Skip to content

NEET Exam Information in Marathi Language | नीट परीक्षेची माहिती

Neet Exam Marathi

NEET Exam Information in Marathi Language

(NEET) नीट परीक्षेची माहिती :

(NEET) नीट हि वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. ‘नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट’ असा नीट चा फुल फॉर्म आहे. ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी एक सर्वात कठीण प्रवेश परीक्षा आहे. एंट्रन्स टेस्ट नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. जसे एमबीबीएस, बीडीएस, आयुष्य कोर्सेस. भारतात किंवा परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

भारतातील एमबीबीएस आणि बीडीएस साठी असणाऱ्या एकूण ६६,००० पेक्षा जास्त जागांसाठी नीट प्रवेश परीक्षा घेतली जाते. भारतातील काही संस्था या त्यांच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा देखील घेतात. डॉक्टर होणे साधी गोष्ट नाही, त्यासाठी अत्यंत मेहनत, परिश्रम आणि सय्यम असणे अत्यंत आवश्यक आहे, आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट प्रवेश परीक्षा देखील तेवढीच कठीण असते. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे कि तुम्हाला वैद्यकीय क्षत्रात पदार्पण करायचेच आहे.

(EXAM FORMAT) परीक्षा पद्धती आणि अभ्याक्रम २०२० :

नीट प्रवेश परीक्षा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, जीवशास्त्र म्हणजे बायॉलॉजि आणि रसायनशात्र केमिस्ट्री यावर असते. हे परीक्षा मुख्य करून १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असते. अगदी अलीकडे एनटीए ने नीट २०२० चा नमुना प्रस्तुत केला आहे. २०२० चा परीक्षा पेपर नमुना हा मागच्या वेळेस सारखाच म्हणजे २०१९ सारखाच असणार आहे. हे परीक्षा ३ मे २०२० रोजी घेतली जाईल. ही परीक्षा ऑफलाईन पध्ध्दतीने पेन आणि पेपर च्या साहाय्याने घेतली जाईल. परीक्षेच्या वेळेस मुलांना रफ काम करण्यासाठी पेपर दिला जाईल. परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेतली जाईल.

परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. परीक्षेतील प्रश्नांची संख्या १८० असेल तर एकूण गुण ७२० असतील. म्हणजेच एका प्रश्नाला ४ गुण. निगेटिव्ह गुणांची परीक्षा असल्यामुळे उत्तर चुकल्यास तुमचा १ गुण कमी होईल. त्यामुळे जर तुम्हाला बरोबर उत्तर नक्की माहित असेल तरच उत्तर द्यावे नाहीतर मिळवलेल्या गुणांपैकी १ गुण कमी होईल.

यामध्ये भौतिकशास्त्रावर ४५, रसायन शास्त्रावर ४५ आणि जीवशास्त्रावर ९० (वनस्पतीशास्त्र ४५ + प्राणिशास्त्र 45) असे प्रश्न असतील.
प्रवेश परीक्षेचे नियम अतिशय कडक आणि क्लिष्ठ असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी सर्व नियम व अटी वाचून त्या समजून घेणे अत्यावश्यक असते. उत्तरे देताना विशेष काळजी घ्यावे जेणेकरून आपल्याला आपले कमावलेले गुण गमवावे लागणार नाहीत.

परीक्षा हे मलटीपल चॉईस question ची असणार आहे त्यामुळे खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी –

– एकदा आपण आपले उत्तर चिन्हांकित केले कि ते बदलता येणे शक्य नाही, त्यामुळे उत्तर देण्यापूर्वी पूर्ण खात्री असावी.
– परीक्षेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक नाही,ज्या प्रश्नांची आपल्याला खात्रीशीर उत्तरे येतात त्यांचीच उत्तरे द्यावी.
– एका प्रश्नासाठी आपण एकापेक्षा जास्त उत्तरे देऊ शकत नाही
– परीक्षेमध्ये वेळ आणि प्रश्न यांची जोड घालावी लागते त्यामुळे पूर्ण एक चित्ताने आपला द्या.

(FORM) नीट परीक्षा फॉर्म कसा भरावा? :

  • २ डिसेंबर २०१९ पासून नीट परीक्षेच्या परीक्षेचा अर्ज जाहीर करण्यात आला. हा अर्ज ओंलीने स्वरूपाचा आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणारे विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात. छायाचित्र आणि स्वाक्षरीसह अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी होती, तर फीस भरण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी रात्री ११.५० पर्यंत होती.
  • आपल्या अर्जामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती तम्ही १५ ते ३१ जानेवारी मध्ये करू शकता. परीक्षा देण्यासाठी लागणारे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट २७ मार्च २०२० ला अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. परीक्षेला जाण्यापूर्वी या हॉल तिकीट ची झेरॉक्स काढून ठेवावी आणि परीक्षेला जाताना सोबत ठेवावी त्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही.

(RESULT) रिझल्ट आणि प्रवेश प्रक्रिया :

  • परीक्षा झाल्यावर सर्वाना उत्सुकता असते ती रिझल्ट ची. मे महिन्याच्या २ ऱ्या ते ३ ऱ्या आठवड्यात या परीक्षेचे अन्सर की उपलब्ध होईल जेणे करून तुम्ही तुमची उत्तरे तपासून बघू शकता. आणि ४ जून रोजी नीट चा रिझल्ट लागू शकतो.
  • निकालासोबतच नीट चा कट ऑफ देखील जाहीर केला जाईल. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यानंतर समुपदेशनासाठी बोलावले जाईल. साधारणपणे जून महिन्याच्या ३ ऱ्या आठवड्यात समुपदेशन सुरु होईल, यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार नोंदणी करून महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.

(HOW TO STUDY FOR NEET) नीट साठी अभ्यास कसा करावा :

  • मेडिकल किंवा डेंटल ला ऍडमिशन घेण्याचे स्वप्न बघत दरवर्षी लाखो मुले नीट परीक्षेसाठी बसतात. पण त्यातले काही सर्वांचे ऍडमिशन होतेच असे नाही. जर तुमचे देखील असेच स्वप्न असेल आणि त्यासाठी सर्व मेहनत घ्यायची तयारी असेल तर मात्र तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला (hard work) हार्ड वर्क तर करावेच लागणार पण त्यासोबतच त्याला स्मार्ट वर्क ची देखील साथ असायला हवी. मागील गेल्या काही वर्षांपासून परीक्षेचा नमुना सारखाच आहे त्यामुळे तुम्ही गेल्या वर्षांचे पेपर सरावासाठी वापरू शकता. त्यावरून प्रश्नांचा अंदाज तुम्हाला येईल. तसेच प्रत्येक विषयाच्या कोणत्या धंद्यांना जास्त गुण असतात याचा देखील अंदाज काढता येईल.
  • मार्केटमध्ये अनेक अँप्लिकेशन्स सुद्धा उपलब्ध आहेत जे तुम्हाला उत्तम अभ्यासातही मदत करू शकतात. तसेच हे अँप्स ऑफलाईन देखील वापरू शकता. त्यांचे रेटिंग्स बघून तुमच्यासाठी योग्य अँप तुम्ही वापरू शकता.
  • अभ्यास करताना तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही.
  • मानला आणि शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही नियमित योगासने आणि प्राणायाम करू शकता. यांनी अभ्यास नीट लक्ष लागते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. एका अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे कि प्रत्येक ४५ मिनीटस च्या अभ्यासानंतर थोडासा ब्रेक घेणे गरजेचं असते. यामुळे चित्त जास्त एकाग्र होते.
  • आहार देखील संतुलित असावा. योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहैड्रेट्स, व्हिटॅमिन योग्य प्रमाणात असावे. थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खावे.
  • आपल्या आयुष्यातला हा काळ खूप महत्वाचा असतो, आपल्या भविष्यच हा पाय असतो. त्यामुळे आपले पूर्ण लक्ष हे आपल्या ध्येयाकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाइलला, फेसबुक, व्हॉट्सअप अशा प्रलोभनांपासून दूर राहावे, यांचा अति वापर टाळावा.

NEET Exam Information in Marathi Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *