahiti, Nibandh

Penguin Information in Marathi | Penguin Bird Mahiti, Nibandh

penguin marathi

Penguin Information in Marathi

Penguin पेंग्विन माहिती

  • जगाच्या दक्षिण गोलार्धात असलेले हे मजेदार पक्षी सगळ्यांचे आवडते आहेत. ह्यांना उडणारे पक्षी म्हणण्यापेक्षा चालणारे आणि पोहणारे पक्षी म्हणणे जास्त बरोबर होईल.
  • काळा कोट घातलेल्या लठ्ठ वकीलासारखे त्यांचे डुलत चालणे पहिले की गम्मत वाटते. ‘पिंकू’ किवा ‘हैप्पी फीट’ असे सिनेमा त्यामुळेच मुलांना खूप आवडतात. मात्र त्यांच्यापासून तीन फुटावरच लांब रहा. हा, जर ते स्वत: हात मिळवायला आले तर जरूर करा.

कडाक्याच्या थंडीतील मजेदार रहिवासी :

  • पेंग्विन प्राणी जगातील स्टेफीसीडी वर्गात, स्टेफीसिफोर्म्स ह्या क्लास मध्ये मोडतात. त्यांना अक्वेटिक फ्लाईटलेस बर्डस म्हणजे पाण्यातील न उडणारे पक्षी असे म्हणतात. ते मुख्यत्वेकरून दक्षिण गोलार्धात अन्तार्तिका भागात असतात. टेम्परेट झोन मध्येही आढळतात. एकच जात ‘गालापागोस पेंग्विन’ हे उत्तर विषुववृत्तावर आढळतात.
  • पेंग्विन च्या जाती म्हणजे एम्परर पेंग्विन, किंग पेंग्विन,अडेल क्रस्तेड ,रॉयल, लिटिल ब्लू पेंग्विन ह्या आहेत. त्यांच्या रूबाबावरूनच पडली असावी बहुतेक.
  • एम्परर पेंग्विन साधारण २० वर्षे जगतात. त्यांचे वजन ३५ किलो असते. आणि ते १.१ मीटर उंच असतात. लिटिल ब्लू पेंग्विन १६ किलो वजनाचे आणि ३० ते ३३ सेमी. उंचीचे असतात.
  • पेंग्विन ची पिसे त्याला पोहताना कामाफ्लेज करायला मदत करतात. म्हणजे पोटाचा पांढरा भाग पाण्यात पारदर्शक दिसून खालील भक्षकाला कळत नाही आणि वरच्या काळ्या कोटा ने पाण्यात मिसळून जाऊन वरून भक्षकाला काळात नाही. काळ्या पांढर्‍या विरुद्ध रंग संगती मुळे ते पाण्यात लपून जाऊ शकतात.
  • परंतु काही पेंग्विन ला माने भोवती पिसारा असतो त्याला क्रस्त असे म्हणतात. कांही पेंग्विन ची मान पिवळी असते. चोची लाल असतात. पेंग्विन जमिनीवर अर्धे आयुष्य घालवतो आणि अर्धे पाण्यात. जमिनीवर तो दोन पायांनी डुलत चालतो नाहीतर पोटावर घसरत पायांनी वेग देत घसरगुंडी करतो. त्याला तोनोगागिंग म्हणतात. खडकाळ भागात ते उड्या मारीत जातात. पेंग्विन सागरी लहान प्राणी जसे स्क्विड, क्रिल वगैरे खातात.
  • ते नेहमी मोठ्या कळपाने राहतात. आणि उभेच असतात. जवळ जवळ १०० जोड्या मुला बाळांसहित राहतात. तेंव्हा कळपात आपली आईवडीलांना ओळखू यावे म्हणून ते वेगळा आवाज काढतात. पंखांच्या खाली ब्लबर [चरबी] चा जाड थर असतो त्यामुळे उष्णता मिळत राहते. पेंग्विन रक्ताभिसरण कंट्रोल करतात ज्यायोगे ते कमी व्हावे पण अगदी गोठून जाऊ नये. कळपामध्ये मादी शिकार करते आणि नर एकमेकांना चिकटून उष्णता कायम ठेवतात. आणि ह्यामध्ये पाळ्या ठरवून प्रत्येकाला उष्णता मिळेल असे बघतात. पुढच्या पंखांना रोहिण्यांच्या ३ शाखा असतात. त्यामुळे थंड रक्त बदलत राहते. आता कळले न इतक्या भयानक थंडी मध्ये पेंग्विन कसे राहू शकतात.? पेंग्विन खारे पाणी पिऊ शकतो. त्यांच्या सुप्राओर्बितल ग्लांड मुळे मीठ गाळून ते नाका वाटे निघून जाते.
  • इसाबेल पेंग्विन नावाची जी जात आहे त्यात आता फक्त ५०,००० पेंग्विन शिल्लक आहेत. त्यांचे राहण्याचे ठिकाण अंतर्गत सागरी [करंत] झरे ह्यांच्यावर अवलंबून असतात. ते सहसा अंगोला, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका येथे आढळतात. दक्षिण अमेरिकेतली पेंग्विन बीळ करून त्यात राहतात.

जबाबदार पिता :

  • पेंग्विन हिवाळ्यात अंडी घालतात. पेंग्विन दायमोर्फिक म्हणजे नर आणि मादी सारखेच दिसतात. त्यामुळे खूप गम्मत उडते. पेंग्विन मादीला आकर्षित करण्यासाठी गाणे गातात किंवा एखादा गुळगुळीत दगड भेट देतात. जर चुकून मादी ऐवजी नरालाच भेट दिली तर थप्पड बसते.
  • अंडी ६० ते ६५ दिवसात उबतात. नर पेंग्विन अंगावर खूप फर असल्याने अंडी आपल्या पायांमध्ये ठेवून सगळ्या शरीराची उष्णता देऊन उबवतो. त्यासाठी तो ६५ दिवस उभाच राहतो. खरच किती कमाल आहे न?
  • मादी शिकार आणते. पिल्लू बाहेर आल्यावर मादी पिल्लाची काळजी घेते. चुकून पिल्लू मेले तर आई दुसर्‍या मादी चे पिल्लू पळवते. अर्थात ती मादी इतर माद्यांच्या सहायाने तिला पळवून पण लावते. आणि नर शिकार करून आणतो. चीक [पिल्लू] वाढायला लागल्यावर आई वडील त्याला कळपात सोडतात म्हणजे त्याला शिकार करणे, कळपात राहणे शिकायला मिळते.
  • संपूर्ण जीवन पद्धतीमध्ये पेंग्विन चे एकदाच पंख झडतात. त्याला कातास्फोरिक मोल्त म्हणतात.

Information of Penguin in Marathi Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *