inspirational status in marathi

Inspirational Quotes in Marathi | प्रेरणादायी वचने / सुविचार

Marathi Motivational Quotes and Thoughts

प्रथम एक संस्कृत श्लोक बघूया. यातून जी प्रेरणा मिळते ती कुठेच मिळत नाही.

आशा नाम मनुष्याणां काश्चिदाश्चर्यशृङ्खला ।
यया बद्धाःप्रधावन्ति मुक्तास् तिष्ठन्ति कुत्रचित् ॥

प्रेरणादायी वचने

  • महान लोक हेतू बाळगतात, लहान लोक फक्त इच्छा करतात.
  • यशाच्या समीकरणात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सतत कार्य करीत राहणे.
  • आशेला अदृश्य ते दिसते, अस्पष्ट ते जाणवते आणि अशक्य ते मिळविता येते.
  • तुमची स्वप्न सत्यात यावी असे वाटत असेल तर आधी जागे व्हा.
  • इतरांना प्रेरणा देण्यापूर्वी स्वत:ला प्रेरणा द्या.
  • ज्याची स्पर्धा स्वत:शीच असते त्याला जिंकणारा कोण?
  • संयम ही यशाची गुरूकिल्ली आहे.
  • ज्यांचा विजयावर विश्वास असतो तेच जिंकतात.
  • उदात्त गोष्टींची कल्पना करीत न बसता त्यांना मूर्त स्वरूप द्या.
  • एकाच वेळी सर्व चांगल्या गोष्टी करण्यासाठी जो थांबलेला असतो तो काहीच करू शकत नाही.
  • जग काय म्हणेल ह्याचा विचार करू नका, कारण अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
  • दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त रहा.
  • पक्षी आकाशात हिंडत असताना प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंत:करणातून आणि जिद्दीने शोधावी लागते. त्याच प्रमाणे सुंदर जीवनाचा मार्ग ज्याचा त्यालाच शोधावा लागतो.
  • रस्त्यावर वेग मर्यादा, बँकेमध्ये पैशाची मर्यादा, परीक्षेत वेळेची मर्यादा, इमारतीला उंचीची मर्यादा पण चांगले विचार करायला कुठलीच मर्यादा नसते. सकारात्मक विचारांची उंची गाठा आणि निश्चित ध्येय गाठा.
  • काळे ढगच पाऊस पडतात तसेच वाईट दिवसच चांगले आनंदी दिवस घेऊन येतील. तुम्ही किती ताकदवान आहात हे तुम्ही ताकदवान व्हायचे आहे हे ठरवल्याशिवाय कळणार नाही.
  • राग ही अशी अवस्था आहे जिच्यात जीभ मनापेक्षा जलद काम करते आणि हास्य ही कृती अशी आहे जी सगळ्या गोष्टी जलद करते, फक्त जि‍भेशिवाय. तेंव्हा नेहमी हसतमुख रहा.
  • असे नाही की शक्तिमान प्रजाति टिकतात किंवा हुशार प्रजाति टिकतात हे ही नाही. तर फक्त ज्या प्रजाति बदलाला सामोरे जातात त्याच टिकतात.-चार्ल्स डार्विन.
  • कांही लोक तुमची प्रशंसा करतील. काही लोक तुमच्यावर टीका करतील. दोन्हीकडून फायदा तुमचाच आहे. कारण एक तुम्हाला उत्तेजन देतील तर दुसरे तुमच्यात सुधारणा घडवून आणतील. सकारात्मक रहा.
  • आरसा फुटला तरी प्रतिबिंब दाखविणे सोडत नाही. तेंव्हा कधीही आपला मूळ चांगला स्वभाव बदलू नका.
  • आपली ओळख अशी ठेवा की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तुम्हाला सोडून जाणे नुकसान दायक होईल.
  • आजच्या दिवसाची चांगली गोष्ट ही आहे की आपल्याकडे कालच्यापेक्षा चांगले करण्याचा पर्याय मिळतो.
  • जेंव्हा वेळ कुणासाठी थांबत नाही तेंव्हा आपण योग्य वेळेची वाट बघत कशाला थांबायचे? योग्य गोष्ट करण्यास कुठलीच अयोग्य वेळ नसते.
  • आपण जे खातो ते पचवून चोवीस तासात काढून टाकतो, आपण पाणी पितो आणि चार तासात शरीर ते बाहेर फेकते, आपण जी हवा घेतो, ती एक मिनिटात बाहेर टाकतो. मग नकारात्मक विचारांना का आपण महिनोन महिने थारा देतो?
  • उतार चढाव हे आयुष्यात खूप महत्वाचे असतात. कारण सरळ रेषेचा ECG म्हणजे जीवनाचा अंत.
  • उकळते पाणी अंड्याला टणक बनवते आणि तेच बटाट्याला मऊ. हे तुम्ही परिस्थितीला कुठली प्रतिक्रिया देतात यावर अवलंबून आहे.

Positive Inspirational Thoughts in Marathi Language PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *