Nadichi Atmakatha in Marathi

नदीची आत्मकथा

रोजच्या प्रमाणे मी खळखळ वाहत होते. काठावर खूप गर्दी होती. एक मुलगा माझ्या अंगावर खेळण्यास आला. त्याच्या आई ने त्याला दटावले. तेंव्हा त्याचे वडील म्हणाले “अग, जाऊदे त्याला. नदी आपली माता आहे. त्याला गोदामातेला कडकडून भेटू दे.” तेंव्हा एकदम मला माझे बालपण आठवले. अशीच मी बाबांच्या कडेवरून उडी मारून निघाले होते. तेंव्हा धरणी माता अशीच ओरडली होती. पण पर्वतराज सह्याद्री ,माझे बाबा म्हणाले “जाऊ दे तिला. पाहू दे जग” आणि मी सुसाट धावत सुटले. ती आले इथे नासिकला रामकुंडावर. तेंव्हा पासून मी अविरत वाहते आहे, मानवाच्या कल्याणासाठी. इथेच मला दक्षिण गंगा असे नाव लोकांनी दिले. पण खरी मी गौतमी ! हे नाव गौतम ऋषींनी दिले कारण त्यांचे गोहत्येचे पाप नष्ट व्हावे म्हणून तर माझा जन्म झाला, नाहीतर स्वर्गात मी सुखात होतेच की. हा विचार करता करता माला माझे बालपण आठवले.

मी मूळची त्र्यंबकेश्वराची. ब्रह्मगिरी माझे बाबा. ब्रह्मकुंडात माझा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकराच्या जटेतून मी अवतरले. आणि गौतम ऋषी शापमुक्त झाले. आणि मी तेथे लहानाची मोठी झाले. मी खूप अवखळ होते. सारखी उड्या मारायचे. पण माझे बाबा मला शंकराचा धाक दाखवायचे. कारण तेथेच शंकराचे धगधगते रूप होते. त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. मग मी पळत खाली आले. पळताना दगड गोटे खूप लागत होते. तशीच पळत होते. मला वाटेत खूप मैत्रिणी मिळाल्या. बाण गंगा, कादवा,पूर्णा, परिहीता, साबरी, नासर्डी, दारणा, प्रवरा, मांजर, किंन्सनी. अशा मराठी कानडी, तेलगु सगळ्या माझ्यासारख्याच अवखळ होत्या.

आता मी दगड गोट्याच्या रस्त्यावरून सरळ रस्त्यावर आले. माझ्या चालीत, आकारात बदल झाला. माझ्यामुळे सगळ्या आजूबाजूच्या गावांना पाणी मिळू लागले. पण मी पावसाळ्यात खूप मोठी होऊन वाटेतील घरे,गुरें आणि झाडे सगळ्यांना माझ्याबरोबर वहात घेऊन जाऊ लागले. आणि उन्हाळ्यात मी बारीक होऊ लागले. त्यामुळे लोक पाण्यावाचून तडफडू लागले. म्हणून मला ठिकठिकाणी बांध आणि धरणे बांधून माझा प्रचंड वेग त्यांनी काबूत आणला तसेच मला शांत केले. मी चालत होते अविरत कुठेच ना थांबता. आणि जात जाता ही लोकोपयोगी कामे करीत होते. महाराष्ट्रातून आंध्रप्रदेश आणि तेलंगण ह्या वेगवेगळ्या प्रांतातून जात होते. नवे नवे लोक भेटत होते. नव्या मैत्रिणी मिळत होत्या. माझा प्रचंड अवतार बघून लोक मला देवी मानायला लागले. आई म्हणायला लागले, कारण त्यांना मी जीवन देत होते. त्यांच्या साऱ्या गरजा पूर्ण होत होत्या. त्यांना प्यायला पाणी, गुरा ढोरांना पाणी मिळत होते. त्यांची शेती फुलत होती. अन्न धान्य पिकत होते. माझ्या आश्रयाला राहिल्याने त्यांना चांगले जीवन मिळत होते. म्हणून ते मला गोदावरी माता म्हणायला लागले. माझी पूजा करायला लागले.

प्रत्यक्ष राम सुद्धा वनवासाला माझ्याच तीरावर राहायला आला. राम, सीता माई आणि लक्ष्मण ह्यांचे पाय लागले आणि मी धान्य झाले. पवित्र झाले. गरूडाने अमृत कुंभ घेऊन जाताना माझ्यावर थोडा थेंबांचा शिडकावा केला आणि मी तर देवपणाला पोहोचले. देववाणी झाली की, दर बारा वर्षांनी मला आणि माझ्या बहिणीला गंगेला अमृत मिळेल. दर बारा वर्षांनी लोक आमच्या पाण्यात स्नान करायला दूर दुरून येतात. माझी पूजा करतात. खूप मोठा मेळा भरतो. त्याला अमृत कुंभावरून कुंभ मेळा म्हणतात. साधू, तपस्वी, महंत आणि असंख्य लोक स्नान करून पुण्य जमवतात. माझ्या तीरावर आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांना पण सद्गती देतात.

ह्या सगळी लोकांचे जीवन माझ्याशी निगडित आहे. मी त्यांची आई आहे हे खूप चांगले वाटते. पण त्याने माझ्या जीवनाला पूर्णता येत नाही असे मला वाटले. धरणी माता म्हणाली” तुझे जीवन सागरात समर्पित कर. तीच तुझ्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. सागर तुमचा स्वामी आहे. ” मला जाणवले, मला त्याच्याकडे जायचंय आहे म्हणून मी इतकी अविरत चालत आहे. मला ओढ सागराची होती. पण माझे कर्तव्य मी चुकवू शकत नव्हते. खरेच अल्लड मुलीच्या रुपातून मी एका तरुण, डोळ्यात जोडीदाराचे स्वप्न घेऊन हातात माळ घेऊन स्वयंवराला निघालेल्या राजकन्ये सारखी सागराला भेटायला निघाले.

खूप लांबचा प्रवास करून बंगाल च्या उपसागरास माझ्या जोडीदारास भेटले. आता मी अवखळ नव्हते, रौद्र नव्हते, कृश नव्हते. माझे काहीच अस्तित्व नव्हते. मी पूर्णपणे विरघळून गेले होते. असेच असते ना समर्पण? माझे मीपण कुठेच नव्हते. माझ्या तीरावर धुणे धुवायला येणाऱ्या सासुरवाशिणींची हितगुज मी ऐकली होती. स्त्री काय आणि नदी काय दोघींचे जीवन एकच. सर्वांच्या उपयोगी पडायचे, संसार फुलवायचा आणि समर्पण करायचे. तेही मूकपणे.

पण मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते की माझ्या चांगल्या पाण्यात लोक घाण टाकतात. मला गलिच्छ करतात. मी इतके त्यांचे चांगले करते,पण ते माझा श्वास गुदमरला इतकी घाण, फुले, कचरा, आणि सांडपाणी टाकून मला प्रदूषित करतात. तेच पाणी पिऊन मग रोगराईने त्रस्त होतात. त्यांना हे काळात नाही की मी वाहत राहिले तरच त्यांना चांगले पाणी मिळेल. त्यांना कोण सांगणार? मी मूकपणे सहन करते. आणि माझ्या बाबांकडे, आणि शंकराकडे विनवणी करते की त्यांना समजूत येऊ दे नाहीतर माझा संयम संपला तर ह्यांचाच सर्वनाश होईल.
देवा, हि वेळ माझ्यावर आणू नको.

Nadiche Atmavrutta Essay in Marathi Language Wikipedia

Autobiography of a River | Nadi Bolu Lagli tar Marathi Nibandh