Home » Tips Information in Marathi » Chikungunya Symptoms in Marathi, Chikungunya Information

Chikungunya Symptoms in Marathi, Chikungunya Information

Chikungunya information in marathi

Chikungunya Symptoms in Marathi

चिकनगुनिया रोगाची लक्षणे – माहिती

 • चिकनगुनिया या रोगाची लक्षणे सुद्धा काही प्रमाणात डेंगू सारखी असतात. चिकनगुनियाचा डास चावल्यानंतर सुमारे ३ ते ७ दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात.
 • या रोगाच्या सुरवातीला तीव्र ताप येतो. ताप १०२ डिग्रीपासून १०४ डिग्रीपर्यंत असू शकतो.ताप जवळपास एका आठवडा किंवा जास्तीत जास्त दहा दिवस पर्यंत येतो. दिवसाच्या एका ठराविक वेळेस ताप खूपच जास्त असतो.
 • या रोगाचे दुसरे प्रमुख लक्षण आहे प्रचंड सांधेदुखी. हि सांधेदुखी एवढी तीव्र असते की ज्यामुळे हात –पाय हलविताना देखील खूप त्रास होतो. हालचाल करणे खूपच त्रासदायक ठरते. हे लक्षण बरेच दिवस टिकते. काही वेळा सांधेदुखी सोबत सांध्यांना सूजही येत. काहीवेळा पाठदुखीचा त्रास सुद्धा सुरु होतो.
 • या रोगामध्ये काही जणांना पुरळ सुद्धा येतो. सर्वांनाच येतो असे नाही. पुरळ शक्यतो चेहऱ्यावर, हातांवर आणि जांघांवर येतो.
 • काहीवेळा रुग्णाला स्नायूंमध्ये खेचल्याप्रमाणे वाटतात व दुखतात. प्रचंड डोकेदुखी होते आणि त्यासोबतच भोवळ आल्यासारखी वाटते. काहीवेळा मळमळल्या प्रमाणे किंवा उलटी आल्याप्रमाणे जाणवते.
 • काही रुग्णांना डोळ्यांच्या दुखण्याचा त्रास सुद्धा होतो किंवा प्रकाशामध्ये डोळ्यांना त्रास होतो. डोळे लाल होतात.
 • या रोगामध्ये झोप कमी होते आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
 • काहीवेळा रुग्णाला प्रचंड थडी वाजून अंग थरथरायला लागते. तसेच जुलाबही सुरु होतात.
 • चिकनगुनिया जास्त गंभीर असल्यास नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव होऊ लागतो.
 • फारच क्वचित रुग्णांना तोंड येणे, त्वचा काळवंडणे, किंवा त्वचेची सालपट निघण्यासारख्या समस्या उदभवू शकतात.
 • लहान मुलांमध्ये बहुतेकवेळा आणि मोठ्या व्यक्तींना काहीवेळा प्रकाशाची भीती वाटू लागते. आणि प्रकाशात पाहिल्यास डोळे दुखतात.

Chikungunya Information in Marathi / Chikungunya Treatment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *