Skip to content

Yoga Information in Marathi | Benefits of Yoga | योगा करण्याचे फायदे

Yoga Information in Marathi

योग म्हणजे काय?

योगासने म्हणजे व्यायाम नव्हे!

सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे लोकांना योगासने म्हणजे व्यायामाचा प्रकार वाटतो आणि त्याबद्दल हेटाळणी, चेष्टा,आणि कंटाळा करायला कुणीच मागेपुढे पहात नाही. आतापर्यंत तुम्ही योग म्हणजे काय पाहिले आता योग + आसन म्हणजे योगासने म्हणजे काय ते पाहू.

योग vs व्यायामशाळा :

  • सकाळी जॉगिंग सूट, पाण्याची बाटली आणि कानात हेडफोन घालून उगीचच रस्त्यावर धावले आणि कसले कसले रस प्यायले पुन्हा जिम मध्ये जाऊन तऱ्हे तऱ्हेचे अत्याचार करून घेतले म्हणजे तुम्ही आधुनिक दिसता आणि त्या सर्कल मध्ये दोन शब्द बोलण्याची पात्रता येते.
  • पण खरोखर तुम्हाला “आरोग्यं धन संपदा” मिळते? विचार तुमच्याच मनाला जर हा बाहेरचा देखावा करताना ते अडगळीत पडले नसेल तर. उत्तर “नाही” असेच येईल. नाहीतर ट्रेड मिल वर हार्ट अॅटॅक येऊन मारण्याची पाळी नसती आली.
  • व्यायाम करायचा कंटाळा ,मानसिक ताण तणाव आणि वेळ नसणे हि सबब सांगायची सवय ह्या त्रिमूर्ति तुमच्या रोगाची उत्पत्ति ,स्थिती आणि तुमचा लय अगदी प्रामाणिकपणे करतात.
  • तेंव्हा ह्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे योग! पशु पक्षी सहज प्रवृत्तीला मान देऊन आपले नैसर्गिक जीवन जगतात. त्यांना कोणी शिकवावे लागत नाही.
  • पोट बिघडले की उपास करतात अगदी वाघ सुद्धा गवत खातो. आपण मात्र पोटावर भयंकर अत्याचार करतो. कुत्रे, मांजरे त्याचं पाठीचा कणा आडवा असल्याने अवघडला तर ते शरीर ताणून तो लवचिक ठेवतात. आपण मात्र त्याच्यावर हजारो रूपयांचा मसाज करवून घेतो.

पतंजली योग सूत्र :

  • हजारो वर्षापूर्वी पतंजली नावाच्या ऋषिने कलियुगात आपण असाच अविचार करणार आहोत हे भाकीत करून अष्टांग योगाचे ज्ञान ,जे पार्वतीला शंकराने दिले आणि जे फक्त कठोर तपस्या करणार्‍यांनाच माहित होते ते सामान्य जणांसाठी खुले केले.
  • ह्या छोट्याशा अभ्यासाने आपण आपले आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे जीवन आनंदी आणि उत्साही करू शकतो. ते म्हणजे १]यम २]नियम ३]आसन ४]प्राणायाम ५]प्रत्याहार ६] ध्यान ७] धारणा ८] समाधी.
  • ह्यातली अगदी एकाच गोष्ट आपण मनोभावे केली तरी आपल्या जीवनात आकर्षक बदल होऊ शकतात. अगदी गुहेत बसून उपाशी राहून कठोर तपस्या करायची जरुरी नाही.
  • सामान्य जनांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात शरीराला वेडे वाकडे वाकवावे लागते. कधी कधी एकाच अवस्थेत तासन तास बसून राहावे लागते किंवा उभे राहावे लागते. त्यामुळे शरीराला आकार देणारे आणि तोलणारे स्नायू आखडतात.
  • आणि ते आपली प्रतिक्रिया दाखवतात. परिणामी आपण बेढब दिसतो किंवा हाडांचे रोग घेऊन तोंड वेडेवाकडे करीत बसतो. त्यासाठी आताच्या योगाचार्यांनी उदा. बाबा रामदेव, श्री. श्री. रविशंकर, निकम गुरुजी, आणि सत्यनारायण ह्यांनी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि सोपी आसने शिकवली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये गोडी निर्माण झाली आहे.
  • जेंव्हा मोदींनी अमेरिकेत गेल्यावर फक्त पाणी पिऊन दिवस काढले,अण्णा हजारेंनी ११ दिवस उपोषण केले ते केवळ योगाच्या बळावर हे कळल्यानंतर लोकांना ह्याबद्दल विश्वास निर्माण झाला.
  • आता सामान्य गृहिणी देखील स्वत:साठी वेळ काढून योगासने करू लागल्या आहेत आणि बऱ्याच छोट्या रोगांवर मात करू लागल्या आहेत जे पुढे जाऊन असाध्य रोगांमध्ये रूपांतरित होतात. उदा. ब्लडप्रेशर, मधुमेह, जाडेपणा, बद्धकोष्ट, मायग्रेन, सायनस.
  • वरवर बघताना हे एखादे अॅंटी बायोटिक किंवा पॅरासिटेमॉल घेऊन तात्पुरते बरे करण्याकडे कल असतो. पण आता लोकांना कळले आहे की, मधुमेह हा किडनीविकार व हृदयविकार ह्यांना आमंत्रण देतो जे कधीच बरे होत नाही.
  • बद्धकोष्ट गुदद्वाराच्या कॅन्सरची सुरुवात होऊ शकते. तर मायग्रेन हे मेंदू विकार किंवा ट्यूमरची सुरुवात होऊ शकते.
  • तेंव्हा “मुळे कुठार:” म्हणजे मुळावरच घाव घालून निरामय आयुष्य जगा. त्यासाठी रोज फक्त १५ ते ३० मिनिटे काढा.
  • प्रथम मनावरचा ताण जो सर्व रोगांचे मूळ आहे त्याला दूर करा. त्यासाठी प्राणायाम करा ज्यात फक्त नाडी शुद्धी आणि रक्तसंचार अभिप्रेत आहे.

अर्धं मत्सेन्द्रीयांसन:

  • हे आणि हेच फक्त मधुमेहावर अक्सीर इलाज असलेले आसन आहे.
  • हे आसन फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळविण्यात मदत करते
  • आणि 2020 मध्ये भारत मधुमेहाची राजधानी व्हावयास नको असेल तर हेच आसन तुम्हाला तारून नेईल.

सर्वांगासन:

  • शीर्षासन न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी सर्व फायदे ह्या आसनाने मिळतात.
  • सर्व ‘म्हणजे’ अंग ‘म्हणजे शरीराचा भाग आहे आणि’ आसन ‘ही मुद्रा आहे
  • आपल्या शरीराच्या सर्व भागांवर काम करणारी प्रणाली प्रभावित करते.
  • मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी ही मुद्रा अत्यंत फायदेशीर आहे आणि तिला ‘आसनची राणी’ देखील म्हणतात.
  • हे आसन मुख्यत्वेकरून थायरॉइड ग्रंथीला कार्यान्वित करते. आपल्या चयापचय क्रियेत थायरॉइड ग्रंथीला महत्वाचे स्थान आहे. आणि ते सुलभ झाले तर पुढचे सगळेच रोग नष्ट होतात.

हि सगळी आसने झाल्यावर २ मिनिटे शांत सगळे अवयव ढिले सोडून शवासन करा मग लागा कामाला. हे करताना तुमचे आवडते संगीत लावले तर सोनेपे सुहागा. १/२ तास फक्त तुमच्यासाठी घालावा आणि उरलेले २३ १/२ तास आहेतच.

Information of Yoga in Marathi : Essay on Importance of Yoga / Composition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *