Home » Articles » Coronavirus Information in Marathi Language | कोरोनाव्हायरस माहिती

Coronavirus Information in Marathi Language | कोरोनाव्हायरस माहिती

Coronavirus Marathi

Coronavirus Information in Marathi

कोरोनाव्हायरस माहिती

कोरोनाव्हायरस नाव ऐकूनच अंगावर काटा आला ना ? सध्या चीन आणि आता युरोप, अमेरिका आणि भारतातही या व्हायरस ने काय हाहाकार माजवला आहे ते आपल्या सर्वाना माहित आहे. सर्व देश या व्हायरस मुळे चिंतीत आहेत. कित्तीतरी लोक या व्हायरस मुळे आजारी झाले आहेत. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वृद्ध सर्वच जण या व्हायरस मुळे परेशान आहेत. आज चीनच नाही तर संपूर्ण जगावर या व्हायरस चा धोका संभवतो आहे. चला तर बघुयात कि हा व्हायरस नेमका आहे काय ? आला कुठून ? यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे आणि यावर काही उपाय आहे का? आणि याचे काय काय परिणाम आतापर्यन्त झालेले आहेत.

कोरोनाव्हायरस आहे तरी काय ? :

 • कोरोनाव्हायरस हा वेगवेगळ्या व्हायरस चा एक समूह आहे, ज्यामध्ये अनेक व्हायरस चे प्रकार येतात जसे एमईआरएस – सीओव्ही, एसएआरएस- सीओव्ही याना एकत्रितपणे कोरोना व्हायरस असे म्हंटले जाते.
 • यामध्ये सामान्य आजारांपासून ते अतिसंवेदनशील आजारांपर्यंत कोणाचेही लक्षणे दिसू शकतात. कोरोनाव्हायरस हे झुनोटिक असतात म्हणजेच यांचे संक्रमण प्राणी आणि माणूस या दोघांमध्ये होऊ शकते.
 • अनेक कोरोनाव्हायरस प्राण्यांमध्ये संक्रमित होत असतात परंतु मानवांमध्ये यांचे संक्रमण होतच असे नाही. पण काही असेपण कोरोनाव्हायरस आहेत ज्यांचे प्राण्यांमधून माणसात संक्रमण झालेले आहे जसे एमईआरएस – सीओव्ही हा उंटांमधून माणसामध्ये संक्रमित झालेला आहे.
 • नोव्हल कोरोनाव्हायरस हा आताच शोध लागलेला नवीन कोरोनाव्हायरस आहे जो चीनमध्ये पसरला आहे. नोव्हल म्हणजे नवीन, या व्हायरस अजून काही नाव ठेवले गेले नाहीये म्हणून याला नोव्हल कोरोनाव्हायरस म्हंटले जाते, याला वुहान व्हायरस असेपण म्हंटले जाते.
 • कोरोनाव्हायरस हे नाव याला या व्हायरस च्या आकारामुळे दिले गेले आहे. या विषाणूच्या आजूबाजूला मुकुट सारखी रचना आहे आणि मुकुटला लॅटिन भाषेमध्ये कोरोना म्हंटले जाते म्हणून या व्हायरस चे नाव कोरोनाव्हायरस पडले आहे.

कारणे आणि लक्षणे :

 • कोरोनाव्हायरस अतिशय झपाट्याने वाढण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे हा संसर्गजन्य रोग आहे, असा रोग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या नकळत संपर्कात येऊन देखील या रोगाचे लक्षणे तुमच्यामध्ये दिसू शकतात.
 • हा रोज माणसांमध्ये कसा संसर्गित झाला याची काही जास्त माहिती अजून शास्त्रज्ञांना माहित नसून यावर संशोधन चालू आहे, परंतु मांजरी, गुरे, वटवाघूळ, उंट यांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा यांचे मास खाल्यामुळे या रोगाची लागण झाली असावी असे प्रार्थमिक अंदाज आहे.
 • याची काही स्पष्ट लक्षणे नसल्यामुळे आणि जी लक्षणे आहेत ती इतर आजारांसारखी असल्यामुळे हे रोगी ओळखणे कठीण आहे.
 • सर्वच रोगी हे गंभीर असतात असे काही नाही काही जणांची लक्षणे हे सौम्य देखील असू शकतात. चीनमधील हुबेई इथे सर्वात प्रथम या रोगाने संक्रमित रुग्ण आढळला आहे.
 • सामान्य सर्दी खोकल्यापासून ते स्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होणे इथपर्यन्त कोणतेही या आजाराचे लक्षण असू शकते. ५ ते १४ दिवसांमध्ये या संसर्गाची लक्षणे दिसू शकतात.
 • कच्चे किंवा न शिजलेले प्राण्यांचे मांस खाणे टाळावे, प्राणी बाजारात किंवा ओल्या बाजारात जाणे टाळावे.

संरक्षणात्मक उपाय :

 • हा एक संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्याला विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये नाकाला मास्क सतत ठेवणे अतिशय उत्तम.
 • बाहेरून आल्यावर हात आणि पाय धुणे स्वच्छ करणे. तसेच हात पाय सतत पाण्याने २० सेकंड पर्यन्त स्वच्छ धुवावे. हे आजार खोकला, शिंक यातून होणाऱ्या विषाणू संक्रमणामुळे पसरतो त्यामुळे कुणाशीपण बोलताना शक्यतो १ मीटर चे अंतर राखावे.
 • हात मिळवणे टाळावे. डोळे,नाक किंवा तोंडाला हात स्वच्छ न करता स्पर्श करू नये यामधून संक्रमण होऊ शकते. जर आपण आताच चीन किंवा आसपासच्या परिसरात प्रवास केला असेल तर आपली तपासणी करून घ्यावी.
 • तसेच सर्दी खोकला किंवा तत्सम काही आजार, श्वसनाचे काही त्रास जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. ज्या वस्तू तुच्यासह अजून लोक वापरतात त्यांचा विशेष स्वच्छ करावे जसे कॉम्पुटर, सार्वजनिक वाहन. अतिशय गरज असल्याशिवाय चीनमध्ये प्रवास करणे टाळावे.

कोरोनाव्हायरस वरील उपचार :

 • कुठल्याहि प्रकारच्या कोरोनाव्हायरस वरती कोणतीही प्रतिबंधात्मक आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही आणि कोणताही ठोस उपचार त्यावर नाही. या प्रकारच्या संसर्गाने ग्रस्त असणाऱ्या रोग्यांना जेवढी वैद्यकीय मदत करता येईल तेवढी केली जाते.
 • सुश्रुषा केली जाते पण यावर उपचार उपलब्ध नाहीत. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करणे हाच यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे.
 • आजपर्यंत अनेक कोरोनाव्हायरस चा अटॅक झालेला आहे, खासकरून चीनच्या परिसरात या कोरोनाव्हायरस चा प्रभाव आढळून आलेला आहे.
 • चिनी सरकारने वुहानसहा १६ शहरे बंद केली आहेत, या शहरांमध्ये कुणीही सहजरित्या जाऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर लोकांनी वुहान शहराकडे मदतीसाठी आणि वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून धाव घेतली आहे.
 • आणि हे सर्व लोक स्वतःला च्या जीवाची पर्वा न करता हे काम करत आहेत. कदाचित हे डॉक्टर्स नर्सेस या व्हायरस चा उपचार करताना कधीच परत येऊ शकणार नाहीत. या लोकांचे नातेवाईक भावनिक होऊन निरोप देतानाचे फोटो वायरल होत आहेत.

आजपर्यंत झालेला परिणाम :

 • वुहान शहरात एकूण १ कोटी लोक राहतात त्यापैकी जवळपास ५० लाख लोकांनी स्थलांतर केलेलं आहे.
 • त्यातील काही जणांना जरी या रोगाचे संक्रमण झाले असेल तर संपूर्ण जगाला या व्हायरस चा धोका आहे. चीन मध्ये आतापर्यन्त एकूण २२० लोकांनी या व्हायरस मुले आपले प्राण गमावले आहेत आणि १०,२०० लोकांना या व्हायरस चे संक्रमण झालेलं आहे.
 • जर या व्हायरस चा उपचार आणि लस लवकरात लवकर नाही शोधली गेली तर हा आजपर्यंतचा सर्वात खतरनाक कोरोनाव्हायरस सिद्ध होऊ शकतो. चीनसोडून बाकी देशांमध्ये सुद्धा हा व्हायरस आता पसरत आहे.
 • जगात एकूण ७४ अशा रुग्णांची नोंद झालेली आहे. भारत, कंबोडिया, कॅनडा, जर्मनी सगळीकडे हा व्हायरस पसरत आहे. अनेक देशांनी चीनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांना परत बोलावले आहे, भारताने देखील चीनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना परत आणले आहे.
 • अनेक देशांनी चीनसोबत हणारे परिवहन, विमान उड्डाणे रद्द केली आहेत. या व्हायरस चा चिनी अर्थसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Information of Coronavirus in Marathi / Coronavirus Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *