Skip to content
Home » Essay in Marathi Language » Veleche Mahatva in Marathi | Importance of Time in Marathi Essay

Veleche Mahatva in Marathi | Importance of Time in Marathi Essay

essay on importance of time in marathi

Veleche Mahatva in Marathi

Importance / Value of Time Essay in Marathi : वेळेचे महत्व निबंध

आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल यश, कोणासाठी आत्मसन्मान मोठा असेल तर कोणासाठी नाती. पण खूप कमी लोक आहेत या जगात जे वेळेचे महत्व जाणतात. किंबहुना खूप कमी लोक आहेत जे वेळेचे महत्व जाणून वेळेचा सदुपयोग करतात. खरतर वेळेएवढी मौल्यवान गोष्ट या जगात कोणतीच नाही. प्रत्यकाने वेळचे महत्व जाणून त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे कारण सर्वांनाच माहित आहे कि एकदा गेलेली वेळ परत येत नाही.

वेळ ही सर्वात अनिश्चित गोष्ट आहे. पुढच्या क्षणाला कोणा सोबत काय होईल हे कोणताही मोठा ज्योतिषी किंवा कोणताही प्रसिध्द शास्त्रज्ञ अचूकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या हातात असलेला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे भविष्याची चिंता न करता भविष्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजे. भूतकाळातील चुकांवर पस्तावण्याऐवजी त्यापासून शिकले पाहिजे आणि त्या चुका पुन्हा करू नये. वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. भविष्यात हव्या असलेल्या भौतिक सुखाच्या मागे धावण्याऐवजी आज आपल्याकडे जे आहे त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. विचार करा कि आज आपल्याकडे किती वेळ आहे काही लोकांकडे कदाचित पुरेसा वेळ नसेल, म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेला सांभाळून वापरले पाहिजे. भलेही तुम्ही हि वेळ काम करण्यासाठी वापरा किंवा आपल्या परिवारासोबत घालवा पण प्रत्येक क्षण असा जगा कि आपल्याला कधीही पश्चाताप होणार नाही.

वेळ हि जगातील कोणत्याही हिऱ्यापेक्षा, कोणत्याही खाजीन्यापेक्षा मौल्यवान आहे, कारण एकदा गेलेली वेळ कितीही पैसा दिला तरी परत येऊ शकत नाही. एखाद्याकडे भरपूर पैसा असेल तर ती व्यक्ती जगातील कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकते पण एकही क्षण विकत घेता येत नाही. कितीही मोठा शास्त्रज्ञ असेल तरी तो वेळ परतवू शकत नाही. जर एखादा माणूस वेळेच महत्व समजू शकत नाही तर वेळेलाही त्या माणसाचे महत्व वाटणार नाही. जर आपण वेळ वाया घालवत राहिलो तर वेळ आपल्याला पुढे येणारा वेळ आपल्याला उद्ध्वस्त करू शकतो. वेळ आपल्याला एकच संधी देते आणि ती जर आपण साधली नाही तर ती संधी आपण पुन्हा कधीच परत मिळवू शकत नाही.

आतापर्यंत एवढे महान सम्राट होऊन गेले या पृथ्वीवर, अनेक शास्त्रज्ञ, महान संत जन्माला आले या धरतीवर परंतु कोणीच वेळेवर विजय मिळवू शकले नाही. किती महान सत्ता आल्या आणि गेल्या परंतु काळाची सत्ता कोणीही जिंकू शकले नाही. अनंत काळापासून वेळ आपल्या मर्जीने चालत राहिला आहे. भविष्यातही कोणी असो वा नसो पण वेळ मात्र नक्की असणार आहे. वेळ निःपक्षपातीपणे, सर्वांनाच संधी देत पुढे जात राहतो. तो कधीही गरीब- श्रीमंत, लहान- थोर, उच्च – नीच असा भेदभाव करत नाही. ज्या व्यक्ती हुशारीने आणि शिताफीने या संधींचा फायदा घेतात त्याच व्यक्ती प्रगती करतात.

वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर स्वतःला शिस्त लावून घेणे अतिशय गरजेचे आहे. शाळेत किंवा ऑफिसला जाणे – येणे, घरातील कामे वेळेवर करणे, वेळेवर झोपणे व उठणे, व्यायाम व आहार यांच्या वेळा पाळणे, ठरलेली कामे वेळेवर उरकणे या सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. संत कबीर म्हणतात, “कल करे सो आज कर, आज करे सो अब” – म्हणजे कोणतेही काम उद्यावर न ढकलता उलट उद्याची कामे आजच करून घ्या आणि आजची कामे आता ह्या क्षणाला पार पाडा. खूप छोटी गोष्ट वाटते ऐकायला पण किती महत्वाची आहे. उद्याची कामे जर आज करून घ्यायची सवय आपल्याला लागली तर ते काम वेळच्या आधी पूर्ण झाल्याचे समाधान आपल्याला मिळेल. सर्व कामे वेळे आधी पूर्ण झाली तर उरलेल्या वेळेत आपण तणावमुक्त राहतो, शांत राहतो. जर त्या कामात काही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यासाठी आपल्या कडे पुरेसा वेळ असतो.

एखादा विद्यार्थी जर पहिल्यापासूनच आभ्यास करत असेल तर परीक्षेच्या वेळीस त्याला जास्त त्राण येत नाही कारण त्याचा आभ्यास आधीच झालेला असतो. ऐन वेळेस तो आजारी पडला किंवा इतर काही कारणांमुळे आभ्यासाला पुरेसा वेळ देऊ शकला नाही तरी बिनधास्त परीक्षा देऊ शकतो. ऑफिसमध्ये किंवा घरीसुद्धा कोणतेही काम वेळेआधीच पूर्ण केले तर काम झाले असल्याचे समाधान लाभते, किंवा काही अडथळे असल्यास दुसरा मार्ग काढण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो. म्हणूनच वेळेचा उपयोग कसा करून घ्यावा या साठी निरुस्त्साही न राहता, आपल्या दिवसभरच्या कामाची योग्य आखणी केली पाहिजे. भविष्यातील आपले लक्ष्य आताच ठरवून त्यासाठी आपल्याला आता काय करावे लागेल हे ठरविले पाहिजे आणि त्याप्रमाणे आतापासूनच मेहनत केली पाहिजे. असे केल्यास आपले भविष्य उज्ज्वल असेल यात काहीही शंका नाही. कोणतेही चांगले काम करण्यासाठी चांगला मुहूर्त न शोधत बसता आताच ते काम सुरु करा कारण प्रत्येक क्षण हा चांगलाच असतो आणि आत्ताचा क्षण सर्वोत्तम आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Veleche Mahatva Essay in Marathi Wikipedia Language

7 thoughts on “Veleche Mahatva in Marathi | Importance of Time in Marathi Essay”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *