Skip to content

Vastu Shastra Tips in Marathi, Vastu Shastra for Flats, Kitchen, Money

vastu shastra mahiti

Vastu Shastra in Marathi Information

Vastu Shastra Tips for Money : ऐश्वर्य आणि समृद्धी साठी वास्तुशास्त्र

 • घराच्या ईशान्य कोपऱ्यामधील सर्व बांधकाम काढून टाका आणि शक्य असल्यास तिथे देवघर बनवा. शक्य नसल्यास किमान ती जागा साफ आणि मोकळी ठेवा.
 • एखाद्याला पैसे मेहनत करूनच मिळतात पण वास्तुशास्त्र म्हणते तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोरील अडगळ दूर करून अधिक फायदा मिळवू शकता. घराचा समोरचा दरवाजा हा घरातील सुख, समाधान आणि वैभव यांचा मुख्य दरवाजा असतो. मुख्य दरवाजा अवास्तव गोष्टींनी भरू नका कारण त्यामुळे सकारात्मक उर्जेचा मार्ग रोखला जातो, आणि दरवाजासमोरील जागासुद्धा व्यवस्थित आणि टापटीप ठेवा.

Vastu Shastra Tips for Flats & Homes : घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स

 • अभ्यासिकेमध्ये कधीही बंद घड्याळे असू नयेत, कारण ती नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात आणि काही कारणांमुळे जर ती तुम्ही फेकू किंवा विकू नाही शकत तर ती ठीक करून घ्या.
 • देवघरात बरेचदा लोक काही मृत पूर्वजांचे फोटो लावतात. पण वास्तूसाठी हे चांगले नाही. वास्तुशास्त्र मानणारे हे जाणतात की देव्हाऱ्यात पूर्वजांची तसवीर लावण्यास मनाई आहे. मेलेल्या पूर्वजांच्या तस्वीरी नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावी.
 • नळातून जर पाणी टपकत असेल तर तो लगेच दुरुस्त करून घ्या.
 • नेहमी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके करून झोपावे. डोके पूर्वेकडे करून झोपल्याने मानसिक सुसंगती मिळते आणि अध्यात्माकडे कल वाढतो. दक्षिणेकडे डोके केल्याने संपत्ती आणि संपन्नता वाढते.
 • तुळई खाली बसू अथवा झोपू नये. खरी झाडे, माश्यांचे मत्स्यालय किंवा इतर कुठलाही जिंवंत प्राणी शयनगृहात ठेवण्यास सक्त मनाई आहे. पण ताजी फुले ठेवू शकता कारण ती जोडप्यामधील प्रेमाचे प्रतिक आहे.
 • दररोज जेवताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे. नेहमी जेवण्यास घ्यायच्या आसनांची संख्या सम असावी ज्यामुळे कुटुंबातील सभासदांमध्ये वाद होणे टळते.
 • आदर्श स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे. ईशान्येकडे स्वयंपाकघर बांधणे टाळावे.
 • जर शयनगृहात ड्रेसिंगटेबलला किंवा इतर कुठेही आरसा असेल तर खात्री करून घ्या की पलंगावर झोपलेले असताना तुमच्या शरीराचा कोणताही अवयव आरशामध्ये दिसणार नाही.

VastuShastra for Office & Work : कार्यालयासाठी वास्तुशास्त्र

 • कार्यालयात तुमच्या खुर्चीपाठीमागे भिंत असावी, ही आधाराचे प्रतिक आहे. तसेच ह्यामुळे तुमची पाठ प्रवेशद्वाराकडे राहत नाही.
 • तुम्च्यापाठीमागच्या भिंतीवर डोंगराचे चित्र असावे कारण हे खंबीरपणाचे प्रतिक आहे.
 • कामाच्या जागी तुमच्या समोर मोकळी जागा असली पाहिजे.
 • तुमचे कार्यालयातील टेबल नियमित आकाराचे जसे की, चौकोनी किंवा आयताकृती असावे आणि गोल किंवा अनियमित आकाराचे असू नये.

Tips for Business : धंद्यासाठी वास्तुशास्त्र

 • जर तुम्ही जागा, कारखाना किंवा इतर कुठलीही व्यावसायिक बांधकाम बघत असाल तर व्याघ्रमुखी जागा घ्या. अशी जागा समोर रुंद आणि पाठी अरुंद असते. तसेच अशी जागा घेण्याचा प्रयत्न करा जी वर्दळीच्या रस्त्याच्या जवळ असेल.

1 thought on “Vastu Shastra Tips in Marathi, Vastu Shastra for Flats, Kitchen, Money”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *