Sun Information in Marathi

Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi || सूर्य उगवला नाही तर Nibandh

Surya Ugavala Nahi Tar

सूर्य उगवला नाही तर निबंध

सूर्य उगवला नाही तर असा विचार पण आपण करू शकत नाही. कारण सूर्य उगवला नाही तर आपली सगळी कामे होणार नाहीत. माणसाला जगायला जसे हवा, पाणी, निवारा यांची गरज आहे तशीच सूर्याची देखील गरज आहे. सूर्य उगवणे व मावळणे ही नैसार्गिक क्रिया आहे. ही क्रिया होणार नाही असे होणार नाही. परंतु जर का असे झाले तर मानवाचे जगणे कठीण होईल. ऊन, पाऊस आणि हवा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील कोणतीही गोष्ट नसेल तर संसाराचा ताळमेळ बिघडून जाईल.

लहान मुलांना जर सूर्य उगवला नाही तर चालेल का? हा प्रश्न विचारला तर त्यांना ह्या प्रश्नाची गंमत वाटेल. ते कदाचित असे म्हणतील की चालेल कारण त्यांना असे वाटेल की सूर्य उगवला नाही तर आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल. पण त्या लहान मुलांना सूर्याचे महत्व माहित नसते. पण ते आपल्याया त्यांना समजवावे लागणार. सूर्य उगवला नाही तर झाडांना ऊन कोठून भेटणार. झाडांना जगण्यासाठी व मोठे होण्यासाठी जसे पाणी घालावे तसेच त्यांना सुर्याप्रकाश पण आवश्यक आहे.

आपल्या पृथ्वीवरील वाढत्या प्रदुषणामुळे मानवाचे जगणे कठीण झाले आहे. झाडांना सूर्यप्रकाश भेटला नाही तर ती जगू शकणार नाहीत. झाडे आपल्यासाठी हवा शुद्ध करतात. आपल्याया जगण्यासाठी प्रत्यक्षपणे सूर्यप्रकाशाची गरज नसली तरीही आपल्याला झाडे आवश्यक आहेत आणि झाडांना जगण्यासाठी सुर्य्प्रकास लागतो. ही झाडे नसतील तर हे वाढते प्रदूषण कोण कमी करणार? झाडे पण मानवासारही सजीव असतात. झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात आणे ऑक्सिजन बाहेर सोडतात. झाडांना अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. झाडे नसतील तर हे वाढते प्रदूषण कमी होणार नाही व मानवाच्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून सूर्य हे उगवणे फार महत्वाचे आहे.

सूर्य उगवला नाही तर ही कल्पनाच करवत नाही. आपल्या जीवनाचे दुसरे नाव सूर्य आहे. जर का सूर्य उगवला नाही तर ही सृष्टी नष्ट होईल. सगळीकडे अंधार आणि काळोख होईल. कुणालाही सकाळी उठण्याचा व कामावर जाण्याचा उत्साह राहणार नाही. आपल्याला सूर्य इतका आवश्यक आहे की तो जर उगवला हानी तर आपल्याया ऑक्सिजन पूरवणारी झाडे राहणार नाहीत. आणि अश्या प्रकारे सूर्याचे उगवणे आपल्याशी जोडलेले आहे. देवाने निसर्गाची निर्मिती काही अश्या प्रकारे केली आहे की त्याचा विचार आपण करू शकत नाही.

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानव हा देवाने बनवलेल्या निसर्गाची बरोबरी करू शकत नाही. ह्या सगळ्या क्रिया म्हणजे सूर्य उगवणे, मावळणे, झाडांचे प्राणवायू सोडणे, पाऊस, ऊन थंडी पडणे ह्या नैसर्गिक क्रिया आहेत. ह्यातील एक जरी क्रिया घडली नाही किंवा कमी झाली किंवा वेळेवर झाली नाही तर मानवी जीवन धोक्यात येईल.

सूर्य फक्त आपल्यालाच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांच्या आयुष्यासाठी आवश्यक आहे. कारण आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे दिवे बनवले तरीही आपण सूर्यप्रकाश तयार करू शकत नाही. सूर्य प्रकाश नाही तर झाडे हळूहळू मरून जातील. अन्नाचा भयंकर तुडवडा निर्माण होईल. सगळीकडे हाहाकार माजेल. शाकाहारी प्राणी अन्नावाचून मरून जातील. त्यापाठोपाठ मांसाहारी प्राण्यांचा देखील नाश होईल कारण त्यांना शिकार करण्यासाठी कोणताही प्राणी मिळणार नाही. अश्या प्रकारे संपूर्ण जीवसृष्टीच कोलमडून पडेल. सूर्य उगवला नाही तर पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. पाण्याचे बाष्पीभवन न झाल्यास पावसाचे ढग तयार होणार नाही आणि पाऊस सुद्धा पडणार नाही. म्हणजेच अन्नासोबतच पाण्याचा देखील तुटवडा निर्माण होईल. पृथ्वीवरील जीवन भकास होऊन जाईल.

सूर्य उगवला नाही तर सकाळ होणार नाही, कोंबडा आरवणार नाही, पशु पक्षांची किलबिलाट ऐकू येणार नाही. सगळीकडे अंधारच अंधार असेल. हो पण या अंधारा मुळे जे कुबट वातावरण तयार होईल त्यामुळे जीवाणू आणि रोगजंतू मात्र वेगाने वाढतील. सर्वत्र रोगकारक वातावरण तयार होईल. निरनिराळे साथीचे रोग पसरतील. सर्वत्र रोगराई, गरिबी, उपासमार यांचेच राज्य असेल. म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पनाच करवत नाही. जीवनाचे दुसरे नाव सूर्य आहे. दररोज सूर्य उगवला नाही तर सगळे कामाला जाणार नाहीत. जर एके दिवशी सूर्य उगवला नाही तर सारे चैतन्य हरवून जाईल. सूर्य उगवला नाही तर? मनसोक्त गादीवर लोळत पडता येईल, पण बाजार भरणार नाही, वस्तूची देवाण घेवाण होणार नाही.

सूर्य उगवला नाही तर…पृथ्वीचे तापमान हळू हळू कमी होत जाईल. वातावरणातील उष्णता कमी होईल व थंडी वाढेल. आपण सर्वाना सुरवातीच्या काळात थंडीचा आनंद घेता येईल, पण ह्याचे दुष्परिणाम एवढे होतील की आपली सृष्टी धोक्यात येईल. निसर्ग चक्र बिघडून जाईल. पण आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही कारण सूर्य नेहमी उगवत आला आहे आणि नेहमी उगवतच राहील. एक दिवस दांडी मारायला तो काही माणूस नाही. उगाचच नाही हिंदू धर्मात सूर्याला देव मानून त्याची पूजा करत.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Surya Ugavala Nahi Tar in Marathi Language Essays

21 thoughts on “Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi || सूर्य उगवला नाही तर Nibandh”

  1. Neha Chaudhari

    This helps me a lot to complete my homework and these essays are very nice…A BIG THANKS!

  2. Gousiya Shaikh

    Thank you for the essay with the help of this we can complete are essay thank you so much the best essay ever it’s really were helpful…..The essay is to important for me in the essay the words are really were Prft…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *