Home » Tips Information in Marathi » Dengue Symptoms in Marathi, डेंग्यू तापाची लक्षणे

Dengue Symptoms in Marathi, डेंग्यू तापाची लक्षणे

symptoms of dengue in marathi

Dengue Symptoms in Marathi

डेंग्यूची प्रमुख लक्षणे – माहिती

 • डेंग्यूचे प्रमुख लक्षण आहे तीव्र ताप आणि त्या सोबतच डोकेदुखी आणि सांधेदुखी. ताप जवळपास १०४ डिग्री असतो म्हणूनच या तापाला हाडे-मोड ताप असे म्हणतात.
 • डेंग्यूच्या तापामध्ये बरेचदा भरपूर थंडी वाजून ताप येतो. प्रचंड डोकेदुखी जाणवते. तसेच स्नायू आणि सांधे दुखू लागतात. प्लेटलेट्सची संख्या दिवसेदिवस कमी होऊ लागते.
 • शरीर दिवसेदिवस कमजोर होऊ लागते. या रोगात भूक खूप कमी लागते किंवा काही खाल्ल्यावर मळमळल्या सारखे वाटू लागते.
 • अन्नाला बिलकुल चव लागत नाही आणि घसा खवखवू लागतो किंवा थोडासा दुखू लागतो.
 • रोग्याला खूप थकावट आणि अशक्तपणा जाणवू लागतो. काही वेळा अशक्तपणामुळे चक्कर आल्यासारखी वाटते किंवा चक्कर येते.
 • शरीरावर लालसर – गुलाबी पुरळ येतो. खास करून चेहरा, गळा आणि छातीवर पुरळ येतो. कधीकधी हा पुरळ स्पष्ट असतो तर कधी अस्पष्ट असतो. कधीकधी व्रणही उठतात.
 • डेंग्यूमध्ये होणारी डोकेदुखी साधारणत: पुढील भागात असते. तसेच काहीवेळा डोळ्यांच्या हालचालीनंतर डोळ्याच्या पाठील भागात दुखू लागते.
 • डेंग्यू रक्तस्स्रावात्मक ताप  हा सामान्य डेंग्यू तापापेक्षा थोडा जास्त गंभीर असतो. या प्रकारच्या तापामध्ये रक्तस्त्राव होऊ लागतो.
 • हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. तसेच काही रोग्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव देखील होऊ लागतो. आतड्यांमधून रक्तस्त्राव होतो. प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते.
 • छातीमध्ये किंवा पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. ज्यामुळे सतत तीव्र पोटदुखी होते आणि श्वास घेताना त्रास होऊ लागतो.
 • त्वचा फिकट दिसू लागते तसेच स्पर्शाला थंड आणि चिकट वाटते.
 • अंगावर पुरळ येऊन नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त येऊ लागते.
 • काही वेळा रक्ताच्या किंवा बिना रक्ताच्या उलट्या होऊ लागतात.
 • सतत झोप येते, अस्वस्थ वाटते. घशाला सारखी कोरड पडून तहान लागत राहते.
 • नाडीचे ठोके सुद्धा जलद पडतात.
 • अतिगंभीर डेंग्यू हा रक्तस्स्रावात्मक डेंग्यूचा पुढील टप्पा आहे जो खूप कमी लोकांना होतो.
 • या रोगात वरील लक्षणांसोबतच रुग्णाची अस्वस्थता वाढते. शरीर थंड पडू लागते. नाडीचे ठोके मंदावतात. आणि रक्तदाबही कमी होतो.

Dengue Information in Marathi / Dengue Fever

4 thoughts on “Dengue Symptoms in Marathi, डेंग्यू तापाची लक्षणे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *