Skip to content

Sad Quotes in Marathi | Marathi Sad Dukhi Status & Thoughts दुःखी विचार

Sad Quotes in Marathi

दुःखी विचार:

  • ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जवळचे असतो तीच आपणास सर्वात जास्त दु:ख देते.
  • उष:काल होता होता काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
  • जगात सगळ्यात अवघड काम म्हणजे आपल्या हृदयातून कुणाला तरी दूर लोटणे.
  • अश्रू हृदयातून येतात मेंदूतून नाही. – लिओनार्डो दा विन्सी
  • आपले दु:ख कोण जाणणार? सगळेच धावतात भरायला पोटाची खळगी…कोणापुढे रडणार? देश परका, लोक अनोळखी!
  • सुखात सगळेच तुमच्या बरोबर असतात, दु:खाच्या उन्हात सावली पण साथ सोडून जाते.
  • हि खूपच दु:खाची गोष्ट आहे की कुणीतरी ज्यांना तुम्ही ओळखता त्यांना तुम्ही ओळखत होतात असे म्हणायची वेळ येते.
  • मनाच्या वहीतून माझे नाव काढून टाक, माझे गुण तर काहीच नाही पण अवगुण विसरून टाक .
  • आपली माणसे गैरसमज करून घेत नाहीत आणि गैरसमज करून घेतात ती आपली माणसे नसतात.
  • जो न माझे दु:ख हसले तो ची सुख हे दुखावले का ?
  • सूर्य उगवतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय.
  • थकलेले ढग, आत्मा जड झालेला, हातातून काय निसटले काहीच पत्ता नाही, माहित नाही हा आवाज कसला आहे, आणि अनुभूती कानात कशी आली, शहर भयाण झरोके चूप, गल्ल्या पण चूप, अशी शांतता की काळाचा पण श्वास कोंडला जाईल, असे वाटते आहे की अचानक मरण समोर येऊन उभे रहात आहे. – मीनाकुमारी
  • माझी सावली जी माझ्याबरोबर होती ती आजही आहे, फकीरासारखी अनुभूती जी आधी होती आजपण आहे.
  • उजेड कुठला,रस्ता कुठला,अंधार कुठला आणि किती रात्री, प्रत्येक वळणावर ज्यांना शोधले ते मुठीतून वाळूसारखे निसटून गेले आणि हात माझा रिकामाच राहिला जो आधी होता आत्तापण आहे. – मीनाकुमारी
  • पकडले जाऊ शकत नाही असे बरेच क्षण पावसाचे थेंब असतात, छातीवर येऊन पडतात आणि पकडायला गेले तर त्या आधीच घरंगळून जातात. -मीनाकुमारी
  • आठवणी—अचानक दु:सह्य वेदना बनून आपल्यावर अशा कोसळतात की कडाक्याच्या थंडीत कोणीतरी बर्फाचे पाणी फेकले जावे. -मीनाकुमारी
  • आयुष्यावर रीतींचा जबरदस्त पगडा आहे, माहित नाही जीव कुठल्या आशेवर तग धरून आहे. तुझ्या डोळ्यातून डोकावणाऱ्या ह्या दु:खाची शपथ, मित्रा, दु:खाचे नाते खूपच खोल असते.
  • हृदय सावरताच नाही कुठल्याही तऱ्हेने, प्रेमामुळे केव्हढा हा सत्यानाश?
  • अर्धा अर्धाच दिवस मिळाला अर्धी अर्धीच रात, ज्यांची जेव्हढी झोळी होती तितकीच मिळाली सौगात
  • आपलेच जेंव्हा परके होतात तेंव्हा परक्यांना कसे आपले म्हणणार?
  • मुखवटे आणि चेहरे यांची गल्लत करून बसलो. हाती आले एकटेपण, नाते हरवून बसलो.
  • दु:खात तुमच्याबरोबर रडायला कोणीच नसते, आनंदात हसायला कारणसुद्धा लागत नसते.
  • दैवगती न्यारी बुद्धी काय करील बिचारी
  • एक दिवस हत्तीवरी मिरविती नवरा परी, एक दिवस रस्त्यावरी भीक मागतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो.
  • हि दु:खाची गोष्ट आहे की प्रेम नाही, पण त्याच्यापेक्षा दु:खाची गोष्ट म्हणजे प्रेम करता न येणे.
  • दु:ख म्हणजे दोन बगीच्यांमधील भिंत आहे -खलील जिब्रान
  • जे घडून गेले त्याबद्दल कधीही दु:ख करू नका, उलट आनंद घ्या की ते कधीतरी तुमचे होते.
  • लोक आपल्या आयुष्यातून सहजपणे निघून जातात, पण ते पाठीमागे कायमच्या आठवणी ठेऊन जातात.
  • नुसत्या शंकेनेच काही नाती तुटतात, प्रत्येक वेळी चुकीचीच चूक नसते.
  • काळ पण शिकवतो आणि शिक्षक पण शिक्षक शिकवून परीक्षा घेतो तर काळ परीक्षा घेऊन शिकवतो.
  • रोज भरतीच्यावेळी प्रमत्तपणे धरतीला भेटायला येणाऱ्या सागराची, ओहोटीच्या वेळची व्याकुळता मात्र कुणालाच कळत नाही. तरीदेखील त्याच्या प्रेमाची उत्कटता एव्हढी देखील कमी होत नाही.
  • जीवनात सर्वात मोठ दु:ख असत आपल कोणीतरी सोडून गेल्यानंतर आणि ते आपले होते हे लक्षात येते ते सोडून गेल्यानंतर
  • स्वार्थासाठी खूप जवळ येतील ,स्वार्थ संपल्यावर पाठ फिरवतील, अरे परमेश्वराला पण फसवतात ते तुम्हाला काय जवळ करतील.
  • काय शोधात आहे डोळे तुझे ,माझ्यामध्ये राखेचा ढिगारा आहे न जाळ न ठिणगी
  • तू कुठल्या विश्वात हरवून गेला? मला मात्र भरलेल्या दुनियेत एकाकी करून गेला?
  • एक दिवस असा येतो सारा मोहरा फिरून जातो, वाटत असते अंधाराची वाटच नाही सरायची वाटत असते जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक, जुळत नाही साधे कोष्टक भणभणून जाते मस्तक, रीत तर चुकली नाही आकडा तर हुकला नाही. तो दिवस तसाच जातो सारा मोहरा फिरून जातो.—कवी अनिल

Sad Quotes in Marathi | Marathi Sad Dukhi Status & Thoughts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *