Home » Tips Information in Marathi » TB Symptoms in Marathi, Tuberculosis Information

TB Symptoms in Marathi, Tuberculosis Information

tb information in marathi

TB Symptoms in Marathi

क्षय रोगाची लक्षणे – माहिती

 • क्षय रोगाचे मुख्य लक्षण आहे दोन आठवड्याहून अधिक असलेला खोकला. खोकल्या सोबत कधीकधी श्‍लेष्मा सारखा चिकट पदार्थ सुद्धा बाहेर येतो. कधी कधी रक्त सुद्धा येते. खोकला बहुधा सकाळच्या वेळेस व जेवल्यानंतर जास्त येतो.
 • रुग्णाची भूख दिवसेदिवस कमी होऊ लागते आणि त्यामुळे वजनही कमी होऊ लागते.
 • संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळीस ताप येऊ लागतो. थंडी असली तरी दरदरून घाम येतो.
 • कधी कधी धाप लागते, श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो तसेच श्वास घेताना छातीत दुखू लागते.
 • क्षय रोगात रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे आळस येतो किंवा अस्वस्थता वाटू लागते. अशक्तपणा येतो आणि रात्रीच्या वेळेस घाम फुटतो.
 • घशातील लिम्फ ग्रंथींना सूज येते किंवा फोड येतात.
 • कमरेच्या हाडाला सूज येते आणि गुडघे दुखू लागतात. गुडघे दुमडण्यास खूप त्रास होतो.
 • काही महिलांना तापसोबतच मान लचकण्याचा सुद्धा त्रास होतो.
 • पोटाच्या क्षय रोगात पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होतात. किंवा गॅसमुळे पोटफुगी होते. काहीवेळा संडासातून रक्त पडू लागते.
 • फुफ्फुसांच्या क्षय रोग गंभीर असेल तर क्षय रोग असलेल्या ठिकाणी सूज येते आणि दुखू लागते आणि छाती मध्ये पाणी तयार होते.
 • जेव्हा क्षय रोग डोळ्यांपर्यंत पोहचतो तेव्हा रुग्णाला अंधुक दिसू लागते, डोळे लाल होतात, डोळ्यासमोर काळे डाग दिसू लागतात.
 • हाडांचा क्षय रोगा झाल्यास हाडांवर जखमा होतात ज्या बऱ्याच काळापर्यंत ठीक होत नाहीत.
 • हाडांसोबतच स्नायू सुद्धा प्रभावित होतात आणि दुखू लागतात. कधी कधी शरीरावर फोड येतात.
 • फुफ्फुसांच्या क्षय रोगात डोकेदुखी होते आणि रुग्णाची पचनशक्ती कमजोर होते.
 • नाडीचे ठोके जलड पडतात आणि रुग्णाची जीभ लाल होते.
 • रुग्णाला रातीची झोप येत नाही व झोपला असताना तोंड उघडेच राहते.
 • चेहरा पिवळसर होतो आणि चेहऱ्यावरील चमक नाहीशी होते. चेहरा निस्तेज दिसू लागतो. स्वभाव चिडचिडा होतो.
 • रुग्णाला प्रकाश आवडत नाही आणि अन्नावरची वासना उडून जाते.
 • मैनिन्जाइटिस क्षय रोग झाल्यास रुग्णाला अंगदुखी सोबत उलट्या, प्रचंड डोकेदुखी, मानेचे स्नायू कडक होणे, झटके येणे अशी लक्षणे दिसतात.

TB Information in Marathi / Tuberculosis Treatment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *