Horse Information in Marathi

घोडा माहिती

 • पूर्वी जेव्हा गाडी किंवा रेल्वे नव्हती तेव्हापासून घोड्यांचा उपयोग वाहतुकीसाठी होतो आहे. घोडे रथ ओढण्यासाठी, माणसांची ने-आण करण्यासाठी, माल वाहतुकीसाठी उपयोगी येत असत. तसेच युद्धामध्ये देखील घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.
 • घोड्यांचा उल्लेख अगदी पुराणकाळापासून आढळतो यावरून आपण समजू शकतो की घोडे अनेक वर्षांपासून माणसाच्या उपयोगी येत आहेत. घोड्यांच्या वस्तीस्थानाला तबेला म्हणतात.
 • घोड्यांच्या सुमारे 350 विविध जाती अस्तित्वात असून; भारतात सिंधी, मारवाडी, काठेवाडी, पंजाबी, भीमथडी, पहाडी हे घोड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.
 • पाळीव घोड्यांचे अनेक प्रकार अस्तिवात असले तरी अरबी घोडे सर्वात उत्तम मानले जातात. अरबी घोडे सुमारे शंभर मैलापर्यंत न थांबता पळू शकतो.
 • घोड्याचे पोट इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांपेक्षा लहान असल्याने त्यांना जास्त आहाराची गरज नसते. परंतु त्यांना वरचेवर खाद्य द्यावे लागते. एका दिवसात घोडे सुमारे ३५ लिटर पाणी पितात.
 • घोडे शाकाहारी असतात. ओट हे धान्य, ओटचे गवत आणि दुर्वा हे घोड्यांचे आवडते खाद्य आहे. तसेच भिजलेला हरभरा सुद्धा घोड्यांना फार आवडतो. घोड्यांनी शिजलेले अन्न खाल्यास त्यांचे पोट बिघडते.
 • घोड्यांचा उपयोग वाह्तुकीसोबत विविध धाडसी खेळ जसे की रेसिंग, पोलो यासाठीही होतो. केवळ अमेरीकेतच घोड्यांचा अब्जावधी रुपयांचा व्यापार होतो.
 • घोड्यांच्या पायाच्या तळाशी लोखंडी नाल ठोकतात जी त्यांच्या पायाचे खडकाळ भागातून किंवा कठीण रस्त्यावरून पळताना रक्षण करतात.
 • घोड्यांचा जन्म सहसा रात्रीचा होतो आणि जन्म झाल्यानंतर सुमारे एक दोन तासांच्या आतच घोड्याचे पिल्लू उभे राहू शकते व चालू शकते. तीन ते चार वर्षात घोड्याचे पिल्लू पूर्णपणे मोठे होते.
 • घोड्यांचे डोळे इतर सस्तन प्राण्यांपेक्षा सुंदर तर असतातच सोबतच त्यांची नजर सुद्धा खूप तीक्ष्ण असते. परंतु ते अगदी समोरचे किंवा पाठचे बघू शकत नाहीत.
 • घोड्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. ते कधीच भेटलेल्या व्यक्ती किंवा जागेला विसरत नाहीत.
 • घोड्यांना उभे राहण्यापेक्षा बसण्यामध्ये जास्त उर्जा खर्च करावी लागते, म्हणून ते सहसा उभे राहूनच विश्रांती घेतात.
 • घोडे कधीही तोंडाने श्वास घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना धाप लागलेली आपल्याला कधीही आढळणार नाही.
 • घोड्यांचे आयुष्यमान सुमारे २५ ते ३० वर्षे असते. परंतु ओल्ड बिली नावाचा एक घोडा मात्र ६२ वर्षे जगला होता.

Information of Horse in Marathi