Tiger Information in Marathi

वाघ माहिती

 • वाघ हा मार्जार वर्गातील सर्वात मोठा प्राणी असून तो क्रूर शिकारी आहे.
 • भारताला वाघाचे माहेरघर समजले जाते आणि वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
 • भारतातील वाघांचे वजन सुमारे १०० ते १८० किलो पर्यंत भरते. वाघाची मादी तुलनेत थोडी लहान असते.
 • वाघाच्या अंगावर काळ्या पट्ट्या असतात. जसे दोन माणसांचे ठशे कधीही समान नसतात त्याचप्रमाणे दोन वाघांच्या अंगावरील पट्टे सुद्धा कधी समान नसतात. ह्या पट्ट्यांची संख्या सुमारे १०० असते आणि वाघाला जंगलात लपण्यासाठी यांचा खूप उपयोग होतो.
 • वाघांच्या पट्ट्याप्रमाणेच त्यांच्या पंज्यांची ठेवण सुद्धा प्रत्येक वाघात वेगळी असते. वाघाचा पंजा खूप मोठा आणि ताकदवान असतो. तो सुमारे सहा ते आठ इंच लांबीचा असतो त्यामुळे वाघाचे ठसे सहज दिसू शकतात.
 • वाघ सुमारे ताशी ६५ किलोमीटर या वेगाने पळू शकतो.
 • वाघाचे जबडे त्याच्या पंजाहूनही अधिक बलवान असतात ज्यांच्या सह्हायाने वाघ शिकार घट्ट पकडून ठेवू शकतो, ओढून नेऊ शकतो.
 • वाघाच्या मादीला वाघीण म्हणतात. वाघीण एका वेळी ३ ते ४ पिल्लांना जन्म देते. वाघाच्या पिल्लांना बछडा म्हणतात. जन्मतः पिल्ले कमजोर आणि आंधळी असतात. वाघ पिल्लांना ठार करू शकतो म्हणून लहान बछडे असलेली मादा अतिशय क्रूर आणि आक्रमक असते.
 • बछड्यांची जबाबदारी वाघिणीवर असते. बछडे सुमारे अडीच वर्षे वाघिणी सोबत रहातात ज्या दरम्यान वाघीण त्यांना शिकार करायला शिकवते.
 • वाघ कळपाने राहत नाहीत आणि आपल्या क्षेत्राबाबत अतिशय आक्रमक असतात. वाघ आपल्या जागेत वाघिणींना राहू देतात परंतु दुसऱ्या वाघाचे अस्तित्व त्यांना सहन होत नाही. अनेकदा वाघांना आपल्या पिल्लांचे अतिक्रमणही सहन होत नाही.
 • वाघ हा मांसाहारी प्राणी असून हत्ती सोडून इतर कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. परंतु वाघांना मोठ्या प्राण्यांची शिकार करणे जास्त आवडते. वाघ सहसा एकटे शिकार करतात.
 • वाघ सावज हेरून दबा धरून बसतो व शिकार जवळ आल्यावर उडी मारून हल्ला करतो. शिकार पायाने दाबून धरतो आणि गळ्याचा चावा घेतो. सावजाचा जीव जाईपर्यंत वाघ त्याला तसेच पकडून ठेवतो. शिकार खाण्यापूर्वी वाघ आतडी काढून फेकून देतो मगच शिकार खातो.
 • वाघ उत्तम पोहू शकतात आणि उन्हाळ्यात थंड पाण्यात तासान तास बसून उष्णता कमी करतात.
 • वाघाचे आयुष्यमान सुमारे २० वर्षे असते.

Waghachi Mahiti / Information of Tiger in Marathi