Kusumagraj essay information

Kusumagraj Information in Marathi | Kavita, Kusumagraj Poems & Books

Kusumagraj Information in Marathi

कुसुमाग्रज मराठी माहिती

कुसुमाग्रज : एक थोर साहित्यिक आणि देशभक्त.

  • महाराष्ट्राचे खरोखर थोर नशीब की कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, पु.ल.देशपांडे, ग.दी. माडगूळकर अशा थोर साहित्यिकांनी आपल्या राज्यात जन्म घेतला. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे.
  • त्यापैकी कुसुमाग्रज म्हणजे “तात्या साहेब” वि.वा. शिरवाडकर कथा, काव्य, नाटक कादंबरी अशा सर्व क्षेत्रात मुशाफिरी करणारा अ‍वलिया होते. त्यांनी मराठी साठी दिलेले योगदान बघून आपण त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो.

पुण्य भूमीला लाभला पुण्यवंत, तीर्थक्षेत्र झाले भाग्यवंत :

  • कुसुमाग्रजांचा जन्म दि. २७ फेब्रुवारी १९१२ ला पुण्यात झाला. त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. पण ते दत्तक गेल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर झाले आणि ते पिंपळगाव नासिक जिल्ह्यात आले.
  • त्यांचे प्रायमरी शिक्षण पिंपळगाव येथे झाले आणि सेकंडरी शिक्षणासाठी ते नासिक येथील न्यू इंग्लीश स्कूल (आताचे जू.स. रुंगठा हायस्कूल ) येथे झाले. त्यावेळची इंग्लीश मॅट्रिक त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी ला केली. नंतर एच.पी.टी. कॉलेजला त्यांनी मराठी आणि इंग्लीश मध्ये बी.ए. केले. येथेच त्यांना साहित्याची गोडी लागली.

लेखनाची सुरुवात :

  • त्या वेळी भारतात चले जाव ची चळवळ जोरात सुरु होती. आणि सुधारणेचे वारे वाहत होते. तेंव्हा कुसुमाग्रजांनी २० वर्षाचे असताना नासिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला.
  • कॉलेजात असताना ते रत्नाकर मासिकामध्ये लिहित होते. समाजातील असमानता अन्याय ह्यांच्यावर त्यानी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचा ‘विशाखा’ नावाचा काव्य संग्रह वि.स. खांडेकरांनी छापून घेतला.
  • १९३३ मध्ये नवा मनु नावाच्या वर्तमान पत्रात लिहिण्यास सुरवात केली तर १९३४ मध्ये जीवन लहरी नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचे सर्व प्रकारच्या साहित्यात लेखन सुरु झाले.

इंग्लीश साहित्याची गोडी :

  • महाराष्ट्रात वाचन संस्कृती तेंव्हाही बहरत होती. तेंव्हा कुसुमाग्रजांनी साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी इत्यादी वर्तमान पत्रातून वार्ताहर म्हणून काम केले. स्वदेश नावाचे साप्ताहिक सुरु केले.
  • इंग्लीश भाषेला लोकमान्य टिळकांनी वाघिणीचे दूध म्हंटले होते आणि तरुणांना आवाहन केले होते की इंग्लीश शिकून इंग्रजांना घालवा. जनतेत स्वातंत्र्य संग्रामाचे महत्व नाटक, कादंबरी, कथा ह्यामधून केले जात होते. म्हणून कुसुमाग्रजांनी
  • इंग्लीश लेखकांच्या नाटक व कादंबर्‍या यावरून नाटके लिहिली. शेक्सपियर ऑस्कर वाईल्ड, मोलीरी इत्यादी लेखकांच्या नाटकांचे अनुवाद केले. आणि नवीन नाटके पण लिहिली. त्यापैकी ‘नटसम्राट’ हे नाटक खूप गाजले. ते किंग लियर ह्या नाटकावरून घेतले होते,पण त्याला त्यांनी इतका सुंदर साज चढविला की आज सुद्धा ते नाटक आणि त्यावर काढलेला सिनेमा गाजतोय.
  • कुसुमाग्रजांनी वैष्णव कादंबरी, दूरचे दिवे, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला (झाशीच्या राणीवर) मक्बेथ चे राज मुकुट हे भाषांतर अशी अनेक पुस्तके,नाटक, कविता लिहिली. त्यांचे सर्वात सुंदर काव्य होते पृथ्वीचे प्रेमगीत! कोणाच्याही मनात सुद्धा येणार नाही अशी उदात्त कल्पना फक्त एक कवीच करू शकतो.
  • ‘नको क्षुद्र शृंगार दुर्बलाचा, तुझी दूरता त्याहूनही साहवे” सूर्याभोवती फिरणार्‍या पृथ्वीचे हे प्रेमगीत नंतर व्ही. शांताराम ह्यांनी पण आपल्या जल बिन मछली सिनेमात घेतले. तात्यांनी सिनेमांसाठी पण गाणी लिहिली.

नाटकांसाठी योगदान आणि विविध सन्मान :

  • १९५० मध्ये नासिकच्या हौशी मुलांसाठी त्यांनी लोकहितवादी हे नाटकमंडळ स्थापन केले. ते अजूनही कार्यरत आहे. त्यातूनच दत्ता भट सारखे नट मराठी सिनेमाला मिळाले. तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापून नाटकाची चळवळ चालू ठेवली.
  • त्यांच्या इतक्या मोठ्या साहित्य सेवेबद्दल सरकार कडून त्यांना पद्म भूषण पदवी मिळाली. पुणे विद्यापीठाकडून डी. लिट मिळाली. विश्वातील एका ताऱ्याला त्यांच्या नासामधील चाहत्याकडून कुसुमाग्रज हे नाव दिले गेले.
  • अशी साहित्याची अविरत सेवा करणारा सच्छील आणि सुस्वभावी अजातशत्रू सारस्वत १०मार्च १९९१ ला काळाच्या पडद्याआड गेला.

Vi Va Shirwadkar / Kusumagraj Mahiti in Marathi Language Wiki / Poems / Essay Nibandh / Vishnu Vaman Shirwadkar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *