Skip to content
Home » Tips Information in Marathi » Cow Information in Marathi, गाईची माहिती, निबंध

Cow Information in Marathi, गाईची माहिती, निबंध

cow animal information in marathi

Cow Information in Marathi

गाय माहिती

  • गाईला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे आणि तिला गोमाता असे मानतात. गाय सहसा शांत स्वभावाची असते.
  • भारतात गाईंचे सुमारे अठ्ठावीस प्रकार आहेत त्यापैकी काही आहेत हरयाणी, खिल्लारी, साहिवाल, गीर, देवणी, डांगी, कांकरेज, गौळाउ, कंधारी, थारपारकर, अंगोला इत्यादी जाती विशेष प्रसिद्ध आहेत.
  • गाय सस्तन प्राणी वर्गात येते. गाईच्या नराला बैल, सांड किंवा वळू असे म्हटले जाते. गाईच्या पिल्लांना पाडस म्हणतात. गाय ही पाळीव प्राणी आहे. गाईंना सहसा गोठ्यात ठेवले जाते.
  • गाईला स्वःताच्या बचावासाठी दोन शिंगे असतात पण सहसा गाय कोणाला मारत नाही. तिच्या झुपकेदार शेपटीचा उपयोग अंगावर बसणाऱ्या माश्या उडविण्यासाठी होतो.
  • गाईचा मुख्य आहार चारा व गवत आहे. काही शेतकरी गाईला कोंडा सुद्धा देतात. गाईंना विशेष प्रकारचे अन्न लागत नसल्यामुळे तिच्या पालनाचा खर्च खूप कमी असतो. त्यांना चरायला सोडल्यास त्या जो काही हिरवा पाला मिळेल तो खाऊन पोट भरतात.
  • शेतकरी सहसा गाय दुध उत्पन्नासाठी वापरतात. गाईचे दुध सर्वश्रेष्ठ मानले जाते. गाईच्या दुधात विविध प्रकारची अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स, विटामिन्स, कॅल्शियम याशिवाय इतरही बरीच पौष्टिक तत्वे असतात.
  • गाईचे दुध लहान शिशुंसाठी फारच उत्तम असते. ते पचण्यास सोपे व स्मरण शक्ती वाढवणारे असते. असे ही मानले जाते की, गाईच्या दुधामुळे मुले चपळ होतात आणि म्हशीच्या दुधामुळे सुस्त.
  • गाईच्या दुधापासून बनणारे दही, तूप, चीज आणि पनीर गाईच्या दुधाप्रमाणेच उत्तम प्रतीचे असते.
  • गाईचे गोमुत्र हिंदू साठी खूप पवित्र असते आणि सर्व प्रकारच्या वैदिक कामामध्ये पवित्रता आणण्यासाठी गोमुत्राचा वापर करतात. संशोधनाने असेहि सिद्ध झाले आहे की, गोमुत्र फक्त पवित्रच नाही तर त्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी गुण सुद्धा आहेत.
  • गाईचे शेण उत्तम खत आहे. गावातील अनेक बायका शेणाचे चपटे गोल बनवून उन्हात सुकवतात व त्यांचा इंधन म्हणून वापर करतात. तसेच ह्या शेणी हवन सारख्या पवित्र विधींमध्ये उपयोगी येतात.
  • गाय मेल्यानंतर तिचे कातडे चामडे बनविण्यासाठी उपयोगी येते. तसेच हाडांचा उपयोग खत बनविण्यासाठी होतो.
  • गाईच्या ह्या अनेक उपयोगांमुळे तिला पुराण काळापासून खूप महत्व दिले गेले आहे. पूर्वी राजे महाराजे ब्राम्हणांना सोन्यासोबत गाई दान देत कारण गाईंना सोन्या इतकेच मूल्यवान समजले जाई.

Information of Cow in Marathi / Few Lines

6 thoughts on “Cow Information in Marathi, गाईची माहिती, निबंध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *