Skip to content

Hippopotamus Information in Marathi | हिप्पोपोटॅमस माहिती

Hippopotamus Marathi Mahiti

Hippopotamus Information in Marathi

हिप्पोपोटॅमस माहिती

गोड्झीला सिनेमात त्या महाकाय प्राण्याला बघून हे वाक्य म्हटले गेले होते. ते खरेच आहे हे हिप्पोला पाहिल्यावर वाटते. खरोखर ज्युरासिक एरा पैकी जे तीन महाकाय प्राणी हत्ती, जिराफ आणि हिप्पो राहिले आहेत, त्यात हिप्पो खरच महाकाय राक्षस आहे. हत्ती आणि जिराफाची एव्हडी भीती वाटत नाही. कारण ते पूर्ण शाकाहारी आहेत आणि माणसाबरोबर राहिले आहेत. पण हिप्पोने “रंग माझा वेगळा“ म्हणत सगळ्यांना धाकात ठेवले आहे. हिप्पो भयंकर आक्रमक आणि अंदाज येऊ न देणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणीही जात नाहीत. त्यातून त्याचे भयानक रूप, मोठा थोरला आ वासलेला जबडा, त्यात भयंकर दात आणि रानडुकरासारखे डोळे आणि फेंदारलेल्या चपट्या नाकपुड्या ह्या सर्व अवतारामुळे तो आणखीनच भयानक वाटतो.

हिप्पोपोटॅमसच्या प्रजाती:

हिप्पो हा प्राणी जगतातील सस्तन प्राण्यांच्या वर्गात मोडतो आणि हिप्पोपोतेमिडी ह्या कुटुंबात आहे. तो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहतो म्हणून तो अम्फिबियान प्रजातीतील आहे.ह्याच्या बाकी सर्व प्रजाती नष्ट झाल्या असून फक्त दोनच शिल्लक आहेत त्या म्हणजे अम्फिबियान आणि पिग्मी. ह्याचे डुकराशी साधर्म्य असल्याने १९०९ पर्यंत ह्याला डूकराच्याच गटात घातले होते,पण DNA आणि इतर फोसिल्सच्या संशोधनातून असे आढळून आले की तो देवमासा, आणि डॉल्फिन ह्या सस्तन जलचरांच्या ६० मिलियन वर्षापूर्वीच्या पूर्वजांशी साधर्म्य दाखवतो.

शारीरिक माहीती :

त्याचे बॅरलसारखे शरीर आहे आणि प्रचंड मोठे तोंड आहे.ह्याचा रंग काळपट करडा असतो. पाय हत्तीसारखे असून अंग्युलेत बोटे म्हणजे समान आकाराची बोटे असून दोन बोटांवर शरीर तोलले जाते. अंगावर बिलकुल केस नसतात.कातडी ६ इंच जाड असते.त्यामुळे त्याचे संरक्षण होते. आणि सूर्याच्य UV किरणांनी त्रास होऊ नये म्हणून परमेश्वरानेच ह्यांना सनस्क्रीन दिले आहे.ते म्हणजे ह्यांच्या कातडीतून एक स्त्राव वाहतो.त्याचा रंग आधी पांढरा मग लाल आणि नंतर काळा होतो. त्याला ब्लड स्वेत म्हणजे रक्ताचा घाम असे म्हणतात पण त्यात दोन्हींचा लवलेश नसतो.त्यामुळे त्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते आणि पाण्यातील जीवजन्तुपासून संरक्षण होते. ह्याचे वजन प्रचंड असते. म्हणजे नराचे वजन १५०० किलो ते २०६२ किलोपर्यंत पण आढळले आहे. मादीचे वजन १३०० किलो असते. गम्मत म्हणजे एव्हढे वजन घेऊन हा जमिनीवर ताशी ३० किलोमीटर वेगाने पळतो आणि माणसांना मारतो. कारण सर्वसाधारण माणसे १० ते १५ किलोमीटर ताशी पळू शकतो.पण हिप्पो पाण्यात एव्हढ्या वेगात पोहू शकत नाही जरी त्याला बोटांना जाळे /वल्हे असले तरी.

हिप्पोपोटॅमसचे आयुष्य :

ह्याचे आयुष्य साधारण ३० ते ४० वर्षे असते.हा शक्यतो नदीच्या दलदलीत, तिवरांच्या जंगलात असतो. एक नर ज्याला बुल म्हणतात आणि ५ ते ३० माद्या आणि बछडे असा हा परिवार म्हशींसारखा पाण्यात डुंबत असतो आणि श्वासासाठी फक्त तोंडे म्हणजे नाकपुड्या पाण्याबाहेर ठेवतो. विशेष म्हणजे पाण्यात त्याला दर दोन तीन मिनिटांनी नाकपुड्या पाण्याबाहेर आणाव्या लागतात आणि हे काम झोपेत पण चालू असते. त्याला एकट्यानेच चरायला आवडते. कळप करून नाही. तसेही त्याच्या वाटेला सिंह,वाघ पण जात नाहीत तर इतर प्राण्यांची गोष्टच सोडा. तरीही त्याला पण त्याच्या मांसासाठी आणि दातांसाठी मारले जाते. तसेच पाण्यामध्ये मगरींचे आणि त्याचे अस्तित्वासाठी आणि प्रदेशासाठी युद्ध होते. छोट्या हिप्पोला सिंह आणि तरस खातात.

हिप्पोपोटॅमसचे प्रकार :

हा सर्कशीत आणि प्राणीसंग्रहालयात पण पाळला जातो. सर्कशीत कमनीय मुलगी मोठा पावाचा लोड त्याला भरवताना दाखवतात तेंव्हा त्याचे मोठे वासलेले तोंड बघूनच धडकी भरते.ह्याच्या ५ जाती त्याच्या शरीर रचनेवरून आणि भोगौलिक स्थानावरून केलेल्या आहत.

१. नाईल हिप्पो : हे इजिप्त ते टांझानिया या प्रदेशात विखुरलेले आहेत.
२. इस्ट आफ्रिकन हिप्पो: हे ग्रेट लेक रिजन, केनयात आहेत.
३. केप हिप्पो किंवा दक्षिण आफ्रिकन हिप्पो: हे झाम्बिया ते दक्षिण आफ्रिका येथे आहेत.
४. पश्चिम आफ्रिकन हिप्पो किंवा छाड हिप्पो: पश्चिम आफ्रिका ते छाडपर्यंत.
५. अंगोला हिप्पो: अंगोला, कांगो आणि नामिबिया येथे.

हिप्पोपोटॅमस काय खातो :

हा जास्ती करून गवत खाणारा असला तरी तो इतर प्राणी पण खातो आणि त्याचे जठर तीन भागांचे असते पण तो रवंथ करीत नाही. गवत खाण्यास तो रात्री पाण्यातून बाहेर येतो. जवळ जवळ एक हिप्पो ६८ किलो गवत खातो. {म्हणूनच तो एकटाच चरतो} अन्न कमी असेल तर तो मासांवर पोट भरतो. हिप्पो गावात खाण्याच्या सीमा आखतो. कुत्रे जशी त्यांची टेरीटेरी म्हणजे इलाका ठरवण्यासाठी लघवीचा उपयोग करतात तसे हिप्पो त्यांच्या शेणाचा उपयोग करतात. ते शेपटी हलवून जास्तीत जास्त टापू त्यांच्या अधिपत्याखाली येईल असे बघतात. बुल हिप्पो एकटाच चरतो तर जवान हिप्पो त्यांचे कोंडाळे करून आणि बाया म्हणजे माद्या त्यांचे कोंडाळे करून चरतात.

हिप्पोपोटॅमस प्रजनन:

हिप्पो गुरगुरून आवाज देतात. ते पाण्याखाली असले तरी त्यांचा आवाज बाहेर पण पसरतो.इतर प्राण्यांना घाबरविण्यासाठी ते जबडा १८० डिग्री मध्ये वासतात. मादी ३ ते ४ वर्षात मूल जन्माला घालू शकते.नर ७ ते ८ वर्षात तयार होतो. ८ महिन्यांनी पिल्लू जन्माला येते. पिल्ले जन्मण्याचा काळ म्हणजे पावसाळ्या नंतर. सामान्यपणे एकच पिल्लू असते पण कधी कधी जुळे पण असते.पिल्लू २५ ते ३० किलोचे असते. पाण्यातच बाळंतपण होते. मादी सर्वांपासून वेगळी होऊन पिल्लू जन्माला घालते. पिल्लू झाल्याबरोबर श्वास घेण्यास पोहायला लागते. मादीला एक पिल्लू झाल्यावर १७ महिने दुसरे होत नाही.लहान पिल्ले नर्सरी मध्ये असतात जेथे त्यांना एक दोन मोठे हिप्पो सांभाळतात.

हिप्पोपोटॅमस इतिहास:

हिप्पो ४००० ते ५००० वर्षांपूर्वीपासून ग्रीक आणि रोमन शिलालेखात आढळतात. प्राचीन इजिप्त मध्ये त्याला देव मानले होते आणि त्याला गरोदरपणा आणि बाळंतपणात संरक्षण देणारा मानले जाते.आफ्रिकेत त्याचा मुखवटा सणात वापरतात आणि त्याचे हस्तीदन्तासारखे दात दागिन्यात वापरतात. आफ्रिकेतील बऱ्याच दंतकथांमध्ये हिप्पो आहे. सान नावाच्या जमातीत अशी कथा आहे की हिप्पोला देवाने पाण्यात राहण्यास मज्जाव केला कारण हा सगळे मासे खाऊन टाकील. तेंव्हा हिप्पोच्या विनवणी वरून देवाने त्याच्याकडून वचन घेतले की तो फक्त गवत खाईल आणि पाण्यात राहू दिले. तसेच दुसरी कथा अशी की हिप्पोला केस होते पण दुष्ट सश्याने ते जाळले आणि हिप्पो बचावासाठी पाण्यात शिरला आणि नंतर लाजेने तिथेच राहिला. हिप्पो वरून गाणे पण आहे जसे “हिप्पो पोलका” आणि I want hippo for Christmas” बऱ्याच कार्टून फिल्म मध्ये हिप्पोचे कार्टून आहे.

असा हा भयानक तरीही प्राचीन अस्तित्वाच्या खुणा असलेला प्राणी फक्त आफ्रिकेत जाऊनच पाहायला मिळेल.

Wikipedia Essay, Information of Hippopotamus in Marathi Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *