Panther Information in Marathi
जग्वार – नामशेष होण्याच्या मार्गावरील राजबिंडा, दणकट प्राणी
आपल्याला जग्वार, चिता आणि वाघ ह्या मार्जार वर्गातील दहशतवादी प्राण्यांची माहिती आहे पण नक्की ओळखता येत नाही. आणि तसेही जग्वार आणि चिता ह्यांच्यामध्ये फक्त मानेचा आकार आणि काळे डाग ह्या दोनच खुणा आहेत आणि त्या जवळून पाहिल्याशिवाय ओळखता येत नाही. पण समोर जग्वार किंवा चिता येऊन ठेपला तर जवळ जायची हिम्मत आहे? त्यातून त्यांनी मागून हल्ला केला तर? तुम्ही काय असे म्हणणार आहात कि, “अरे थांब मला तुझे ठिपके पाहू दे?” तर ह्यापेक्षा आपण जग्वार ह्या आता नामशेष होऊ पाहणाऱ्या जातीबद्दल बघू.
हा अमेरिका खंडात आढळणारा शिकारी वन्य प्राणी आहे. पॅंथर ह्या जीनस मधील हा एकच उरलेला प्राणी आहे आहे तो पण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा फिलाडेसी कुटुंबातील असून पंथोरा ओंशिया ह्या जातीतीतील आहे. हा मुख्यत्वेकरून उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील प्राणी आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको, सिएरा मद्रे, सेल्वा ग्वाटेमाला, चोको देरीन, होन्डुरास, पनामा, ते कोलंबिया, वेनेझुएला, अमेझॉन चे खोरे, आर्जेन्टिना, बोलिव्हिया, कोस्टारिका, इकाडोर,फ्रेंच गियाना, अल साल्वाडोर ,निकाराग्वे, पेराग्वे, पेरू, सुरीनाम, आणि दक्षिण भारत, नेपाल आणि आसाम येथे आढळतात.अमेरिकेत पण दक्षिण अमेरिका सोडून वायव्येला पण दृष्टोपत्तीस पडतात.बहुतेक रुडयार्ड किप्लिंगने दक्षिण भारतात ‘मोगली’ साठी ‘बगीरा’ म्हणून ह्याची निवड केली असावी. त्यामुळे जग्वार म्हंटले की बगीराच आठवतो.
जग्वार हा आशियातून अमेरिकेत गेला असे प्राणीशास्त्रज्ञ मानतात. प्राचीन काळी जोडलेल्या भूखंडामुळे हा अमेरिकेत गेला असावा. जग्वार हे नाव ट्युपियन शब्द याग्वारा ह्या शब्दापासून आला. माया आणि `अझटेक संस्कृतीत 6 ते 10 मिलियन वर्षापूर्वी ह्याच्याबद्दल दंतकथा आहेत 1.5 मिलियन वर्षापूर्वी चीत्यापासून विकसित झाला.ह्याचे 2,80,000 ते 5,10,000 वर्षापूर्वी आशियातून बेरीन्गीय ह्या जमिनीने जोडलेल्या भागातून अमेरिकेत प्रस्थान झाले. ह्याला उष्ण हवा लागते. त्यामुळे थंड प्रदेशात तो आढळत नाही.हा जरी मार्जार वर्गातील असला तरी पाण्यात पोहू शकतो, इतकेच नव्हे तर पाण्यात मारलेली शिकार पोहत असतांना वाहून नेतो. जग्वार मध्ये मेलानिन जास्त असल्याने मेलानिस्तिक असल्याने काळे दिसतात. काही वाघांमध्ये मेलानिन कमी असते ते पांढरे वाघ म्हणून ओळखले जातात. जग्वारच्या अंगावरील ठिपके गडद रंगाचें असतात आणि त्यांची वर्तुळाकार रचना असते आणि त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर काळा गडद ठिपका असतो. चित्याला हा ‘डोळा’ नसतो.चीत्याचे तोंड लहान आणि लांबट असते आणि मानेचे स्नायू लवचिक आणि मान बारीक असते.
जग्वार चे तोंड भरभक्कम असते आणि मानेचे स्नायू घट्ट आणि मान भरीव असते. ह्या रचनेमुळे तो जास्तीत जास्त वजनाच्या भक्ष्यावर हल्ला चढवू शकतो. जग्वारचे दात अत्यंत तीक्ष्ण असून जबडा घट्ट आणि शक्तिशाली असतो.जग्वारला इतर मार्जार वर्गाच्या प्राण्यांसारखी पाण्याची भीती नाही.उलट तो उत्तम पोहू शकतो हे विशेष. दुसरी विशेष गोष्ट अशी की इतर मार्जार वर्गासारखा हा भक्ष्याच्या मानेच्या नाजूक भागाला चावा घेण्यापेक्षा सरळ मेंदूची कवटी फोडतो. अगदी मगर आणि मोठ्या आकाराच्या कासवाची सुद्धा. ह्या जबड्याने 100 किलो वजनाचा जग्वार 503.6 किलो च्या ताकदीने भक्ष्याच्या चिंध्या करू शकतो. एकटा जग्वार 800 पौंडाचा बैल पण ओढून नेऊ शकतो. पोहताना वासराएव्हडा प्राणी पाण्यात वाहून नेऊ शकतो आणि झाडावर पण नेऊ शकतो. जग्वारचे वजन 56 ते 96 किलो असते. मात्र एक जग्वार 158 किलोच्या असल्याची नोंद आहे. त्याची शेपटीपर्यंत लांबी 1.12 ते 1.85 मीटर असते. तो भक्ष्य मानेपासून खाण्यास सुरुवात करतो. एक जग्वार 1.4 किलो मांस खाऊ शकतो. मादी चे वजन 36 किलो पर्यंत असते आणि लांबी 1.12 मीटर असते.
जग्वार एकांडा प्राणी आहे. तो त्याच्या युरीन ने त्याच्या कक्षा आखतो आणि कोणालाही त्यात येऊ देत नाही. 3-4 माद्या फक्त असतात. बाकी इतर नरांना प्रवेष निषिद्ध.मादी 2 वर्षानंतर वयात येते आणि नर 3-4 वर्षांपर्यंत वयात येतो. त्या काळात ते एकमेकांना गर्जना करून साद घालतात आणि त्याचा आवाज करवतीसारखा येतो म्हणून त्यावेळच्या त्यांच्या ओरडण्याला ‘SAW’असे म्हणतात. भक्ष्य भरपूर असले तर वर्षभर केंव्हाही हि जोडी पिल्ले जन्माला घालतात. जग्वार 15 वर्षांपर्यंत जगतो. पिल्ले जन्मत: आंधळी असतात. 93 ते 105 दिवसात त्यांना दिसायला लागते,व ती मोठी होतात. एकावेळी 2 ते 4 पिल्ले जन्माला येतात. पिल्ले झाल्यावर मादी नराला आसपास पण फिरकू देत नाही कारण इतर मार्जार वर्गान्प्रमाणे जग्वार पण पिल्लांना खातील अशी तिला भीती वाटते. पिल्लाचा सांभाळ पण तीच करते. पिल्ले आईबरोबर 1 ते 2 वर्षांपर्यंत राहतात आणि मग वेगळे होतात.
जग्वार हा मोठ्यां प्राण्यांचा कर्दनकाळ आहे.तो तसा निशाचर आहे पण पहाटे जास्त कार्यक्षम असतो. तो मोठ्या सुसरी, कासवे, बैल, गावे, गावात शिरून गुरे ढोरे, घोडेपण खाऊ शकतो. तो मोठ्या अनाकोन्दाला पण भक्ष्य करतो. तो 45 ते 85 किलोच्या प्राण्यांना मारू शकतो. इतके त्याचे दात तीक्ष्ण आणि ताकदवान असतात. माणसांवर सहसा हल्ला करीत नाही पण त्यांच्या हद्दीत गेलो तर आपली खैर नाही. तो अकस्मात झाडावरून हल्ला करतो. अगदीच जखमी झाला तर तो नरभक्षक होतो. ह्यांच्या नामशेष होण्याच्या भीतीने ह्यांच्या शिकारीवर बंदी आहे पण हपापलेली माणसे ह्यांची कातड्यासाठी शिकार करतात. तसेच वृक्षतोड आणि भक्ष्याची कमी झाल्याने ह्यांची संख्या आता फक्त 10,000 वर आली आहे.