Skip to content

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी सुविचार

marathi thoughts on success

Motivational Quotes in Marathi for Success

प्रथम एक संस्कृत श्लोक बघूया. यातून जी प्रेरणा मिळते ती कुठेच मिळत नाही.

आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाति पंगुवत |

आशा हि एक अशी आश्चर्यकारक बेडी आहे की, जो तिच्यात बद्ध आहे तो धावत सुटतो आणि जो तिच्यापासून मुक्त आहे तो पांगळ्या सारखा एका जागी उभा राहतो. तेंव्हा कुठलीही परिस्थिती आली तरी आशा सोडू नका.

 • जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय. – व्हीनस लोम्बर्दी.
 • सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश. – फ्रांक सिनात्रा.
 • एखाद्या माणसाने कुठलीच चूक केली नाही याचा अर्थ त्याने काहीच प्रयत्न केले नाही. – अल्बर्ट आइंस्टाईन
 • मी परीक्षा नापास नाही झालो तर मला चुकीच्या रीतीने परीक्षा देण्याचे १०० मार्ग मिळाले. – बेंजामिन फ्रेंकलिन
 • जोपर्यंत तुम्ही चालत आहात तोपर्यंत तुम्ही किती हळू चालता ह्याला महत्व नाही. – कन्फुशीयस
 • एक वर्ष म्हणजे ३६५ संधी.
 • स्वत:ला पहा. बाकीच्यांना ते त्यांचे बघतील. – ऑस्कर वाईल्ड
 • चुका शोधू नका, उपाय शोधा. – हेनरी फोर्ड
 • सुरकुत्या म्हणजे तुम्ही हसलात, पांढरे केस म्हणजे तुम्ही काळजी घेतलीत आणि जखमा म्हणजे तुम्ही जगलात.
 • लक्षात ठेवा १ पुस्तक, १ पेन, १ मुल, आणि १ शिक्षक असेल तर ते जग बदलू शकतात. – मलाला युसुफझाई
 • तुमच्या आयुष्याच्या प्रवासात हि खात्री करा की, तुमच्या चरित्रात एक तरी प्रकरण असामान्य आहे.
 • यश हे कधीतरी काहीतरी करून मिळत नाही तर सतत काहीतरी करून मिळते.
 • जर लढताना विश्वासाने लढलात तर याचा अर्थ तुमच्याकडे दुप्पट चिलखत आहे. – प्लेटो
 • काल संपला, उद्या अजून येणार आहे, आपल्याकडे फक्त आज आहे, चला सुरुवात करूया.[चांगल्या कामांची] – मदर टेरेसा
 • विश्वाची सगळी शक्ती आपल्या हातात असते, पण आपणच डोळ्यापुढे हात धरून अंधार झाला म्हणून रडतो. – स्वामी विवेकानंद
 • माणसाला अडचणींची गरज असते, कारण ते त्याचे यश अनुभवायला जरुरीचे असते. – अब्दुल कलाम.
 • सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळा. – अब्दुल कलाम.
 • तुमच्यावर फेकलेले दगड उचला, त्याचा स्मारकासाठी उपयोग करा. – रतन टाटा.
 • सगळ्यात मोठी गुंतवणूक हि तुमच्या स्वत:मध्ये केलेली ही होय. – वॉरन बफे.
 • केवळ माझा मार्ग वेगळा आहे ह्याचा अर्थ मी हरवलो आहे, असा होत नाही.
 • कौशल्य आणि आत्मविश्वास हे कधीही न जिंकले जाणारे सैन्य आहे. – जॉर्ज हरबर्ट.
 • मी माझ्या यशाचे श्रेय ह्या दोन गोष्टींना देते, मी कारणे सांगितली नाही आणि ऐकली नाही. – फ्लोरेंस नाइटिंगल
 • जर प्लान A फिसकटला तर अजून 25 अक्षरे आहेत की. – ख्रिस गालीब्यू
 • जर तुम्ही खरोखर ज्या कुठल्या गोष्टीबद्दल काळजी करता त्यावर काम करीत असाल तर, तुम्हाला प्रोत्साहनाची गरज नाही, ती दृष्टीच तुम्हाला तिकडे ओढेल. – स्टीव्ह जॉब्स
 • जर लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर त्याला मैलाचे दगड करणे तुमच्या हाती आहे. – सचिन तेंडूलकर
 • स्वप्न बघा, जरूर बघा आणि त्यांचा पाठपुरावा करा. नक्कीच पूर्ण होतात. – सचिन तेंडूलकर
 • एखाद्या टीकेला टाळायचे असेल तर काहीच करू नका, काहीच बोलू नका आणि काहीच असू नका. – ॲरिस्टॉटल
 • कुठल्याही समस्येच्या मध्ये संधी दडवलेली असते. समस्येला संधी म्हणून बघा.
 • कुठल्याही समस्येबरोबर तिचे उत्तर येत असते.
 • जर मी काही भव्य करू शकत नसेन तर मी छोटीशी गोष्ट भव्य तर्‍हेने करून दाखवेन.
 • तीव्र इच्छा शक्ती ही स्वत:ची संधीच नाही तर हुशारी पण निर्माण करते.
 • आपण वाऱ्याला बदलू शकत नाही पण बोटीला तर फिरवू शकतो?
 • निराशावादी प्रत्येक संधीत अडचण शोधतो तर आशावादी प्रत्येक अडचणीत संधी शोधतो.
 • सकारात्मक विचार सकारात्मक लोक निर्माण करतात.
 • काळजी हा कल्पनाशक्तीचा दुरुपयोग आहे.
 • यश हि अंतिम गोष्ट नसते आणि अपयश हा अंत नसतो तर धाडस हेच सत्य असते.
 • यश मिळविण्यासाठी जे देऊ शकता,जेथे तुम्ही देऊ शकता, ते उत्कृष्ट द्या,
 • यश हा एक प्रवास आहे अंतिम टप्पा नाही.
 • ध्येय हे फक्त आपल्याला प्रेरणेसाठी नसून आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी असते.
 • यश हे योग्य उद्दिष्ट आणि योग्य पूर्व तयारीने मिळते.
 • प्रचंड यश हे छोट्याश्या संधीतून मिळते.

Short Thought on Life Marathi | Inspirational Quotes on Life Challenges

3 thoughts on “Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी सुविचार”

 1. Attitude Status In Marathi

  very heart touching status, you have nice status collection andd I liked it thanks for sharing such awesome Marathi status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *