Skip to content

Donkey Information in Marathi | गाढव माहिती

donkey mahiti marathi

Donkey Information in Marathi

गाढव माहिती

  • “गाढव आहेस.,” “गाढवा सारखे वागू नको” असे आपण नेहमी सहज म्हणून जातो. बीस्ट ऑफ बर्डन असा वाक्प्रचार करतो पण आपल्या मनात तरी येते का, की आपण एका निरूपद्रवी प्राण्याचा अपमान करतो? प्रत्येक प्राण्यांबद्दल काही संकेत करून ठेवलेले आहेत. पण आपण कधी त्याचा शहानिशा करतो का? इसापनीती, जातक कथा, पंचतंत्र, हितोपदेश या सर्व गोष्टींमध्ये गाढव मूर्ख, न ऐकणारा, ओंगळ असा प्राणी दाखविला जातो. काय आहे गाढव म्हणजे?

माणसाचा जुना सहाय्यक:

  • पाच हजार वर्षापूर्वी पासून गाढव माणसाचे काम करीत आहे. गाढव हा प्राणी जगात इक्विडी वर्गात मोडतो. तो ख्रिस्ती पूर्व ३००० सालापासून पाळीव प्राणी म्हणून इजिप्त किंवा मेसोपोटेमिया येथे पहिल्यांदा पाळला गेला. त्यानंतर जगभर तो पाळला जाऊ लागला.
  • नर गाढवाला जेक आणि मादीला जेनी किंवा जीनेत म्हणतात. पाडसाला फोल म्हणतात. गाढव १२ ते १४ महिन्यांनी जन्माला येते. एका वेळी एकच पिल्लू जन्माला येते. गाढव नर आणि घोडी यांच्या संकरातून म्युल किंवा खेचर जन्माला येते. आणि नर घोडा आणि मादी गाढवी यांच्या संकरातून हिनी जन्माला येते. पण हे प्राणी पुढे वांझोटे होतात. कारण घोडा आणि गाढव ह्याच्या क्रोमोसोम्स मध्ये फरक असतो. त्यामुळे पाडसाचे क्रोमोसोम्स पुढे वंश चालवण्यास कमी पडतात.

आकारमान आणि आयुष्य :

  • गाढव साधारण ३१ ते ६३ इंच उंच असतात आणि त्यांचे वजन ८० ते ४८० किलो एव्हडे असू शकते. गाढवांचे आयुष्य १२ ते १५ वर्ष गरीब देशांमध्ये आणि ३० ते ५० श्रीमंत देशात असते. गाढवाचे कान खूप मोठे असतात आणि ते जोरात ओरडू शकते. त्यांच्या भसाड्या आवाजात ओरडण्याने वाळवंटी प्रदेशात ते एकमेकांशी संवाद साधू शकतात.
  • गाढवांची पचन शक्ती खूप चांगली असते. त्यामुळे ते कसेही गवत पचवू शकतात. आतड्यांची शक्ती खूप चांगली असते. म्हणून लहान मुलांना डबा नावाचा पोटाचा रोग झाला तर गाढविणीचे दूध खेड्यांमध्ये देतात.
  • गाढव बुद्धिमान जागरूक आणि मित्रत्वाने वागणारा प्राणी आहे. फक्त हे त्याचा तुमच्या वर एकदा विश्वास बसला तर! तो पर्यंत त्याला वळवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तो आडमुठेपणानेच वागतो.

उपयोग :

  • इजिप्त मध्ये गायी घोड्यांच्या आधी गाढवांचा ख्रिस्तपूर्व ७ ते ८ मिलियन वर्षांपासून पाळून उपयोग केला जात होता. इजिप्तच्या व्यापारी वर्गाला त्यांचा खूप उपयोग होत असे. एकेका श्रीमंत माणसाकडे १०० गाढवे असत आणि त्यांना तो श्रीमंत माणूस मेला की त्यांच्याबरोबर पुरत. इजिप्त नंतर त्यांचा उपयोग मेसोपोटेमिया ,अरेबीयन,दमास्कस, वायव्य आशिया ग्रीस युरोप फ्रांस आणि स्पेन आणि कोलंबसने त्यांना अमेरिकेला पण आणले. आता जग भरात ५० मिलियन गाढवे आहेत. भारतात कुंभार ही जात गाढवाला माती वाहून आणण्यासाठी पाळीत असे. सर्वात जास्त गाढवे चीन, पाकिस्तान, इथियोपिया आणि मेक्सिको मध्ये आहेत.

इतिहासात गाढवाचे महत्व :

  • जुन्या पेंटींग्ज मध्ये गाढव अतिशय महत्त्वाचा मानला गेल्याचे कळते. असे म्हणतात की पुनर्जन्मानंतर जिझस गाढवावर बसून आला होता. गलीपोलीच्या युद्धात ले.अलेक्झांडर याने गाढवावरून जखमी सैनिकांना वाहून नेले.
  • शिवाजीच्या सैन्यात खेचरे उपयोगात आणली जात. कारण गनीमी काव्याने लढताना डोंगर दऱ्यातून गाढवे सहज सैनिकांना नेत आणि मोगलांचे अरबी घोडे तेथे कुच कामाचे ठरत. ज्यू लोकांच्या इतिहासात पण त्यांचे नाव आहे. जेरूसलेम आणि इस्रायेल यांच्या इतिहासात पण त्यांचा औषधासाठी उपयोग केल्याचे आढळते. त्यांचे मास पण खाणारे देश आहेत. पण इस्लाम मध्ये त्याला परवानगी नाही. भारतीय पुराणात गाढव हे देवी कालरात्री हिचे वाहन म्हणून दाखविले आहे.
  • इतका उपयोगाचा प्राणी पण जग भर त्याची हेटाळणी मूर्ख, अडाणी, ओंगळ, आणि खालच्या दर्जाची कामे करणारा ओझ्याचे गाढव म्हणून केली गेली आहे. सिनेमामध्ये आणि साहित्यात पण हेच दाखवले गेले आहे. आपण एव्हडेच म्हणू शकतो, “बिचारा गाढव.”

Information of Donkeys in Marathi : Essay Language Wikipedia

1 thought on “Donkey Information in Marathi | गाढव माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *