Home » Tips Information in Marathi » IAS Officer Information in Marathi | आय ए एस ऑफिसर माहिती | Essay, Mahiti

IAS Officer Information in Marathi | आय ए एस ऑफिसर माहिती | Essay, Mahiti

IAS Officer Marathi

IAS Officer Information in Marathi

आय ए एस ऑफिसर

आय ए एस ऑफिसर म्हणजे? :

 • भारतीय प्रशासकीय सेवा हे भारत सरकारकडून सिविल सर्विसेस साठी घेतली जाणारी परीक्षा आहे. भारतातील सर्वात कठीण परिक्षेपैकी ही एक परीक्षा आहे. अत्यंत मनाचे आणि आदराचे हे आय ए एस ऑफिसर आहेत, संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटावा असेच हे पद आहे. हे भारत सरकारची प्रमुख प्रशासकीय नागरी सेवा आहे. आय ए एस हे सर्वोच्च प्रशासकीय पद आहे.
 • या पदाच्या सर्वात योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सिव्हिल सर्विसेस परीक्षा यूपीएससी मार्फत घेतल्या जातात. यासाठी होणारी परीक्षा हे अत्यंत कठीण असते आणि यासाठी होणाऱ्या सर्व कठीण परीक्षा पस होताना उमेदवाराच्या सायमचा कास लागत असतो, या सर्व परीक्षा पस होण्यासाठी द्येय आणि मेहनती बरोबरच अंगात अतिशय सय्यम आणि जिंकण्याची जिद्द अतिशय जरुरी असते.

आय पी एस ऑफिसर बनण्यासाठीची पात्रता :

 • शैक्षणिक पात्रता – यूजीसी ने मान्यता दिलेल्या कोणत्याही महाविद्यालयातून उमेदवाराने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण गरजेचे आहे किंवा तत्सम पदवी असणे आवश्यक आहे. तसेच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेले आणि निकालाची वाट बघत असलेले विद्यार्थी देखील पूर्व परीक्षा देऊ शकतात. एमबीए किंवा वैद्यकीय पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या उमेदवारांना देखील हेच नियम लागू आहेत.
 • वयोमर्यादा – ही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा २१ वर्षे आणि किमान मर्यादा ३२ वर्षे आहे. तसेच अनुसूचित जाती जमातीमधील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३७ वर्षे तर ओबीसी उमेदवारांसाठी ३५ वर्षे आहे.
 • राष्ट्रीयत्व – परीक्षा देणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच १९६२ नंतरचे त्याचे वास्तव्य भारतात असणे आवश्यक आहे.

आय ए एस ऑफिसरच्या जवाबदारी :

 • आय ए एस ऑफिसर हे भारतातील एक अत्यंत आदरणीय पद आहे, यांच्यावरती अत्यंत खास जवाबदारी दिलेल्या आहेत आणि अतिशय मुश्किल आणि कठीण प्रसंगात दबाव हाताळण्याचे प्रशिक्षण याना दिले जाते. दबाव हाताळण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टया महत्वाचे असणारे सर्व कौशल्य यांच्यामध्ये विकसित केले गेले जाते ज्यामुळे अत्यंत महत्वाच्या जवाबदाऱ्या अतिशय कुशलपणे हे सांभाळू शकतात.
 • सुरवातीला आयएएस अधिकारी उपविभागीय स्तरावर राज्य प्रशासनात सामील होतात आणि उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्यांची सेवा सुरू करतात आणि त्यांना नेमलेल्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था, सामान्य प्रशासन आणि विकास कामे पाहतात.
 • सामान्यपणे ओळखले जाणारे जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त हे आय ए एस ऑफिसर असतात जे जिल्हा पातळीवर काम बघतात.
 • राज्य, केंद्र किंवा इतर अनेक पदांवर हे आपली सेवा देऊ शकतात.
 • केंद्रामध्ये, सचिव, अतिरिक्त सचिव, संचालक अशा अनेक उच्च पदावर यांच्या अनुभवानुसार यांची नेमणूक केली जाऊ शकते.
 • उच्चपदस्थ अधिकारी म्हणून देशाची मान, मर्यादा राखणे आणि संरक्षण करणे ही यांच्यावर असलेली सर्वात मोठी जवाबदारी आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हे काही नोकरी किंवा व्यवसाय नाहीये तर याला सेवा असे म्हंटले गेले आहे. आकर्षक पगारासाठी जर कुणी ही सेवा करू इच्छित असेल तर त्यांना कधीही या परीक्षांमध्ये यश मिळणार नाही. प्रत्येक वेतन आयोगानुसार यांचा पगार वाढत असतो आणि त्याच बरोबरीने अनेक शासकीय सुविधा देखील उपलब्ध असतात. परंतु हे एक देश सेवा आहे आणि जर ती तुम्ही निष्ठेने केली तर पगार देखील निश्चितच चांगला असेल.

IAS Officer Information in Marathi / Wikipedia Essay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *