Skip to content

Resham Tipnis Husband, Married, Wiki, Age, Family, Biography

resham tipnis Marathi actress photo
Name RESHAM TIPNIS (रेशम टिपणीस)

Also known as RESHMA TIPNIS, RESHAM TIPNIS SETH, RESHAM TAPNIS

Age / How old / Birthday / Date of Birth / DOB 28th August 1974. As of 2024, she is around 50 years old.

Wedding & Marriage / Husband / Spouse / Partner Divorced from Sanjeev Seth. Her family also includes her two children.

TV Shows / Serials Acted
 • Do Dil Ek Jaan – Hindi
 • Mujhse Kuchh Kehti…Yeh Khamoshiyaan – Hindi
 • Ghar Ek Sapnaa – Hindi
 • Chandan Ka Palna Resham Ki Dori – Hindi
 • Basera – Hindi
 • Baa Bahoo Aur Baby – Hindi
 • Karishma – The Miracles of Destiny – Hindi
 • Satrangi Sasural – Hindi
 • Marathi Tarka
Chitrapat / Films / Movies Acted
 • Premasathi Coming Suun
 • Lalbaug Parel
 • Kho Kho
 • Bakula Namdev Ghotale
 • Be dune saade chaar
 • Laadi Goadi
 • Satvapariksha
 • Baazigar
Profile / Wikipedia Information Resham had her debut as a 19-year-old in the Hinid movie Baazigar against Shahrukh Khan. Her height is 5 feet 3 inches.

Wiki Biography / Profile Background

रेशम टिपणीस

मराठी नाट्य चित्र सृष्टी ही अनेक कलाकारांना विविध तर्हेने सामावून घेत आलेली आहे. मुंबईला जावं आणि अभिनेता/अभिनेत्री म्हणून नाव लौकिक मिळवावा हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तरुण, होतकरू महत्वाकांक्षी मुलांचे ध्येय. त्यातूनही मुंबईतीलच जन्म असेल तर काय विचारता? अशाच नशीबवान तारका आज मुंबईत आपली कारकीर्द घडवीत आहेत. काही यशस्वी झाल्या आहेत तर नवीन काही जणी यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. अशा या नाट्य चित्र सृष्टीतील अनेक प्रतिभावान ताराकांमधील एक तारका आहे रेशम टिपणीस. २८ ऑगस्ट १९७३ साली रेशम टिपणीस या अभिनेत्रीचा मुंबईत जन्म झाला.

अभिनय क्षेत्रात पदार्पण

रेशमच्या अंगी असलेल्या अभिनयाच्या कलागुणांना मुंबईत भरपूर वाव मिळाला. शिक्षणा बरोबरच तिने अभिनायाचेही धडे गिरवले.सुरुवातीच्या काळात ती मराठी मालिकांमधून लहान मोठ्या भूमिका करताना दिसली. तिचे लोभस व्यक्तिमत्व तेव्हाच लक्षवेधी ठरले होते. भूमिका फारशा महत्वाच्या नसताना ही रेशम मात्र प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. अवघ्या १९ व्या वर्षी १९९२ साली बाजीगर या शाहरुख खान ची प्रमुख भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटात रेशमने अंजली सिन्हा या मुलीची भूमिका केली होती. तिची भूमिका फार मोठी नसली तरी महत्वपूर्ण अशी होती आणि तिच्या प्रभावी अभिनयामुळे तीने ती लक्षणीय करून दाखवली.

१९९३ साली वयाच्या विसाव्या वर्षी संजीव सेठ याच्याशी विवाहबद्ध झाली. रीशिका व मानव ही तिची २ मुले. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे २००२ साली रेशम या विवाह बंधनातून मुक्त ही झाली.

अभिनय कारकीर्द

१९९२ साली बाजीगर हा शाहरुख खान ची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट आला आणि रेशमला मराठी बरोबरच हिंदी भाषिक मालिका व चित्रपटात प्रवेश मिळाला.

दूरदर्शन वाहिन्यांवरील वरील हिंदी मालिका

रेशम ने अनेक हिंदी मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यातील काही खल भूमिका हि आहेत. कावेबाज नणंद, दुष्ट सावत्र आई नाहीतर मत्सरी जाऊ अशा भूमिकांतूनही रेशम ने आपल्या सुरेख अभिनयाचे दर्शन घडवले आहे. हिंदी भाषिक नसूनही हिंदी मालिकांमध्ये ती कुठेही तिच्या बोलण्यातून उच्चारातून मुळची मराठी असल्याचे भासू देत नाही हे विशेष.

मालिका :

 • वोह रहनेवाली महलोंकी
 • दो दिल एक जान
 • मुझसे कुछ कहती है ये खामोशियॉ
 • घर एक सपना
 • चंदन का पलना रेशम की डोरी
 • बसेरा
 • बा बहू और बेबी
 • करिष्मा
 • सतरंगी ससुराल

चित्रपट :

 • जय हो (हिंदी)
 • प्रेमासाठी कमिंग सून (मराठी)
 • मेरे यार की शादी (हिंदी)

या शिवाय रेशम ही एक उत्तम नर्तकी आहे. तिने अनेक पुरस्कार समारोहात नृत्य सादर केले आहे. एकापेक्षा एक या झी मराठी वाहिनीवरील नृत्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात ही ती सहभागी झाली होती. अनेक चित्रपटात ही तिने आयटम सॉंग वर नृत्य केले आहे. पण ही आणि अशा तऱ्हेची अनेक नृत्ये अश्लीलतेकडे जाणारी अशी असल्याने काही प्रमाणात तिची गणती बी क्लास अभिनेत्रींमध्ये होऊ लागली आहे.

निवडक दर्जेदार अशा चित्रपटातून अभिनय करण्यापासून ती का दुरावली हे समजणे कठीण आहे पण ही नक्कीच तिची खूप मोठी चूक ठरली आहे.
कदाचित संजीव सेठ शी तिचे मोडलेले लग्न आणि त्यातून आलेले नैराश्य हे त्यामागचे कारण असू शकते. २ मुलांची जवाबदारी हे देखील मोठे कारण असल्यास नवल नाही.

शेवटी प्रत्येक कलाकाराच्या कलेला एक मर्यादा असते. रेशम सारख्या गुणी कलावतीने विचारपूर्वक आपले काम स्वीकारावे व आपली पूर्वीची प्रतिमा पुन्हा निर्माण करावी असा तिची प्रशंसक म्हणून तिला सल्ला द्यावासा वाटतो. तिला चांगल्या भूमिका करायची संधी मिळो व प्रेक्षकांना तिचा सुंदर अभिनय पहावयास मिळो हीच सदिच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *