Daisy Marathi Mahiti

Daisy Flower Information in Marathi | डेझी फुल माहिती

Daisy Flower Information in Marathi

डेझी – तारे जमींपर

एक अंटार्टिका सोडली तर डेझी हे फुल जगात कुठेही फुलते. आपले ताऱ्यांसारखे प्रसन्न मुख घेऊन जगाला मोहित करते. डेझी तिच्या प्रसन्न रुपामुळे एक प्रकारची सकारात्मकता पसरवते. तसेच वधूच्या डोक्यावर डेझीचा मुकुट तिची पवित्रता आणि निरागसता दर्शविते आणि व्हर्जिन मेरी व इन्फन्ट जिझसचे ते प्रतिक आहे. नॉर्स दंतकथेत फ्रेया ह्या प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन, ममत्व ह्याची देवता, हिचे डेझी हे प्रतिक आहे. रोमन दंतकथेत व्हर्चुअस हा ऋतूंचा देव बेलीज ह्या परीवर मोहित झाला आणि तिच्या मागे लागला. म्हणून त्याच्यापासून बचाव करून घेण्यासाठी बेलीजने स्वत:ला डेझीच्या फुलांमध्ये रुपांतर करून घेतले होते. अमेरिकेत कांही ठिकाणी डेझी सूर्य, आनंद, जिंदादिली आणि सत्याचे प्रतिक मानतात. “As fresh as daisy” असा वाक्प्रचार पण आहे.

इतिहास :

  • डेझीचा इतिहास 2200 वर्षापूर्वीचा आहे. इजिप्तचे लोक ह्या फुलाचा औषध म्हणून उपयोग करीत होते. इंग्रज पण डोळे आणि पोटाच्या तक्रारीवर औषध म्हणून उपयोग करीत होते. राजा हेन्रीला ‘किंग ऑफ डेझी’ म्हणायचे.
  • डेझी ह्याचा अर्थ day’s eye असा पण घेतात. म्हणजे हे फुल सकाळी उगवते आणि रात्री कोमेजते म्हणून. लुथर बरबॅंक ने 1901 मध्ये शाश्ता डेझीचे फुल विकसित केले जे आज जगभर लोकप्रिय आहे.
  • डेझी चे वनस्पती समूहामध्ये वर्गीकरण 1792 मध्ये झाले. हे फुल वनस्पती समूहात, (किंगडम)ऍस्टरसी कुटुंबातील आहे. त्याच्या ताऱ्यासारख्या आकारामुळे ऍस्टर हे नाव त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळाले.
  • आपल्याकडे त्याला अस्टरच म्हणतात. हे एक फुल नसून हा पुष्पसमूह (क्लस्टर) आहे. मध्ये पिवळी किंवा काळी छोट्या फुलांची तबकडी आणि भोवताली किरणांसारखी लांब पाकळ्यांची फुले असा थाट असतो. पाने गोल किंवा चमच्याच्या आकाराची असतात.
  • मधल्या तबकडीला कॅपिट्युला आणि भोवतालच्या फुलांना फायलारीस म्हणतात. हे संयुक्त फुलाच्या वर्गात मोडते. हि शोभेची बुकेमध्ये वापरली जाणारी फुले आहेत. हि फुलदाणीत 10 दिवस पण टिकते. ह्या फुलाच्या विविध रंगांच्या जाती आहेत. आणि त्या विविध कारणांनी वापरल्या जातात.
  • बऱ्याचदा बुके, फुलदाणी, मंडप सजावट, मंदिर सजावट, हळदी कुंकू इत्यादी साठी वापरल्या जातात. त्यांच्या सुंदर रंगांमुळे आणि आकर्षक रचनेमुळे हि फुले समारंभाचे उद्दिष्ट जास्त दृग्गोचर करतात. त्या जाती अशा आहेत:- ग्लोरिया, रूड बेकीया, ब्लॅक आयीड, ब्राऊन आयीड, सुसान, मेरी लॅंड, पॅरीस, कॅनरी आयलॅड, शास्ता, जरबेरा, स्पॅनिश, ब्ल्यू, लेझी, आफ्रिकन, स्वान रिव्हर, टार्टारियन, पेंटेड, क्राऊन, ऑक्स आय, निप्पोन, जायंट, किंगफिशर, सनशाईन, ट्रान्सव्हाल, याहोका, लिव्हिंग स्टोन, देल्बार्ग इ.

लागवड प्रक्रिया :

  • डेझी हि वनस्पती लावायला आणि वाढवायला अत्यंत सोपी आहे. हिची लागवड बियांपासून करतात. शक्यतो संध्याकाळ हि योग्य वेळ असते आणि वसंताच्या आधी करावी.
  • पूर्ण सूर्यप्रकाशात निचरा होणाऱ्या जमीनीत कंपोस्ट खताचा उपयोग करून लावावी. नंतर शेड करावी, दोन झुडूपांमध्ये 9 ते 12 इंच जागा ठेवावी, पाणी योग्य प्रमाणात घालावे, हिवाळ्यात चिखलाचा जड थर करावा. हि झाडे मुळा पासून पण पसरून पुनरुत्पादन करतात.
  • जरी हि बारमाही वनस्पती असली तरी वसंतात खरा बहर येतो. लॉन डेझी भरमसाट वाढतात आणि फुलांचा गालीचा पसरला आहे असे वाटते.
  • ती मुलांसाठी विषारी असतात कारण त्यामुळे त्वचेवर रॅश आणि फफोले येतात. काही डेझींना गोमुत्रासारखा किंवा घाण वास येतो.
  • ह्या झाडाला वाढीसाठी मेलेली फुले काढून टाकावी लागतात. ह्या झाडांना आठवड्यातून 1 ते 2 इंच पाणी दिले तरी चालते. सूर्यप्रकाश मात्र सौम्य आणि आवश्यकच असतो.
  • कारण त्यामुळे त्यांचा आकर्षक रंग येतो. ह्या फुलांच्या सुंदर रंगामुळे मधमाशा आणि फुलपाखरे आकर्षित होतात. ह्या फुलांच्या बागेला फक्त ससे आणि हरीण ह्यांच्यापासून सांभाळावे लागते कारण ते ह्या झाडांचा फडशा पाडतात.

फायदे व उपयोग :

  • ह्या फुलांना बाजारात खूप भाव येतो. एका फुलाच्या दांड्याला 1. 16 ते 1. 40 डॉलर मिळतात. त्यामुळे हा पुष्पोत्पादानातील मुख्य व्यवसाय आहे.
  • तसेच ह्या फुलांना आणि ह्याच्या पानांना त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे खूप मागणी आहे. विशेषत: होमिओपथिमधे ह्याचा खूप उपयोग केला जातो.
  • पुरातन काळापासून ह्याचे औषधी गुणधर्म लोकांना माहित आहेत. रोमन राजे लढाईला जातांना ह्या फुलाच्या गोण्या भरून घेऊन जायचे आणि शस्त्राने झालेल्या जखमांवर ह्याच्या रसात बँडेज बुडवून ते लावायचे म्हणजे जखमा लवकर भरून येत. तसेच हि फुले पोटदुखी आणि श्वसनमार्गात अडथळा आला तर वापरत.
  • ह्याच्या तुरट ऍस्ट्रिंन्जन्ट गुणामुळे बऱ्याच वनौषधी मध्ये ह्यांचा उपयोग रक्तस्त्राव, पाचन, खोकला आणि पाठदुखीवर ह्याचा उपाय होतो.
  • गंमत म्हणजे हि फुले खाण्यास पण खूप लोकप्रिय आहेत. सॅलड मध्ये, सॅन्डविचेस आणि चहा मध्ये ह्या फुलांचा वापर करतात. ह्या फुलांमध्ये विटामीन C आहे म्हणून रोग प्रतिकारशक्ती साठी खूप उपयुक्त आहे.
  • कळ्या कच्च्याच खाल्ल्या जातात. काहींना अननसासारखी चव असते. त्यामुळे शोभे बरोबर हि फुले आपल्या पोटाचा पण विचार करतात.

वाह डेझी वाह :

  • ह्या फुलांनी साहित्यिकांना पण भुरळ घातली आहे. शेक्सपियरने त्याच्या हॅम्लेट ह्या प्रसिद्ध नाटकात ऑफिलीयाच्या निष्पापपणाची तुलना डेझी फुलाबरोबर केली आहे. वर्डस्वर्थने ह्या फुलांवर “To The Daisy” हि कविता केली आहे.
  • असे हे सर्व जगात लाडके फुल देवाने निर्मून आपल्याला प्रेम, ममत्व आणि निरागसतेची शिकवण दिली आहे. आपल्या भावना व्यक्त करायला कधी कधी गुलाबापेक्षा हि फुले जास्त उपयोगी ठरतात.
  • असे म्हणतात की “बाग में हर तरह के फुल होते है, हर एक को अपनी अपनी महक और खुशबू होती है” पण डेझी ची महक आणि उपयोग वादातीत आहे म्हणूनच काहीजण आपल्या गोड आणि लाघवी मुलीला डेझी हे नाव देतात.

Information of Daisy Flower in Marathi / Daisy Flower Mahiti Wikipedia

1 thought on “Daisy Flower Information in Marathi | डेझी फुल माहिती”

  1. गोरक्ष दिवटे

    डेजी फुलांची सुंदर माहीती मिळाली…खुप खुप आभार!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *