NOC Letter Format from Society for Passport in Marathi, Police verification

Society NOC for Passport in Marathi

प्रति,
माननीय सचिव,
इंद्रधनुष्य सुवर्णवाटिका सोसायटी,
गोरेवाडी, चंद्रपूर-४२०४२०
महाराष्ट्र.
दूरध्वनी- ०२०-१२३४५६
मोबाईल- ९८९८१९८१९८
०५.०५.२०२०

विषय- पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC Letter) मिळणेबाबत

महोदय,

वरील विषयी विनंती अर्ज करतो कि, मी श्री. रामचंद्र दशरथराव रघुवंशी, नुकताच जिल्हा पासपोर्ट कार्यालय येथे पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला आहे. मी काम करत असलेल्या संस्थेच्या गरजेप्रमाणे येत्या काही महिन्यात मला युरोप आणि अमेरिका खंडातील काही देशांमध्ये व्यवसाय विस्तारीकरण प्रकल्पात सहभागी होणे गरजेचे आहे परंतु त्यासाठी माझ्याकडे पासपोर्ट नाही, नवीन पासपोर्ट मिळावा यासाठी मी अर्ज केलेला आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. आता त्यापुढील प्रक्रिया सुरु झालेली आहे.

सदरील अर्जाची छाननी, कागदपत्रांची तपासणी या सर्व प्रक्रियेसाठी मला जिल्हा पासपोर्ट कार्यालयामध्ये दि. १५.०५. २०२० रोजी हजर होण्यास सांगितले आहे, आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत परंतु यामध्ये अशी एक अट आहे कि, जर अर्जदार गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असेल, तर संबंधित सोसायटीचे ” ना-हरकत प्रमाणपत्र ” सचिवांच्या स्वाक्षरीनिशी अर्जासोबत असणे बंधनकारक आहे. ज्यामुळे हे सर्व कागदपत्रे पडताळण्यास मदत होईल. तरी मी आपणास विनंती करतो कि मला हे ना-हरकत प्रमाणपत्र आपल्या सोसायटीच्या वतीने अधिकृत लेटरहेड वर मला देण्यात यावे, जेणे करून मला पासपोर्ट मिळवण्यात सुलभता येईल आणि माझे कार्यालयीन काम पूर्ण होण्यात अडथळा येणार नाही.

मी आपल्या सोसायटीमध्ये फेब्रुवारी २०११ पासून फ्लॅट क्रमांक ४२०,सी विंग मध्ये वास्तव्यास आहे. सदरील फ्लॅट हा मी ऑगस्ट २०१६ मध्ये अधिकृतरीत्या खरेदी केलेला आहे. तसेच नियमाप्रमाणे मी दरमहा सोसायटीचा देखभालीचा खर्च नियमितप्रमाणे वास्तव्यापासून देत आहे.

ना-हरकत प्रमाणपत्रामध्ये आपल्या सोसायटीचा रजिस्ट्रार कार्यालयामधील अधिकृत नोंदणी क्रमांक, मी राहत असलेला फ्लॅट क्रमांक आणि वास्तव्याचा कालावधी नमूद करणे पासपोर्ट कार्यालयाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच आपण ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर ते मला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून ” चारित्र्याचा दाखला “ मिळवणे आहे, जी पासपोर्ट साठी आवश्यक असणारी एक प्रक्रिया आहे. त्याच्या खात्रीसाठी आपणास पोलीस ठाण्यातून खात्री करण्यासाठी संपर्क साधला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी व पोलिसांना सहाय्यता करावी. आपणास लागणारे सर्व कागदपत्रांची प्रत मी सोबत जोडलेली आहे.

आपणास याबाबतीत कोणत्याही सहाय्यतेची गरज भासल्यास मला कळवावे मी सर्व प्रकारे आपणास मदत करेल.

तरी आपणास विनंती करतो कि मला लवकरात लवकर ” ना-हरकत प्रमाणपत्र ” अदा करण्यात यावे ही नम्र विनंती.

आपला विश्वासू ,
श्री रामचंद्र दशरथराव रघुवंशी,
फ्लॅट क्रमांक- ४२०, सी विंग ,
इंद्रधनुष्य सुवर्णवाटिका सोसायटी,
गोरेवाडी, चंद्रपूर-४२०४२०.

( पत्रासोबत मला देण्यात आलेले मार्च चे अतिरिक्त शुल्क असलेले बिल आणि गेल्या ६ महिण्यातील मी भरलेल्या बिलांची देयके जोडत आहे.)

Application Letter in Marathi / Few Lines

3 thoughts on “NOC Letter Format from Society for Passport in Marathi, Police verification”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *