Home » Tips Information in Marathi » Yoga Day Information in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन माहिती मराठी

Yoga Day Information in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन माहिती मराठी

Yoga Divas Marathi

Yoga Day Information in Marathi

योग दिवस

 • योग हा मूळ संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ जोडणे किंवा जुळणे असा होता. योग आपल्या शरीराला निसर्गासोबत जोडतो.
 • बरे पण योग असतो तरी काय? आणि आपण का करायचा ते आपण आता बघुयात.
 • योग हा व्यायाम आणि ध्यान करण्याचा एक प्रकार आहे. याचा मूळ उद्देश आपल्याला आपल्या शरीराच्या मूळ तत्वाशी जोडणे असा आहे. आपले शरीर हेच खरी संपत्ती आणि ती टिकवण्यासाठी आपण काय करायला हवे असा शिकवणारा हा योग आहे. आपले मन हे आपल्या शरीराचा सारथी आहे, त्यामुळे आपले मन हे आपल्या ताब्यात असणे गरजेचं आहे. मनावर म्हणजेच विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग मध्ये खूप भर दिलेला आहे.
 • प्राणायाम हा प्रसिद्ध योग प्रकार आपल्या सारथ्यावर म्हणजेच आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठी खूप फायदेदायक आहे. यामध्ये मुख्यतः आपल्या श्वासांवर काम केले जाते.
 • योगाचे अनेक प्रकार आहेत, जसे कि अष्टांग योग, हट योग, ऊर्जा योग, कृपाळू योग इत्यादी.

योग म्हणजे काय?

 • आंतराराष्ट्रीय योग दिनाबद्दल थोडक्यात माहिती
 • योग दिवस योग हे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे. नियमित योग करून आपण आपले शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम ठेऊ शकतो हे अनेक अभ्यासातून समोर आलेले आहे. सुमारे ५००० वर्षाहून अधिक जुना इतिहास असलेला योग आज अनेक देशांनी आत्मसात केलेला आहे.
 • योगाबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी आणि योगाचे फायदे सर्वाना समजवण्यासाठी २१ जुन या दिवशी संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सेप्टम्बर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेत २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर करावा असा प्रस्ताव मांडला होता, आणि १९४ पैकी १७३ देशांच्या पाठिंब्याने तो मंजूर झाला होता. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २१ जून २०१५ साली संपूर्ण जगाने एकत्र येऊन पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला होता. यावर्षी म्हणजे २१ जुनं २०२० साली आपण सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत.
 • योग दिवस २१ जुनलाच का बरे ?
 • आता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो कि २१ जूनच का बरे?? बाकी कोणता दिवस का बरे योग दिवस नाही होऊ शकत? तर त्याचा असा आहे कि २१ जुनं हा आपल्या वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे, म्हणजे या दिवशी सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा असतो आणि भारतीय पूराणात देखील याला विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्याची जास्तीत जास्त ऊर्जा पृथ्वीवर पोहचते म्हणूनच हा दिवस योग्य दिवस म्हणून जाहीर करण्याचे ठरवले गेले.

योग का करावा?

 • योग हा मुखत्वे आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्तम ठेवण्यासाठी केला जातो. नियमित योग केल्याने आपले शरीर निर्विकार बनते, मन शुद्ध होते,नकारत्मक ऊर्जा जाऊन विचारांमध्ये सकारात्मकता येते, म्हणून आपण योग करावा.
 • योग म्हणजे वेगवेळ्या आणि सोप्या व्यायाम पद्धती आहेत जसे कि अष्टांग आसन, भुजंगासन, सर्वांगासन, हलासन तरीदेखील आपण एखाद्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग करणे कधीही चांगले.

तुम्हाला माहिती आहे का ?

 • १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेसाठी शिकागो येते गेलेले असताना, त्यांच्या भाषणातून त्यांनी पाश्चिमात्य देशांना योगाची ओळख करून दिली होती. तेव्हापसून अनेक लोकांना योग बद्दल उत्सुकता वाढायला सुरवात झाली आणि तिकडे योगाच्या प्रचाराला सुरवात झाली.योग केल्याचे आरोग्यावर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम समजून अनेक पाश्चात्य लोकांनी योग ला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घेतलेले आहे. आज पर्यंत जगातल्या अनेक विद्यार्थ्यांनी योग हा आपल्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय म्हणून निवडला आहे.

योग दिनाची कल्पना (Theme)

 • योग दिवस हा दरवर्षी काहीतरी एक कल्पना घेऊन येत असतो.
 • जसे २०१५ साली – “Yoga For Harmony And Peace.” (सुसंवाद आणि शांतीसाठी योग ).
 • २०१६ साली – “Connect the Youth.” (तरुणांसाठी योग )
 • २०१७ साली – “Yoga For Health.” (आरोग्यासाठी योग )
 • २०१८ साली – “Yoga for Peace.” (शांतीसाठी योग )
 • २०१९ साली – “Climate Action”. (पर्यावरणासाठी योग )

जागतिक योग दिनाचा उत्सव

 • अमेरिका, कॅनडा, रशिया इत्यादींसोबत सुमारे १७० देशांमध्ये योग्य दिवस उत्साहात साजरा केला जातो.
 • लोकांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक आरोग्य चांगले राहून उत्तम आयुष्य जगात यावे यासाठी त्यांना प्रोत्सहीत केले जाते. योगामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल त्यांना जागरूक केले जाते. विविध खेळ, वादविवाद स्पर्धा, योगासने स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन हा उत्सव साजरा केला जातो.
 • संयुक्त राष्ट्र संस्था, आंतराराष्ट्रीय संस्था, पर्यवेक्षक राज्य, सर्व सदस्य, नागरी संस्था आणि नागरिक स्गकेच हा दिन अतिशय उत्साहाने साजरा करतात. भारतात अतिशय मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा होतात आणि योग करतात. पंतप्रधानांपासून सामान्य नागरिकांपर्यांत सर्वच अतिशय आनंदी आणि उत्साही असतात.
 • शाळा, महाविद्यालये, सरकारी ऑफिसेस आणि काही कंपन्यांमध्ये देखील हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक योग दिनाचा उद्देश

 • लोकांना योग च्या नैसर्गिक आणि आश्चर्यकारक फायद्याची माहिती कळण्यासाठी.
 • योग च्या मदतीने सर्वांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधरवण्यासाठी.
 • लोकांना योग माध्यमातून ध्यान करायला लावणे.
 • व्यस्त दिनक्रमामधून १ दिवस स्वतःच्या आरोग्यासाठी काढण्यासाठी.
 • नियमित योग करून शारीरिक व्याधींवर नियंत्रण मिळवण्यासाठी.
 • योगद्वारे जागतिक समन्वय घडवून आणण्यासाठी.
 • जगभरात शांती आणून विकास करण्यासाठी.
 • रोग होऊ नयेत यासाठी.

जागतिक विक्रम

 • २०१८ साली डेहराडून येथे झालेल्या ४ योग्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ५०००० स्वयंसेवकांचे नेतृत्व केले होते. तर राजस्थानाती कोटा येथे झालेल्या योग अधिवेशनात सुमारे १०,००,००० लोकांनो सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे.
 • दिवसेंदिवस लोकांची योगबद्दलची जागरूकता आणि उत्साह दोन्हीही वाढत आहे.
 • आता योगाचे एवढे फायदे आणि आरोग्यावरचे चांगले परिणाम माहिती झाल्यावे कदाचितच कुणी योग करणार नाही.
 • चला तर मग या योग दिवस पासून आपणही सुरवात करूयात नियमित ध्यान आणि व्यायाम करण्याची म्हणजेच योग करण्याची.

Yoga Day in Marathi Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *