Skip to content

Amla Information in Marathi | Benefits (फायदे) आवळा

Avla Amla Information Marathi

Amla Information in Marathi

Amla / आवळ्याची माहिती

आवळ्याची माहिती आणि उपयोग :

 • आवळा…आवळा हे फळ माहित नाही असे कदाचितच कुणी असेल…तुरट आंबट चवीचे हे फळ मीठ लावून आपण सर्वानीच खाल्ले असेल.
 • लहानपणी शाळा बुडवून चिंचा आणि आवळे पाडायला जाण्याच्या अनेक गोष्टी आपण लहांपणीपासूनच ऐकत आलेलो आहोत.
 • अतिशय रसरशीत असे हे आवळे हिवाळ्यात बाजारात येतात. खाण्यासाठी किंवा खाण्याचेपदार्थ बनविण्यासाठी आवळ्याला बाजारात अतिशय मागणी असते.
 • आवळा हा व्हिटॅमिन सी चा एक अतिशय उत्तम स्रोत आहे. एका आवळ्यामधे असणारे व्हिटॅमिन सी हे ४ संत्री, ८ टमाटर किंवा ४ केळे याहूनअधिक प्रमाणात असते. आवळा हा हिंदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे.
 • आवळ्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आवळ्यावर काही प्रक्रिया केल्यावर देखील त्यातले गुणधर्म तसेच राहतात. जसे सुकवणे, शिजवणे किंवा उकडणे. आवळा ताजा हिरवा असो किंवा सुकवलेले त्यातले आम्ल तत्व त्याच्या गुणांचे रक्षण करते. व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांच्या तुलनेत आवळ्यातील व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरात लवकर पचते.

आवळ्याचे आयुर्वेदातील महत्व :

 • आयुर्वेदात तर आवळ्याला प्रचंड महत्व आहे याला एक पौष्टिक फळ मानले गेले आहे ज्यात खूप औषधी गुणधर्म आहेत. नियमित आवळ्याच्या सेवनाने आपण अनेक व्याधींना दूर ठेऊ शकतो. आवळा अन्न पचनाचे काम करतो म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो म्हणून त्याला वयस्थाही असेही म्हटले जाते. सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. आवळ्याच्या आम्ल चवीमुळे तो वात, पित्त आणि जुलाब यावर अत्यंत उपायकारक आहे म्हणून त्याला त्रिदोषनाशक देखील म्हंटले जाते.

आवळ्याच्या झाडाचे महत्व :

 • भारतातल्या अनेक ऋषी मुनींनी लाखो वर्षे वेगवेगळ्या झाडांचा अभ्यास करून त्याचे पौराणिक आणि अध्यात्मिक महत्व भारतीयांना सांगितलेले आहे. आवळा हे त्यातलाच सर्वात महत्वाचा पवित्र आणि वैज्ञानिक गुण असलेले झाड आहे. यात अनेक रोगांशी लढण्याची अनन्यसाधारण शक्ती आहे म्हणूनच याला अमर फळ असेही एक नाव दिले गेले आहे.

आवळ्यातील घटक :

 • एका आवळ्यामध्ये ५८ मि. ग्रा कॅलरी, ०.५ मि. ग्रा प्रोटीन, ५० मि .ग्रा. कैल्सियम, १.२ मि .ग्रा. लोहा, ९ मि .ग्रा. विटामिन, ०.०३ मि .ग्रा. थायोमिन, ०.०१ मि .ग्रा. रिबोफ्लोविन, ०.२ मि .ग्रा. नियासिन, ६०० मि .ग्रा. विटामिन-सी असते. आवळ्यामधे अनेक व्हिटॅमिन असतात ज्यात सगळ्यात महत्वाचे आहे व्हिटॅमिन सी, त्यानंतर गेलिक एसिड, टैनिन आणि आल्ब्युमिन.

आवळ्याचे पदार्थ :

 • आवळ्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. जसे कि आवळा सुपारी, चुंदा, आवळा कँडी, मुरंबा, आवळ्याचे लोणचे, तसेच आवळा कॅण्डी बनवताना निघणारा आवळ्याचा रस हा देखील आवळा सरबत म्हणून वापरता येतो. आवळा सुकवून त्याचे चूर्ण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

आवळ्याचे औषधी गुणधर्म :

 • आवळ्यामधे मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक आहे. त्वचा रोग, श्वसनाचे रोग, दाह, त्रिदोष, दमा, क्षयरोग, मूत्रविकार यावरील उपचारात आवळ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आवळ्यामधे क्रोमियमची मात्रा मोठ्या प्रमाणात असते, जी डायबिटीसच्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. क्रोमियम शरीरातले इन्सुलिनचे प्रमाण वाढवते.
 • ज्यामुळे शरीरातील शुगर नियंत्रित ठेवली जाते. आवळ्यातील सकसीनिक आम्ल वार्धक्याला रोखते आणि पुनरयौवन प्राप्त करून देते.

आवळ्याचे उपयोग :

 • आवळा आपल्या किडनीला आणि पचन तंत्राला स्वस्थ ठेवतो.
 • आवळा आर्थराइटिस मध्ये त्रास कमी करण्यासाठी अत्यंत फायदेमंद आहे.
 • आवळा आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करतो.
 • निरोगी त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असे व्हिटॅमिन सी आवळ्यामधे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
 • आवळा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला रोगांशी लढण्यात मदत करतो.
 • नियमित आवळ्याच्या सेवनाने सर्दी खोकला सारख्या आजारांपासून रक्षण होते.
 • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे.
 • गरोदर स्त्रियांनी निरोगी बाळासाठी नियमित आवळ्याच्या मुरंब्याचे सेवन करावे.
 • रक्त शुद्धीसाठी अत्यंत उपयुक्त असा आवळा आहे.
 • आवळा बद्धकोष्ठतेवर अत्यंत रामबाण इलाज आहे.
 • आवळ्याचे नियमित सेवन केल्याने वार्धक्य दूर होते आणि तरुणपण येते.
 • नियमित आवळा सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो.

आवळ्याचे घरगुती उपचार :

 • मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते.
 • आवळा केसांच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी आहे, आवळ्याचे तेल करून लावल्यास केस दाट होतात, कोंडा आणि केस गळतीची समस्या कमी होते आणि नवीन येणारे केस काळे येतात.
 • ऍसिडिटी असल्यास आवळ्याची पावडर आणि साखर १ ग्लास पाण्यामध्ये मिसळून प्यावे.
 • आवळ्याच्या सेवनाने स्मरशक्ती वाढते म्हणून विद्यार्थ्यांसाठी नियमित आवळ्याचा च्यवनप्राश खाणे अतिशय उत्तम आहे.
 • पोटांच्या समस्येसाठी आवळा हे वरदान आहे, बद्धकोष्टतेसाठी रात्री पाण्यासोबत एक चमचा आवळ्याचे चूर्ण घ्यावे.
 • आवळ्याच्या रसात मध मिसळून घेतल्यास मोतीबिदू कमी करण्यासाठी मदत होते.
 • उन्हाळ्यामध्ये आवळ्याचे सरबत शरीरातील उष्णता कमी करण्यास लाभदायक ठरते.
 • मेहंदीमध्ये आवळा पावडर मिसळून केसांना लावल्यास केसांचा रंग चांगला येतो, केस चमकू लागतात आणि कोंड्याच्या समस्येतून सुटका मिळते.
 • रक्त विकारांमध्ये जसे घोळणा फुटला असेल, शौच मधून रक्त जात असेल, मुळव्याधीमधून रक्त जात असेल तर अशा वेळेस आवळ्याचा रस सेवन करावा.
 • स्त्रियांना मासिक पाळी मध्ये अति रक्तस्त्राव होत असेल तर आवळा चूर्ण किंवा रस घ्यावा.
 • गरम पाण्यासोबत आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास चरबी दूर होते.
 • दात व हिरडी संबंधीत व्याधींसाठी आवळा चूर्णाचे सेवन करावे.
 • नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने मांसपेशी मजबूत होतात.
 • आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते आणि आपल्या हृदयाला शुद्ध आणि जास्त रक्ताचा पुरवठा होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

आवळा वापरताना घ्यावयाची काळजी

 • बाजारातून आवळे घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी स्वछ धुवून घ्यावेत.
 • डाग असलेले किंवा पिवळे पडलेले आवळे घेणे टाळावे.
 • सर्दी खोकला झालेला असल्यास आवळ्याचे थंड सरबत घेणे टाळावे.
 • कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो त्यामुळे अति प्रमाणात आवळा कँडीचे सेवन करू नये.
 • कच्चे आवळे खाऊ नयेत.
 • आवळा हा आपल्या शरीरासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. चला तर मग आजपासून रोज आवळा किंवा त्याचे पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करूया आणि सर्व प्रकारच्या रोगांना आपल्यापासून दूर ठेऊया. चला निरोगी आयुष्य जगूया.

Amla Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *