My Favourite Teacher Essay in Marathi

माझे आवडते शिक्षक

आमच्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगले शिकवातात. शाळेतील प्रत्येक शिक्षकां विषयी आम्हाला आदर आहेच, पण माझे सर्वात आवडते शिक्षक म्हणजे काळे सर. काळे सर हे सर्वांचेच खूप आवडते शिक्षक आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला गणित आणि इंग्रजी शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात. जर मुलांना गणितात व इंग्रजीत काही येत नसेल तर त्या मुलांकडून सर अधिक लक्ष देतात आणि त्यांच्या कडून अधिक मेहनत करून घेतात. बऱ्याचदा काही जणांना शिक्षका विषयी थोडी भीती असते. पण काळे सरांच्या बाबतीत असे काही नाही. सर खूप गमती जमती करत शिकवायचे व त्यामुळे मुलांना ते सर्वच मुलांचे खूप आवडीचे शिक्षक आहेत. काळे सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा बऱ्याच जणांना खूप फायदा होतो. आमच्या शाळेत सातवी ते दहावी मधील विद्यार्थी इंग्रजी व गणितासाठी कधीही क्लासेस लावत नाहीत. त्यांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे मुलांना कधी अभ्यासाचा कंटाळा येत नाही. काळे सर खूप हुशार व बुद्धिमान आहेत.

काळे सर शिक्षक म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणून देखील खूप चांगले आहेत. आमच्या शाळेत एकदा एका मुलाकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा त्या मुलाची फी आमच्या सरांनी भरली. काळे सरांचे गणित आणि इंग्रजी हे विषय मुख्य असले तरी त्यांना इतर विषयांचे पण खूप चांगले ज्ञान आहे. काळे सर शिकवताना खूप सारी उदाहरणे देऊन किंवा चांगले दृष्टांत देऊन समजवातात, त्यामुळे तो धडा किंवा कविता समजण्यास व लक्षात ठेवण्यास खूप मदत होते. अभ्यास शिकवताना ते आम्हाला खूप सारे छोटे छोटे किस्से सांगून शिकवातात, त्यामुळे अभ्यासातील कठीण धडे सोपे आणि मजेदार होऊन जातात. आमच्या शाळेतील काही मुले बाहेरची शिकवणी लाऊ शकत नाहीत, अश्या मुलांसाठी सर शाळे अगोदर किंवा नंतर दोन तास शिकवणी घेतात. जी मुले अभ्यासात थोडी कमजोर आहेत त्या मुलांवर काळे सरांचे बारीक लक्ष असते. एखादी गोष्ट त्यांना समजत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर ते विविध प्रयत्न करून धडा कसा लक्षात येईल आणि लक्षात राहील यासाठी झटत रहातात.

आम्हाला आमचे शिक्षक इतके आवडतात की आम्ही त्यांचा तास कधी येईल याची वाट पाहत रहातो. काळे सर मनाने खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांच्या जवळ सगळे आपल्या समस्या घेऊन जातात व सर त्यावर नक्कीच चांगला उपाय सांगतात. सर हे फक्त अभ्यासच करायला सांगत नाही तर ते खेळ पण खेळायला सांगतात. मुलांनी सगळ्या गोष्टीत हुशार असावे असे त्यांना वाटते. आमच्या शाळेत जेव्हा क्रीडास्पर्धा असतात तेव्हा सर आम्हाला वेगवेगळया खेळांची माहिती सांगतात. खेळांचे नियम ते आम्हाला समजून सांगतात. ते मुलांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना त्या – त्या क्षेत्रात करियर करायला सांगतात. आणि ते त्या मुलांच्या पालकांना पण समजून सांगायचे कि अभ्यासा व्यतिरिक्त इतर ही अनेक क्षेत्रे आहेत जिथे मुलांची प्रगती होऊ शकते. बऱ्याच वेळा पालकांना समजावणे कठीण व्हायचे, पण स्वतःच्या हुशारीचा वापर करून सर त्यांचे म्हणणे बरोबर पटवून सांगायचे.

माझ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांचे जसे महत्वाचे स्थान आहे तसेच माझ्या शिक्षकांचे पण मोलाचे स्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान मोठेच असते कारण आपल्याला घडविण्यात जसा आई वडिलांचा हात असतो तसा शिक्षकांचा पण मोलाचा वाटा असतो. आपण जर एखादी चूक केली तर अनायसे शिक्षकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे शिक्षकांनी केलेले संस्कार फार मोलाचे ठरतात. शाळेत, महाविद्यालात आणि विद्यापीठात शिक्षक केवळ मुलांना ज्ञान देऊन त्यांचे आयुष्य समृद्ध करणे एवढेच काम करत नाहीत तर आयुष्य कसे जगावे याबद्दल पण मार्गादर्शन करतात. आपण हे ऐकले असेलच की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणूस प्रत्येक वळणावर काहीतरी शिकत असतो, मग ते आपल्या आई-बाबां कडून असो किंवा आपल्या मित्र-मंडळीं कडून असो. बोबडे बोल बोलण्यापासून ते नोकरीला लागेपर्यंत आपण विद्यार्थीच असतो.
काळे सरांच्या मते पुस्तकी शिक्षणा इतकेच शारीरिक शिक्षण देखील महत्वाचे आहे.

काळे सरांनी आम्हाला घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते आमच्यावर आई सारखे प्रेम करतात आणि वडिलांसारखी शिस्त लावतात. त्यांच्या शांत आणि सुस्वभावामुळे ते मुलांना आपलेसे वाटतात. काळे सरांनी आम्हाला संस्काराचे धडे सुद्धा दिले आहेत. आपण कितीही शिक्षण घेतले तरी आपले जीवन संस्काराविना व्यर्थ आहे असे त्यांचे म्हणणे आहे. माणूस कुठेही गेला आणि त्याने कितीही पैसे कमावले तरी चांगले संस्कार नसतील तर त्या पैशांचा इतरांना फायदा होत नाही तर उलटे नुकसानच होते हे सरांनी आम्हाला समजावून सांगितले. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणा ऋणी आहोत आणि या समाजासाठी आपल्याला नेहमीच काहीतरी चांगले कृत्य करत राहिले पाहिजे असे सरांनी आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही निस्वार्थपणे कोणाचीही मदत करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद मिळतो, पण त्याहून जास्त आनंद तेव्हा मिळतो. जेव्हा आम्ही सरांना आम्ही केलेल्या कार्याबद्दल सरांना सांगतो आणि सरांना आमचा अभिमान वाटतो तेव्हा.

Teachers Day Speech in Marathi PDF

Adarsh Shikshak Nibandh / Essay on Teacher in Marathi Composition