डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी उपाय :

 • असंतुलित आहार, कमी झोप, मानसिक तणाव ही डोळ्याखालील काळ्या वर्तुळांची मुख्य कारणे आहेत.
 • काळी वर्तुळे घालविण्यासाठी सर्वात पहिले पूर्ण झोप घ्या. पूर्ण झोपेमुळे तणाव आणि थकवा दूर होतो व डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे. ही झोप सलग घेतली पाहिजे, तुकड्यांमध्ये नको.
 • कडक ऊन हे या समस्येचे दुसरे कारण आहे. त्यामुळे नऊनंतर घराबाहेर निघायचे झाल्यास नेहमी सनस्क्रीन लावूनच निघा. ज्यामुळे मेलेनीन तयार होणार नाही आणि त्वचा काळवंडणार नाही. भारतीय त्वचेसाठी कमीत कमी 20 spf असलेली सनस्क्रीन वापरणे योग्य ठरते.
 • आजकाल बऱ्याच स्त्रिया व तरुणी मेकअप करतातच. मेकअप जर करायचाच झाला तर तो उच्च दर्जाचा वापरावा, भले ही तो महाग असो. चांगल्या दर्जाचे उत्पादन त्वचेला नुकसान पोहचवत नाही. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे विसरू नका. एखादे उत्पादन वापरण्या पूर्वी ते मनगटाखाली आतल्या बाजूने लावून पहा. काहीही वाईट परिणाम झाला नाही तरच ते चेहऱ्यावर लावा.
 • काही औषधे घेतल्यानंतर सुद्धा काळ्या वर्तुळांची समस्या उद्भवते. असे झाल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरला त्याबद्दल सांगा.
 • धुम्रपान आणि दारू पूर्णपणे बंद करा. संतुलित आहार घ्या आणि नियमितपणे मेडिटेशन किंवा योगा करा.
 • दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
 • अननसाच्या रसात हळद टाकून त्याची पेस्ट बनवा आणि डोळ्यांच्या खाली लावा.
 • पुदिन्याची पाने कुस्करून डोळ्यांच्या खाली लावा.
 • एक चमचा फ्रीज मध्ये १० ते १५ मिनिटे ठेवा आणि नंतर डोळ्याखाली लावा.
 • बदाम जाडेभरडे वाटून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी या पेस्ट ने मालिश करा.
 • काकडीच्या पातळ चकत्या करा आणि डोळ्यांवर ठेवा किंवा काकडीचा रस लावला तरी चालेल.
 • लिंबूच्या रसात काकडीचा रस मिसळा व दहा – पंधरा मिनिटानंतर साध्या पाण्याने धुवून घ्या.
 • कच्च्या बटाट्याचा रस डोळ्यांच्या खाली लावा, पंधरा मिनिटे ठेवून नंतर थंड पाण्याने धुवून टाका.
 • गुलाबजल मध्ये कापूस बुडवा व डोळ्यांवर या कापसाच्या पट्ट्या ठेवा. आठवड्यातून दोनदा हि क्रिया करा.
 • रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल डोळ्याखाली चोळा आणि सकाळी थंड पाण्याने धुवा.
 • दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबुचा रस एकजीव करून घ्या आणि काळ्या वर्तुळांवर लावा. हा लेप सुकला कि पुन्हा एकदा लावा. थोडा वेळ ठेवा आणि साध्या पाण्याने धुवा.
 • थंड टी बॅग डोळ्यांवर ठेवल्याने सुद्धा काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळते.
 • मक्याचे पीठ दह्यामध्ये मिसळून डोळ्यांच्या आसपास लावावे.

How to Remove Dark Circles in Marathi