Skip to content
Home » Tips Information in Marathi » Hair Care Tips in Marathi I ‘ केसांची निगा ‘ माहिती

Hair Care Tips in Marathi I ‘ केसांची निगा ‘ माहिती

hair care tips upay

Hair Care Tips in Marathi

  • फॅशन, प्रदूषण, सकस नसलेले जेवण आणि तणाव यामुळे केसांना खूप नुकसान होते. परिणामी अवेळी केस गळणे-तुटणे, केस कमजोर होणे अशा तक्रारी निर्माण होणे साहजिकच आहे. कृपया उत्कृष्ट केसांसाठी पुढील टिप्सचे नियमितपणे पालन करा
  • खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपण बरेचदा विसरतो. केसांच्या मजबुतीसाठी खोबऱ्याचे तेल खूप फायदेशीर आहे. रोज जर आपण खोबऱ्याच्या तेलाने १५ मिनिटे केसांना मालिश केली तर केस रेशमी तर होतीलच पण केस गळणे सुद्धा थांबेल.
  • मध केसांच्या पोषणासाठी उत्तम आहे. ह्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. जर मधाबरोबर अंड्याचा बलक मिसळला तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. केसांच्या मुळाला म्हणजेच डोक्याच्या त्वचेला ह्यामुळे आवश्यक प्रथिने किंवा केरोटीन मिळते.
  • जर वाढते टक्कल तुमची झोप उडवत असेल तर कोरफड हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोरफडचा गर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. यामध्ये २ चमचे खोबरेल तेल टाका आणि चांगले मिसळा. केसांच्या मुळांशी या मिश्रणाने मालिश करा आणि २० मिनिटे थांबा. नंतर केस पाण्याने धुवून टाका.
  • बटाट्याच्या रसाबद्दल खूप कमी लोक जाणतात. बटाट्याचा रस केस गळणे थांबवतो आणि त्यांना मजबूत बनवतो. डोक्याच्या त्वचेला बटाट्याचा रस लावा आणि १५ मिनिटांनंतर केस धुवा. बटाट्यामधील जीवनसत्व तुमचे केस लांब आणि मजबूत करते.
  • ग्रीन टी, यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात म्हणून हे केसांच्या समस्यांवर खूप परिणामकारक असते. तसेच ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉलीफेनॉल्स सापडतात जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. ग्रीन टीच्या दोन पुड्याना एक कप गरम पाण्यामध्ये बुडवून मिश्रण तयार करा. आता ह्या पाण्याने डोक्याची त्वचा धुवा. केस गळती थांबवण्यासाठी सुद्धा तुमच्या नित्याच्या आहारात सुद्धा ग्रीन टी समाविष्ट करा.
  • केसांची जास्त स्टाइलिंग करण्याने केसांचे खूप नुकसान होते. मशीनच्या सहाय्याने केस कुरळे करणे, सरळ करणे, रासायनिक ब्लीच, रंग आणि जास्त प्रमाणात जेल लावण्याने केसांचे खूप नुकसान होते. हेयरजेल आणि हेयरस्प्रेचा उपयोग खूप करू नये.
  • खरं तर केसांच्या समस्यांचे एक प्रमुख कारण तणाव सुद्धा आहे. म्हणून तुमच्या आयुष्यातून भावनिक आणि शारीरिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या हवेत फिरावे आणि काही व्यायाम सुद्धा करावा. सोबतच पूर्ण झोप घ्या आणि एक निरोगी जीवनशैली आत्मसात करा.

Silky Hair Tips & Long Hair Tips in Marathi

केस धुण्यासंबधीच्या टिप्स

  • केसांच्या मुळांची त्वचा साफ ठेवा. आठवड्यातून ३-४ वेळा सौम्य शाम्पूने केस साफ करा. कोरड्या केसांसाठी, अशा शाम्पूची निवड करा जो केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकणार नाही. तेलकट केसांसाठी, असा शाम्पू वापरा जो तुमच्या डोक्याच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करेल. नेहमी वनौषधीपासून बनलेल्या उत्पादनांचा वापर करा.
  • कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी सिरमचा वापर करा. ज्यामुळे केसांना छान चमक येईल.
  • ओले केस कधीही बांधू नयेत कारण त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *