Kangaroo Information in Marathi | Mahiti, Short Essay | कांगारू

Kangaroo Information in Marathi

.

वन्य प्राणी : कांगारू माहिती

  • कांगारू हा दिसायला जरी गायी हरीण ह्यांच्यासारखा असला तरी तो साहित्यात एक मजेदार प्राणी म्हणून गणला गेला. खिशामध्ये पाडस ठेवून उड्या मारीत जाणारे त्याचे मजेदार रूप पाहून खरच हसू येते.
  • “शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा” ह्या गाण्यात अशा ओळी आहेत – “कांगारू म्हणाले माझे काय? तुझे काय? शेपटी म्हणजे पाचवा पाय”
  • एक कांगारू मादी दुसरीला म्हणाली, “आज माझा खिसा कापला गेला.” अशा तर्‍हेने त्याच्यावर जोक्स पण आहेत.
  • कांगारू हा मुख्यत्वेकरून ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे. ऑस्ट्रेलियाचा तो राष्ट्रीय प्राणी आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांच्या पोशाखावर आणि इतर सरकारी चलनावर, सरकारी संस्थांवर आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स वर देखील कांगारू हे सन्मानचिन्ह म्हणून वापरतात.
  • ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. त्यांच्या क्रिकेट टीमला देखील कांगारू म्हणतात.
  • नर कांगारूला बक, बुमर, जॅक किंवा ओल्ड मॅन म्हणतात. मादीला डो,फ्लायर,किंवा जिल्स म्हणतात आणि बछड्याला /वासराला जोई म्हणतात.
  • असा हा गाय किंवा घोड्यासारखा, माणसासारखा उभा राहणारा, आणि शेपटी म्हणजे पाचवा पाय असणारा प्राणी म्हणजे प्राचीन काळातल्या उत्पत्तिशास्त्राला आव्हानच आहे हे खरे!
  • कांगारू हा थोडासा घोडा किंवा गाढवासारखा दिसणारा प्राणी आहे. आणि तो शाकाहारी असून गायी सारखा रवंथ करतो.

कंगारूचे आकार व प्रकार :

  • कांगारू लाल आणि करड्या रंगाचे असतात.
  • कांगारू हा सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या मारसुपिलीया वर्गातील माक्रोपोडी [लांब पायांचे ] कुटुंबातील प्राणी आहे.
  • कांगारूमध्ये लाल कांगारू,अॅन्टीलोपाईन कांगारू, पूर्वेकडील करडे कांगारू आणि पश्चिमेकडील करडे कांगारू असे प्रकार आहेत.
  • कांगारूमध्ये वालारू, वालारूस, वालाबी असेही प्रकार आहेत. मोठ्या कांगारूंना कांगारू म्हणतात आणि मध्यम व छोट्या कांगारूंना वालारूस व वालाबी म्हणतात.
  • अगदी लहान वालाबीची लांबी ४५ ते १०५ से.मी. असते आणि वजन १.६ कि.ग्रा. असते वालारुसची लांबी ६० ते ७०से.मी. आणि वजन 19 ते २२ कि.ग्रा. असते. मोठे कांगारू २ मीटर लांबीचे असून वजन 90 कि.ग्रा. असू शकते.
  • त्याचे दात गवतातील सिलिकॉनमुळे पडतात आणि परत उगवतात. त्यामुळे कांगारूंना आयुष्यभर दात येत राहतात जे फक्त हत्तीच्या बाबतीत घडते.
  • त्याचे पुढचे पाय लहान असून त्याला हाताच्या बोटांसारखे बोटे आणि नखे असतात. मागचे पाय मात्र अत्यंत मजबूत असून लांब असतात म्हणूनच त्यांना मॅक्रोपोडी म्हणतात.
  • शरीराच्या मनाने डोके लहान असते आणि कान मोठे असतात.

कंगारूचा व्यवहार :

  • कांगारू हा निशाचर प्राणी आहे. पण ते दिवसापण हिंडतात. त्यांच्या उड्या मारत चालाण्यामुळे ते खूप वेगाने धावू शकतात.
  • एक उडी ९ मीटर ते १३.५ मीटरची असू शकते आणि ते ५५ की.मी ने धावू शकतात. लाल कांगारू मात्र कमी वेगाने धावून पायांच्या स्नायुंना ऊर्जा पुरवतात.
  • कांगारूंचे शत्रू म्हणजे डींगो नावाचे कुत्रे, तसेच शिकारी जे त्यांचे मांस खातात.
  • कांगारू पोहू शकतात त्यामुळे ते बचाव करण्यासाठी पाण्यात शिरतात आणि पोहत असता मध्येच वळून पाठलाग करणाऱ्या प्राण्याचे डोके आपल्या शक्तिशाली पंज्यात पकडून त्याला पाण्यात बुडवून मारतात. तसेच त्यांचे मागचे पाय पण उत्तम लाथ मारू शकतात.
  • गिधाडे, साप ,अजगर, कोल्हे,जंगली मांजरी पण त्यांचे शत्रू आहेत.

कंगारूचे प्रजनन :

  • एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियात कांगारूंच्या शिकारीला बंदी नाही. कारण त्यांचे प्रजनन इतके वेगाने होते की जर ती संख्या कमी नाही झाली तर माणसाला त्या बेटावर पाय ठेवायला जागा राहणार नाही.
  • कांगारू मादीकडे कायम एक पिल्लू असते. हे म्हणजे आपल्याकडे कबुतरांसारखे आहे. एक पिल्लू चालते फिरते झाले की लगेच दुसरे पिल्लू खिशातून पाऊच मधून डोकावायला लागते.
  • त्यामुळे तिच्या खिशात एका वेळी वेगवेगळ्या अवस्थेतील पिल्ले असतात. आणि त्यांना ती आपल्या स्तनांनी वेगवेगळे दूध पाजते.
  • ३१ ते ३६ दिवसात पाडस जन्माला येते आणि जन्मल्याबरोबर ते खुरडत आपल्या पंज्यांनी तिच्या खिशात पोहोचते. तेथे ते लगेच तिच्या स्तनांना चिकटते आणि दूध प्यायला सुरवात करते. असे ते ९ महिने राहते आणि मग बाहेर पडते.
  • जर चारा भरपूर असेल तर मादी लगेच दुसऱ्या फलित अंड्यातील पाडस जन्माला घालते. ते पिल्लू आणि वाढत असलेले पिल्लू तिच्या खिशात गुण्यागोविंदाने नांदत असतात. आणि खिशातून डोकावून पाहून परिस्थितीचा अंदाज घेत असतात.
  • जर चारा मुबलक नसेल तर मादी अंडे गोठवून ठेवते आणि अनुकूल वातावरण झाले की काढते. ह्याला “डायापॉज” म्हणतात.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Essay Composition / Information about Kangaroo in Marathi Language – Wikipedia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *