Home » Tips Information in Marathi » Indian Navy Information in Marathi | भारतीय नौदलाची माहिती | Essay | Mahiti

Indian Navy Information in Marathi | भारतीय नौदलाची माहिती | Essay | Mahiti

Indian Navy Marathi Mahiti

Indian Navy Information in Marathi

भारतीय नौदल

कोणत्याही देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणे आणि परकीय आक्रमणापासून त्या देशाचे रक्षण करणे हे नौदलाचे मुख्य काम असत. अथांग पसरलेल्या निळ्या समुद्रात जिथे दृष्टी जाईल तिथपर्यंत फक्त पाणी, जमीनच नमुनिशाण देखील नाही अशा परिस्थिती देखील आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणारे असे हे नौदल आहे. तसेच इतर देशांच्या सशस्त्र दलाच्या मदतीने सय्यम, शांतता प्रस्थापित करणे असे आहे. भारतीय नौदल हे जगातील ५ व्या क्रमांकाचे नौदल आहे. संकटांच्या भरती ओहोटीला न घाबरता देश संरक्षणाचे काम अविरत चालू असते.
.
नौदलाचे ब्रीदवाक्य :

 • शं नो वरुणः . हे भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य आहे ज्याचा अर्थ जल प्रलय आमच्यासाठी शुभ होवो असा आहे. नौदलाचे जवान प्रचंड सागरी लाटांना कापत आपले ब्रिवाक्य सार्थ करतात.
 • त्यांचा शुब्भ्र पांढरा गणवेश त्याच्या साफ देशभक्तीची ग्वाही देत असतो. कठोर परिश्रम आणि मेहनत करून आपल्या देशाचे ते प्रत्येक परिस्थिती रक्षण करतात.

Swine F नौदलाचा इतिहास :

 • छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचा जनक मानले जाते. चौल राजाच्या साम्राज्याच्या नौदल विस्ताराचा देखील इतिहासात मोठा उल्लेख सापडतो.
 • १९३४ मध्ये भारतीय नौदलाची अधिकृत घोषणा करण्यात अली. तेव्हा भारतीय नौदलाचे नाव रॉयल इंडियन नेव्ही असे होते. भारताच्या स्वातंत्र्य नंतर रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला आणि इंडियन नेव्ही असे नामकरण करण्यात आले.
 • १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारताला विजय मिळवून देण्यात खुप मोठी कामगिरी केली, आणि ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
 • १९५३ मध्ये क्षेपणास्त्र नौका आणि १९७३ मध्ये पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाले.

नौदलाचे सामर्थ्य :

 • भारतीय नौसेना प्रमुख ऍडमिरल करमबीरसिंग हे आहेत. तर भारताचे राष्ट्रपती हे सेनापती आहेत. भारतीय नौदलाकडे १५५ नौकांचा ताफा आहे.
 • विमानवाहतूक नौका आहेत, पाणबुड्या, विनाशक, क्षेपणास्त्र मारक नौका, गस्त नौका देखील आहेत. तसेत २०० मारिन कमांडरनि सुसज्ज असे आपले नौदल आहे. अण्वस्त्र हल्ल्याना तोंड देण्याची क्षमता असलेली आई एन एस अरिहंत हि भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी आहे.
 • आई एन एस विक्रमादित्य, आई एन एसविशाल सारखे ऐरकराफ्ट कॅरियर, आई एन एस चक्र, आई एन एस कालवारी आपल्या नौदलाला अधिक सामर्थ्यवान बनवतात.
 • भारतीय नौदल वायू सेना हे भारतीय नौदल आणि वायूदल यांची एक महत्वाची संयुक्त शाखा आहे. या संस्थेचे प्रमुख काम हे पाणबुड्यांपासून संरक्षण करणे,पाणबुडीविरोधी युद्ध करणे, सागरी हवाई सीमेचे संरक्षण करणे हे आहे.
 • या अंतर्गत मिकोयन मिग २९ के, एमआयजी -29 केयूबी, बोईंग पी -8 आय नेपच्यून हे विमाने तर एचएएल ध्रुव, एचएएल चेतक असे हेलिकॉप्टर आहेत. भारतीय नौदलामध्ये एककून २3५ विमानांचा ताफा आहे.

भारतीय नौसेना पदक :

 • जमिनीपासून दूर समुद्रात राहताना अनेक अडचणींना सामर्थ्याने सामोरे जाणाऱ्या भारतीय नौसेनेच्या जवानांना सलाम. समुद्रात येणाऱ्या प्रत्येक आवाहनांना तोंड देत आपल्या देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करताना त्यांना काय काय करावे लागत असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
 • सागरी सीमेवर गस्त घालणे, कधी शत्रूच्या जहाजांशी समोरासमोर युद्धा करणे तर कधी पानबुद्धीच्या छुप्या हल्ल्यापासून सावध राहणे.
 • नौसेनेच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांनादेखील त्यांच्या शौर्याबद्दल अनेक मेडल्सनी गौरवण्यात येते, जसे वीरचक्र, अशोकचक्र, शौर्यचक्र, कीर्तीचक्र.

प्रशिक्षण :

 • सैन्यात सेवेसाठी रुजू होण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे प्रशिक्षण. अतिशय कठीण आणि परीक्षा बघणारे प्रशिक्षण. नौदलाच्या सर्वाना असे प्रशिक्षण दिलेले असते.
 • त्यामध्ये त्यांना खासकरून जहाजावरील जीवनाचे ट्रैनिंग दिले जाते. त्यांना जास्तीत जास्त काळ समुद्रात काढावा लागतो त्यासाठी लागणारे मानसिक आणि शारीरिक ट्रैनिंग त्यांना दिले जाते.
 • तसेच जहाज चालवणे, पाणबुडीचे तंत्र अशा सगळ्या गोष्टीबद्दल प्रशिक्षण दिले जाते.

नौसेनेतही महिलाशक्ती :

 • कोणत्याही क्षेत्रात मागे नसलेल्या महिला देश संरक्षणात तरी कशा मागे राहतील??? डॉ. पुनीत अरोरा या १९६८ मध्ये कमिशनर झाल्या.
 • लेफ्टनंट जनरल म्हणून भारतीय नौदलातील २ऱ्या सर्वोच्च पदाला पोचणाऱ्या त्या प्रथम महिला होत्या आणि पहिल्या महिला व्हॉईस ऍडमिरल देखील आहेत.
 • तसेच पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत . २०१९ मध्ये उप- लेफ्टनंट शिवांगी या नौदलाच्या प्रथम महिला पायलट झाल्या आहेत.

युद्ध नौका बांधणी :

 • भारत मध्ये युद्ध नौका बांधणी कारखाने आहेत ज्यामध्ये भारतीय बनावटीच्या युद्ध नौका बनवल्या जातात. माझगाव गोदी येथे १९६६ साली युद्धनौका बांधणीसाठी सुरवात करण्यात अली होती.
 • आजपर्यंत येथे ८० नौकांची बांधणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पाणबुडी, युद्धनौका, टेहळणी नौका यांचा समावेश आहे.
 • माझगाव गोदी हे भारतातील एक अत्यंत महत्वाचे जहाजबांधणी केंद्र आहे. १९३४ साली यांची एक सार्वजनिक कंपनी म्हणून अधिकृत नोंदणी करण्यात आली. पुढे सन १९६० मध्ये याचे राष्ट्रीयकरन झाले. सध्या हा प्रकल्प भारत सरकारच्या अधीन आहे.

इतर देशाशी संबंध :

 • भारताचे आणि भारतीय सेनेचे बाहेरील देशांशी नेहमीच चांगले संबंद राहिले आहेत. भारत हा एक शांतता प्रिय देश आहे आणि कधीही पहिले हमला करत नाही. संरक्षण हाच भारताचा पवित्र आहे.
 • इतर देशांना मैत्रीपूर्ण मदत करणे आणि संकट काळात मदतीचा हात पुढे करणे हे भारतीय सैन्याचे मोठे काम आहे. २००४ साली आलेल्या त्सुनामी मध्ये भारतीय नौसेनेने श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदत केली होती.
 • भारतीय नौदल इतर देशांच्या आग्रहास्तव त्यांच्या सोबत युद्धाभ्यास, युद्ध कौशल, प्रशिक्षण कवायती करू लागले. याद्वारे भारताचे इतर देशांसोबतचे संबंध अधिक बळकट होऊ लागले आहेत.
 • तसेच इतर देशाच्या सीमेतदेखील भारतीय नौसेना रक्षणासाठी तैनात आहे. भारतीय समुद्री मार्ग व्यापारासाठी नेहमीच सर्वांसाठी नेहमीच खुले.
 • ते मार्ग सुरक्षित असावेत यासाठी भारतीय नौदल नेहमीच प्रयत्नशील असते. ऑपरेशन सी वेव्हस, ऑपरेशन गंभीर, ऑपरेशन इंद्रधनुष्य,ऑपरेशन कॅस्टर हे नौदलाची काही दुसऱ्या देशात राबवलेली ऑपरेशन आहेत.

नौसेनेवरील चित्रपट :

 • भारतीय नौदलातील असे अनेक कामगिरी आहेत जे कदाचितच सामान्य नागरिकांपर्यंत पोहचते. सागराच्या अथांग पाण्यात लाटांना तोंड आपली कामगिरी ते चोख बजावत असतात.
 • रुस्तुम, गाझी द अटॅक अशा बॉलीवूड चित्रपटातून आजपर्यंत न समजलेल्या अनेक घटना उलगडून दाखवलेल्या आहेत.

Indian Navy Information in Marathi / Wikipedia Essay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *