Skip to content

Rhinoceros Information in Marathi || Genda गेंडा Rhino Mahiti Essay

Rhino essays

Rhino Information in Marathi

वन्य प्राणी : गेंडा माहिती

 • गेंडा, नावासारखाच ओबडधोबड पण जगातील प्रचंड प्राण्यांपैकी एक आणि आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला प्राणी!
 • गेंडा हा सस्तन प्राणी वर्गातील ‘ऱ्हीनोसेरोटीडी’ ह्या कुटुंबातील प्राणी आहे. “ऱ्हीनोसेरस” हे त्याचे जीवशास्त्रीय नाव आहे. त्याचाच अपभ्रंश “ऱ्हीनो” असा केला जातो.
 • गेंडाहा जगातील सध्या अस्तित्वात असलेल्या पाच प्रजातीपैकी एक आहे ज्यांचे पूर्ण वजन पाच बोटांपैकी एकाच बोटावर पेललेले असते. इतर बोटे कामाचे नसतात किंवा अस्तित्वात नसून त्यांचे लहान अवशेष असतात.
 • ह्या टनावारी वजन असलेल्या प्राण्याच्या बऱ्याच जाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्याच्या नाकावर असलेले शिंग.
 • हा १४ ते १५ लाख वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेला प्राणी फक्त त्याच्या शिंगाच्या तस्करीमुळे घोर संकटात आला आहे.
 • गेंड्याचे शिंग हे इतर प्राण्यांसारखे धारदार नसून ते आपली नखे आणि केस ज्याच्यापासून बनतात त्या केरोटीन ह्या पदार्थाचे बनलेले असते.
 • उत्पत्ति शास्त्राप्रमाणे गेंडा घोडा ह्या प्राण्याच्या जवळचा आहे जरी तो हत्तीसारखा दिसतो. पूर्वी गेंडे उंच आणि लांब पायाचे होते.
 • हा शाकाहारी प्राणी असून एकावेळी १२५ पौंड गवत खातो. ह्यांच्या कळपाला ‘क्रॅश’ किंवा ‘हर्ड’ म्हणतात.
 • ह्याचा प्रचंड आकार आणि नाकावर शिंग ह्यामुळे जरी तो भयानक वाटला तरी तो आक्रमक नाही पण स्व-संरक्षणासाठी तो चाल करून येतो. अर्थात तो जेव्हा ४० कि.मी वेगाने येतो तेंव्हा त्याच्या वाटेला न जाणे श्रेयस्कर आहे.
 • जगामध्ये गेंड्यांच्या पाच जाती आहेत. त्यापैकी दोन आफ्रिकेमध्ये आणि तीन आशियामध्ये आहेत.

आफ्रिकन गेंडे :

 • आफ्रिकन गेंडे हे १४ दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात आले. ह्यांमध्ये पांढरे आणि काळे गेंडे अशा दोन जाती आहेत. त्यांना दात नसतात आणि ते ओठांनी चरतात.
 • पांढरे गेंडे हे वस्तुत: पांढरे नसतात. उत्तरेकडील पांढरे गेंडे पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या फक्त दोन माद्या प्राणी संग्रहालयात शिल्लक आहेत.
 • काळे गेंडे त्या मनाने लहान असतात. त्यांची उंची १.५० मीटर ते १.७५ मीटर असते आणि लांबी ३.५ मीटर ते ३.९ मीटर असते.
 • आफ्रिकन गेंड्यांना दोन शिंगे असतात. पुढचे ठळकपणे दिसते आणि मागचे त्यामानाने लहान असते. ते जवळपास ९० से.मी. ते १५० से. मी. असते. पांढर्‍या गेंड्याच्या मानेवर एक वशिंड असते.
 • आफ्रिकन गेंडा नराचे वजन २४०० किलो असते आणि मादीचे १५५० किलो असते. पूर्ण वाढलेला गेंडा ८५० ते १५५० किलो भरतो. मादीचे वजन कमी असते. ह्यांची लांबी ३.५ ते ४.५ मीटर आणि उंची १.८ ते २ मीटर असते.

आशियाई गेंडे :

 • आशियाई गेंड्यांमध्ये तीन जाती आहेत, इंडियन, जावन, आणि सुमात्रन. आशियामध्ये गेंडे, भारत, नेपाळ, जावा, आणि सुमात्रा ह्या ठिकाणी सापडले जातात. पूर्वी हे पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, मलेशिया, चीन आणि व्हिएतनाम ह्या ठिकाणी पण होते पण व्हिएतनामच्या तस्करांनी त्यांची अमानुष कत्तल केल्याने तेथील गेंडे नाहीसे झाले.
 • आजसुद्धा गेंड्यांच्या शिंगांना व्हिएतनाम मध्ये सोन्याच्या भावाने खरेदी केले जाते [ १००,०००/- डॉलर प्रती किलो ] आणि काळ्या बाजारातील तस्करांची व्हिएतनाम ही मोठी बाजारपेठ आहे.
 • इंडियन गेंडे मुख्यत: आसाम आणि प.बंगाल आणि उत्तरप्रदेश येथे आहेत. हे गेंडे मुख्यत: गवताळ प्रदेशात असतात. त्यांची शिकार होऊ नये म्हणून त्यांना आसाम येथील काझीरंगा नॅशनल पार्क येथे संरक्षित ठेवले आहे. इंडियन गेंड्यांच्या अंगावर चिलखतासारखी तीन विभागात विभागलेली कातडी असते. ती खूप जाड असते आणि त्यावर केस नसतात. त्यांना एकच शिंग असते ते २० ते ६० से.मी. लांब असते. त्यांचे वजन २५०० ते ३२०० किलो असते. त्यांची लांबी ३ ते ४ मीटर असून उंची १.७५ ते २.० मीटर असते. मादीचे वजन १९०० किलो भरते.
 • जावन म्हणजे जावा बेटावरील गेंडे अगदी कमी आहेत. जवळपास ६० पर्यंतच उरले आहेत. त्यांना पण इंडियन गेंड्यासारखे एकाच शिंग असते. आणि चिलखतांसारखे जाड कातडे असते. त्यांची लांबी ३.१ ते ३.२ मीटर असते आणि उंची १.५ ते १.७ मीटर असते. त्यांचे वजन 9०० ते १४०० किलो आणि १३६० ते २००० किलो भरते. शिंगाची लांबी २६ से.मी. असते. त्यांना दलदल आणि गवताळ प्रदेश आवडतो आणि म्हशीसारखे चिखलात बसायला आवडते.
 • सुमात्रा बेटावरचे गेंडे सर्वात लहान आणि केस असलेले असतात. ते बहुधा उंचावर आढळतात. आता फक्त सुमारे २७५च गेंडे शिल्लक आहेत. हे गेंडे १.३ मीटर उंच आणि २.४ ते ३.२ मीटर लांब असतात. त्यांचे वजन ७०० किलोपर्यंत असते. मात्र ह्यांना दोन शिंगे असतात. मोठे शिंग २५ ते ७९ से.मी आणि लहान शिंग १० से.मी लांबीचे असते.
 • याशिवाय कांही पुरातन जाती होत्या ज्यामध्ये गेंडे सात मीटर उंच, दहा मीटर लांब आणि १५ टन वजनाचे होते. हे महाकाय गेंडे हायराकोडोंतिडी म्हणजे पळणारे गेंडे म्हणून ओळखले गेले तर कांही कुत्र्यापेक्षा लहान पण गेंडे होते. हे युरेशियामध्ये होते. कांही पोहणाऱ्या गेंड्यांच्या पण जाती होत्या. तरी पण सुमात्रन आणि इंडियन गेंडे सर्वात जुने म्हणजे १४ दशलक्ष वर्षे जुने आहेत.

जीवनचक्र :

 • गेंडे शाकाहारी असतात. आणि साधारण ४० ते ५० वर्षे जगतात (जर मारले गेले नाही तर).
 • गेंड्याचे मूल आईच्या पोटात १६ ते १८ महिने असते. इतक्या प्रचंड शरीराच्या मनाने डोळे अतिशय छोटे असतात आणि दृष्टी थोडी अधु असते, कान मात्र तिखट असतात.
 • गेंडे दोन्ही प्रकारे म्हणजे उभे आणि बसून पण झोप घेऊ शकतात.
 • ते ३० ते ४० किलोमीटर वेगाने धावतात.
 • गेंडे पाण्यावाचून ४ ते ५ दिवस राहू शकतात पण पाणी मिळाले तर चिखलात बसून मजा घेतात. त्यांना दिसत नसल्याने पाणी पितांना त्यांची शिकार केली जाते.
 • त्यांचे शिंग औषधी असल्याने सुद्धा त्यांची शिकार केली जाते. चीन आणि व्हिएतनाम मध्ये ते कर्क रोग तसेच इतर चिनी औषधात त्यांचा उपयोग होतो. कांही लोक ते शिंग सन्मानचिन्ह म्हणून ठेवतात. आता त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना बेशुद्ध करून शिंग काढले जाते कारण त्यांना आयुष्यभर नवीन शिंग येत राहते. पण त्यांतही कांही अडाणी तस्कर त्यांना निष्काळजीपणाने शिंग काढताना मारतात. कारण गेंडा शुद्धीवर यायच्या आत शिंग काढले गेले पाहिजे नाहीतर खैर नाही.
 • एखाद्या निर्लज्ज माणसाला “गेंड्याची कातडी आहे मेल्याला.” असे म्हटले की ह्या बिचार्‍या मूल्यवान प्राण्याचे अवमूल्यन केले गेले असे वाटते. नशीब त्याला मराठी समाजात नाही!

Essay Composition / Information about Rhinoceros in Marathi Language – Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *