owl bird marathi information

Owl Information in Marathi, Wikipedia Night Bird Owl Essay घुबड माहिती

Owl Information in Marathi

Ghubad घुबड माहिती

  • घुबड हा शिकारी प्राणी असून निशाचर आहे सहसा एकटा आढळतो.
  • घुबडांच्या जगभरात जवळपास २०० जाती आहेत. सर्वात घोटे घुबड एल्फ आऊल आहे ज्याची उंची ५ ते ६ इंच असते आणि सर्वात उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल आहे ज्याची उंची ३२ इंचपर्यंत असू शकते.
  • घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूब सारखी असते ज्यामुळे ते एखाद्या दुर्बिणीप्रमाणे दूरपर्यंत बघू शकतात. मोठ्या डोळ्यांमुळे ते रात्री सुद्धा स्पष्ट बघू शकतात परंतु जवळचे मात्र त्यांना धूसर दिसते.
  • घुबड डोळे हलवू शकत नाहीत म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता पूर्ण डोके हलवितात. घुबडाच्या मानेत चौदा मणके असतात ज्यामुळे घुबड त्याची मान २७० अंशामध्ये फिरवू शकतो.
  • घुबडाला तीन पापण्या असतात त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते.
  • घुबडांची ऐकण्याची क्षमता सुद्धा अतिशय उत्तम असते. काही घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात ज्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरक सुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो. घुबडाच्या चेहऱ्याभोवती असलेली पिसे सुद्धा घुबडाला ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात.
  • घुबडाच्या पंखावरील पिसांची रचना अशी असते की उडताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही.
  • काही घुबड त्यांच्या पेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. बार्न आऊल त्याची शिकार अख्खी गिळतो आणि वर्षभरात सुमारे १००० उंदीर खातो.
  • उंदीर हे घुबडांचे आवडते खाद्य असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र हि समजले जाते.
  • घुबडाचा चेहरा गोल, चपटा असतो आणि त्याची चोच लहान असली तरी खूप शक्तिशाली असते.
  • घुबड सर्वात पहिले मोठ्या आणि शक्तिशाली पिल्लाला अन्न पुरवतो आणि लहान व कमजोर पिल्लांना शेवटी. पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपासच्या झाडावर राहायला जातात तिथेही काहीवेळा पालक अन्न पुरवतात.
  • दिवसा घुबड आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे स्वतःला बदलतात आणि आराम करतात. घुबड स्वतःच्या बचावासाठी खूप भयावह असे आवाज काढतात.
  • घुबडाच्या पायाला पुढे दोन व मागे दोन धारधार नख्या असतात ज्यामुळे शिकार जखडून ठेवण्यास मदत होते.
  • मादा घुबड नरापेक्षा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते. मादा जास्त आकर्षक रंगाची असते व तिचा आवाजही नर घुबडापेक्षा मोठा असतो आणि एक मैलापर्यंत ऐकता येऊ शकतो.

Composition Information of Owl in Marathi / Few Lines

1 thought on “Owl Information in Marathi, Wikipedia Night Bird Owl Essay घुबड माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *