Skip to content

NDA Information in Marathi | National Defence Academy Mahiti एन.डी.ए.

National Defence Academy Information in Marathi

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – एक गौरवशाली परंपरा

 • नॅशनल डिफेन्स अकादमी, म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एका हून एक सरस भारताच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शिलेदारांना जन्म देणारी अकादमी आहे.
 • सेवा परमो धर्म म्हणजेच “Service Before Self” हे ब्रीदवाक्य मिरवणारी आणि त्या प्रमाणेच वागणारी एक गौरवशाली परंपरा आहे.
 • नॅशनल डिफेन्स अकादमी ही आपल्या सैन्याच्या तिन्ही शाखांमध्ये सामील होण्यासाठी संयुक्त सेवा अकादमी आहे.
 • येथे एकदा प्रवेश मिळाला की आपल्याला सैन्याच्या सर्व बाबींची माहिती होऊन आपण पायदळ, नौदल किंवा वायुदलाचे कमिशन्ड ऑफिसर म्हणून रूबाबात सैन्यात रूजू होऊ शकतो. उगीच नाही येथून तयार झालेल्या ऑफिसर्स संकट समयी नेतृत्व करून लढले आणि त्यांनी 3 परमवीर चक्र, 12 अशोक चक्र, 31 महावीर चक्र, 160 वीर चक्र, 40 कीर्ति चक्र, आणि 135 शौर्य चक्र मिळविले. ह्या अकादमीने भारताला 11 सैन्य दल प्रमुख, 10 नौदल प्रमुख आणि 4 वायु दल प्रमुख दिले हे सर्व NDA चे माजी विद्यार्थी होते.
 • ह्यावरून लक्षात येते की भारताच्या संरक्षणाच्या बाबतीत NDA चा सिंहाचा वाटा आहे.

काय आहे एन.डी.ए.?

 • नॅशनल डिफेन्स अकादमी ही एक लष्करी शाळा असून तिची स्थापना 7 डिसेंबर 1954 ला झाली. ही अकादमी खडकवासला पुणे येथे 7,015 एकरात वसवलेली आहे. आणि ही अकादमी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू यूनीव्हर्सिटीशी जोडलेली आहे.
 • हिचा इतिहास मजेशीर आहे. ब्रिटीश राज्य असताना 1941 मध्ये सुदानला दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्यासाठी लढण्यास मदत करताना जे भारतीय सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ गौरव स्मृती बांधण्यास त्यावेळच्या व्हॉईसरॉयला सुदान सरकारने 100,000 पौंड दिले होते.
 • त्यावेळच्या कमांडर इन चीफ, फिल्ड मार्शल औचीन्लेक ह्याने एक कमिटी स्थापून ह्या पैशातून युनायटेड स्टेट मिलिटरी अकादमीच्या धर्तीवर “संयुक्त लष्करी सेवा अकादमी” स्थापन करण्याची शिफारीश केली.
 • त्यानुसार स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ही योजना अमलात आणायचे ठरले आणि एक तात्पुरती संयुक्त अकादमी Joint Services Wing [JSW] स्थापन केली गेली.
 • Joint Services Wing ही सध्या इंडियन मिलिटरी अकादमी म्हणून ओळखली जाते. ह्यामध्ये दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर सैन्य दलातील मुले मिलिटरी विंगला जात आणि नौदल आणि वायू दलाची मुले इंग्लंडला पुढील शिक्षण घेण्यास जात. त्यानंतर 7 डिसेंबर 1954 ला नॅशनल डिफेन्स अकादमीचे कार्य सुरू झाले.
 • सुदानमधील सैनिकांच्या स्मरणार्थ येथील अॅडमिनीस्ट्रेटीव्ह हेडक्वार्टरला “सुदान ब्लॉक” असे नाव दिले आहे.

अर्ज कसा करावा :

 • अकादमीत प्रवेश मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट आहे तसेच अत्यंत खडतर परीक्षेमधून उमेदवाराला निवडले जाते.
 • ही परीक्षा UPSC [Union Public Service Commission] तर्फे घेतली जाते आणि त्यांचा सगळा कार्यक्रम आधीच ठरविला जातो. लेखी परीक्षा NDA I आणि SSB परीक्षा NDA II पार करावी लागते.
 • प्रवेश मिळण्यासाठी जानेवारीत अर्ज मागवले जातात. जवळ जवळ 4,50,00 उमेदवार परीक्षा देतात आणि 6,300 उमेदवार NDA II साठी पत्र होतात.

परीक्षा आणि निकष :

 • फक्त भारत, नेपाळ आणि भूतान चे उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच तिबेट चे शरणार्थी,आणि म्यानमार, झाम्बिया, श्री लंका पाकिस्तान, यूगांडा, टांझानिया, मालावी, झैरे, विएतनाम आणि इथियोपिया येथील अनिवासी भारतीय जे कायम भारतात राहू इच्छितात ते पण अर्ज करू शकतात.
 • उमेदवाराचे वय 16 ते 18 वर्षे असावे लागते.
 • फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात.
 • उमेदवार 12 वी किंवा तत्सम परीक्षा मान्यताप्राप्त बोर्डातर्फे पास झालेला असावा आणि नौदल आणि वायुदलासाठी तो फिजिक्स आणि मॅथ्स सहित बारावी झाला असावा.
 • साधारण उंची 157 से. मी. आणि वायू दलासाठी 162.5 असावी. ह्यात ईशान्य पूर्व राज्यांसाठी 5 से.मी ची सूट आहे.
 • वजन उंचीप्रमाणे असून त्याचा तक्ता दिलेला असतो. साधारण 152 से मी. साठी 42 किलो ते 183 से.मी. साठी 65 किलो पर्यंत वजन चालते. वायु दलासाठी पायाची लांबी 99 से.मी ते 120 से.मी. लागते मांड्यांची लांबी 64 से.मी. लागते आणि बसल्यावर उंची 81.5 ते 96 से.मी लागते.
 • नौदलाला कमी वजन लागते. त्याचा उंची आणि वजन ह्याचा तक्ता दिलेला असतो.
 • लेखी परीक्षा 900 मार्कांची असते त्यात गणित 300 मार्कांचे आणि सामान्य पात्रता परीक्षा 600 मार्कांची असते. वेळ अडीच तास.
 • गणित 11 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमावर आधारलेले असते. कट ऑफ मार्कांच्या वरील उमेदवारांना NDA II म्हणजे SSB इंटरव्ह्यू ला बोलावले जाते.
 • हा पाच दिवसाचा कठोर परीक्षेचा काळ असतो. तुम्ही एका बलाढ्य देशाच्या सैन्याचे ऑफिसर म्हणून बाहेर पडत असता त्यामुळे उमेदवाराची सर्व तर्‍हेने कठोर निकष लावून निवड होते.
 • पाच दिवस तेथे राहावे लागते. तुमच्याबरोबर एक ग्रुप इन्सट्रकटर असतो तो तुमचे बारीक निरीक्षण करीत असतो.
 • ही परीक्षा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि सहकाऱ्याबरोबर मिसळण्याच्या क्षमतेची असते.
 • पहिल्याच दिवशी ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग ही परीक्षा होते त्यात तुम्हाला थोड्या अवधीसाठी चित्रे दाखवून त्यावर गोष्ट बनवायची असते. ह्या फेरीत जे बाद होतात त्यांना तेथूनच परत पाठवले जाते.
 • नंतरचे चार दिवस तुमचे विविध टास्क घेतले जातात जे तुम्ही NCC मध्ये शिकलेले असता. नंतर शब्द फक्त १५ सेकंद बघून त्यावर वाक्य बनवणे, एका मागून एक चित्र बघून कथा लिहिणे, प्रसंग बघून त्यावर मत देणे, आणि आपल्याबद्दल आपल्या नातेवाईकांना काय वाटते हे लिहिणे अशा परीक्षा असतात.
 • सर्वात शेवटी मानसिक क्षमतेच्या परीक्षेत तुम्हाला खूप आडवे तिडवे प्रश्न विचारले जातात आणि तुमचा संयम, योग्य आणि जलद निर्णय क्षमता, सारासार विवेकबुद्धी आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्यांचे मूल्यमापन केले जाते.
 • केवळ शौर्य असून चालत नाही. त्यानंतर ग्रुप चर्चा घेतली जाते आणि तुमचे संभाषण कौशल्य आणि आपला विचार मांडण्याची पद्धत ह्याचे मूल्यमापन केले जाते. ह्या सर्वातून जो सुखरूप बाहेर पडेल त्याला मेडिकल टेस्टला पाठवतात.
 • त्यात जो उमेदवार योग्य बसेल त्याला प्रवेश दिला जातो. ही परीक्षा पास होण्यासाठी क्लास असतात तेथे गणिताचे शॉर्टकट, वेगाने पेपर सोडविणे, शारीरिक कसरत आणि ग्रुप चर्चा आणि वेळेचे नियोजन शिकविले जाते.

निवड केल्यानंतर :

 • प्रवेश घेतल्यानंतर मुलांना त्यांच्या आवडीनुसार 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम दिला जातो. सायन्स आणि आर्ट्स ह्या शाखा असतात. एक परदेशी भाषा शिकणे अनिवार्य असते.
 • त्या अरेबिक, चिनी, फ्रेंच आणि रशियन. फौंडेशन कोर्स मध्ये मिलिटरी हिस्टरी, जॉग्रफी ,कम्प्युटर ,पोलिटीकल सायन्स ,शस्त्र, जिओपोलिटीक्स, ह्यूमन राइट, लॉ ऑफ आर्म्ड कॉनफ्लिक्ट आणि पर्यावरण हे विषय शिकवले जातात.
 • त्याच बरोबर सगळे खेळ पण असतात. कॅडेट आपल्या आवडीनुसार खेळत प्राविण्य मिळवतो. अकादमी मध्ये 18 स्क्वाड्रन आहेत. कॅडेट त्यातील एकात सामावला जातो.
 • प्रत्येक स्क्वाड्रन मध्ये 120 सिनियर आणि ज्युनियर असे कॅडेट असतात. त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असते जरी ते देशाच्या विविध भागातून आणि विविध रंग रूपाचे असतात.
 • स्क्वाड्रन अल्फा, ब्राव्हो, चार्ली, डेल्टा, एको, इत्यादी नावाचे असतात. 320 कॅडेट प्रवेशास पात्र होतात.त्यापैकी208 आर्मी,70 एअर फोर्स, आणि 42 नेव्ही साठी निवडले जातात.
 • आर्मीमध्ये अंतराचा अंदाज घेणे, भूपृष्ठाचा अभ्यास, टार्गेट ओळखणे आणि खुणावणे, वेषांतर, लपणे, तंबू टाकणे, वातावरणाचे आकाशाचे निरीक्षण, छोटी पलटण तयार करणे, सिग्नल देणे, आग विझविणे, आक्रमण, संरक्षण आणि गस्त, हत्यारे हाताळणे, खुणा करणे आणि रात्री गोळीबार करणे हे शिकविले जाते.
 • त्यासाठी कॅम्पस बाहेर कॅम्प घेतले जातात. त्यात नकाशा वाचणे, तंबू ठोकणे, वेब जोडणे, नेव्हीगेशन,चुंबक सूची पाहणे आणि नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते.

वायुसेना आणि नेव्ही फोर्स मध्ये प्रशिक्षण :

 • नेव्ही, नौदल कॅडेटना 3 वर्षे NDA मध्ये शिकल्यानंतर इंडियन नेव्हल अकादमीत पाठवविले जाते. तेथे ते BSC ,MSC किंवा B. Tech डिग्री मिळवितात.
 • त्यांना मुंबईच्य नेव्हल डॉक मध्ये सर्व जहाजे, पाणबुड्या, शॉप फ्लोअर ह्यांची माहिती दिली जाते. त्यानंतर त्यांना नेव्हल अकादमी एझीमाला येथे ओपन सी व्हेलर सेलिंग एक्सपिडिशनला पाठवले जाते जिथे त्यांच्या आधीचे कॅडेट शिकत असतात.
 • पिकॉक बे येथे सिमन शिपचे क्लासेस घेतले जातात अणि 3 D मॉडलच्या सहाय्याने अणि CAI व् CBT पॅकेज वापरून शिकवले जाते.
 • एअर फोर्स- एअर फोर्स ट्रेनिंग टीम AFTT मध्ये विमानांचे मोडेल, ग्राउंड ट्रेनिंग, रेडीयो टेलेफोनी सिम्युलेटर आणि फ्लाईट सिम्युलेटर अशा गोष्टी शिकविल्या जातात.
 • डीमोना ह्या सुपर एअरक्राफ्ट वर पायलट चे ट्रेनिंग दिले जाते.
 • त्यासाठी कॅम्पस मध्ये paved रनवे आणि एअर ट्राफिक कंट्रोल, स्वयंचलित व्हेदरस्टेशन आहे जेथून 6 विमाने उड्डाण करू शकतात.
 • पदनिहाय सूची आणि त्यांना मिळणारे वेतन – खाली प्रत्येक शाखेचे पद निहाय सूची दिली आहे. त्यांना मिळणारे वेतन आणि मानाचे पद पाहिल्यावर कळते की किती आकर्षक करियर आहे हे.

NDA Salary in Marathi

सर्व अभ्यासक्रम झाल्यावर दीक्षांत समारोह होतो त्यात चांगले नैपुण्य मिळालेल्या कॅडेटना आणि स्क्वाड्रनला बक्षीस दिले जाते आणि टोप्या उडवून ते हर्षाने भारत मातेच्या सेवेत रूजू होतात.

National Defence Academy Information in Marathi / Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *