Home » Tips Information in Marathi » Breast Cancer Symptoms in Marathi, स्तनाच्या कर्करोगा बद्धल माहिती

Breast Cancer Symptoms in Marathi, स्तनाच्या कर्करोगा बद्धल माहिती

symptoms of breast cancer in marathi

Breast Cancer Symptoms in Marathi

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे – माहिती

 • स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगा पैकी सुमारे ३० टक्के स्तनाच्या कर्करोगाचे पेशंट असतात. स्तनांमध्ये होणाऱ्या गाठी पैकी फक्त १० टक्के गाठी कर्करोगाच्या असतात.
 • स्तनांच्या कर्करोगाचे सर्वात मुख्य लक्षण आहे स्तनांमध्ये गाठ तयार होणे. स्तनांच्या आजूबाजूला थोडे दाबून पाहिल्यास हि गाठ जाणवू शकते.
 • कधी कधी स्तनांमध्ये खळ्या किंवा खड्डे दिसू शकतात.
 • बहुतेक वेळा स्तनांच्या त्वचेचा रंग किंवा स्तनांच्या त्वचेचा पोत सुद्धा बदललेला आढळतो.
 • स्तनांच्या बोंडशी मध्ये म्हणजे निपलमध्ये सुद्धा बदल दिसतो. कधी कधी निपल एका बाजूस वळलेले दिसतात किंवा आत खेचल्यासारखे वाटतात.
 • निपलमधून रक्त किंवा इतर कुठला तरी द्रव स्त्रवू लागतो. स्तन दुखू लागतात. निपल लाल होते.
 • स्तनांच्या टोकावर भेगा पडतात आणि वेदना होऊ लागतात. तसेच स्तनांच्या टोकाला खाज येऊ लागते.
 • स्तनांचा आकार अचानक वाढतो किंवा अचानक कमी होतो. स्तन घट्ट भासतात, हि लक्षणे दोन्ही स्तनांमध्ये एकदम न दिसता फक्त एकाच स्तनामध्ये दिसून येतात.
 • स्नायूंच्या वेदना होऊ लागतात आणि पाठदुखी सुद्धा उद्भवते.
 • या लक्षणांशिवाय हा कर्करोग झालेल्या महिला कमजोर होऊ लागतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवू लागतो.
 • बऱ्याचदा स्तन इतर शरीरापेक्षा थोडे जास्त गरम भासतात आणि थोडेसे सुजलेले दिसतात.
 • स्तनांचा फक्त काही भाग जाड झाल्याप्रमाणे किंवा फुगल्याप्रमाणे वाटतो. स्तनांवर लाल रंगाचा पट्टा दिसतो.
 • जर रोग जास्त गंभीर असेल तर हाडांमध्ये वेदना होऊ लागतात. लसिका ग्रंथीना सूज येते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि स्तनांची त्वचा पिवळसर दिसते.
 • कधी कधी स्तनांच्या त्वचेवरील रोमछिद्रे मोठी होतात व संत्र्याच्या सालीवरील छिद्रांप्रमाणे दिसतात.
 • काही वेळा निपलवरती पुरळ येतो किंवा खवले आल्याप्रमाणे भासतात.

Breast Cancer Information in Marathi / Breast Cancer Treatment

1 thought on “Breast Cancer Symptoms in Marathi, स्तनाच्या कर्करोगा बद्धल माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *