Skip to content
Home » Tips Information in Marathi » Rabbit Information in Marathi, Pet Rabbit Essay Nibandh

Rabbit Information in Marathi, Pet Rabbit Essay Nibandh

rabbit animal information in marathi

Rabbit Information in Marathi

ससा माहिती

  • ससा हा अतिशय गोंडस आणि सुंदर पाळीव प्राणी आहे. सश्यांचे दोन प्रकार असतात त्यातील रानटी ससे आकाराने मोठे असतात आणि पाळण्यालायक नसतात. पाळीव ससे तुलनेत थोडे छोटे असतात.
  • विसाव्या शतकापूर्वी सश्यांना पाळीव प्राणी म्हणून नाही तर त्यांच्या मऊ कातडी साठी आणि स्वादिष्ट मासांसाठी पाळण्यात येत असे.
  • ससे स्वभावाने चपळ पण भित्रे असतात म्हणून बहुधा समूहाने राहणे पसंद करतात. ते अतिशय वेगाने उड्या मारत पळू शकतात. त्यांचा वेग ताशी ३० ते ४० मीटर असतो. ससा ३६ इंच इतकी उंच उडी मारू शकतो.
  • ससे हे पांढरेशुभ्र, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात. जगभरात सश्यांच्या सुमारे ३०० हून अधिक जाती आहेत. सश्यांची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आणि सर्वात लहान नेदरलँड ड्वार्फ ही आहे
  • सश्याची मादी पिल्लांना जन्म देण्यापूर्वी छोटे बिळ तयार करते व पालापाचोळा आणि स्वतःच्या अंगावरील केस यांच्या मदतीने एक घरटे बनविते. मादी एका वेळी पाच ते आठ पिल्लांना जन्म देते.
  • सशाच्या पिल्लांना जन्मतः केस नसतात. पिल्ले काही दिवस डोळे बंद ठेवून काहीही हालचाल न करता निपचित पडून रहातात. सुमारे एका आठवड्यानंतर ती डोळे उघडतात व त्यांच्या अंगावर केस येऊ लागतात.
  • ससा हा शाकाहारी असून त्यांचे मुख्य अन्न गवत, कोवळा पाला आहे. सश्यांची विष्टा उत्तम नैसर्गिक खत आहे. ससा उलटी करू शकत नाही त्यामुळे त्याच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
  • सश्यांच्या कानाची लांबी सुमारे ४ इंच इतकी असू शकते. सश्यांना २८ दात असतात ज्यांची सतत वाढ होत असते.
  • ससा ३६० डिग्री मध्ये बघू शकतो त्यामुळे त्याच्यावर पाठून बेसावध हमला करणे शक्य नसते. परंतु तो नाकाच्या अगदी समोरचे बघू शकत नाही.
  • सश्यांची नजर तर तेज असतेच परंतु त्यांची ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता त्याहून आधी चांगली असते. ससे शिकाऱ्याला बघण्याआधी वासाने ओळखू शकतात.
  • सश्याच्या मिश्या त्याच्या शरीराच्या रुंदी एवढ्या मोठ्या असतात ज्यामुळे त्यांना आपण छोट्या जागेत जाऊ शकतो की नाही हे कळण्यास मदत होते.
  • ससे दिवसातून सुमारे अठरा वेळा डुलकी (छोटीसी झोप) घेतात.
  • सश्यांना घाम येत नाही ते त्वचेद्वारे आणि कानाद्वारे उष्णता बाहेर टाकतात.
  • त्यांचे आयुष्य दहा ते बारा वर्षे असते.

Information of Rabbits in Marathi Wikipedia Language

7 thoughts on “Rabbit Information in Marathi, Pet Rabbit Essay Nibandh”

  1. It helped me so much for completing my Marathi assignment…Thank you so much for availabiling this information for students like me…

  2. Hi, it is me, Aarohi.

    This page very nicely kept animal information, it is very nice…I love it as it helped me in my project. I have got very good marks.

    Ek dil se thank you…thank you so much.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *