शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशांमधील आहे. शेवंतीची फुले विविध रंगाची आणि आकाराची असतात.
शेवंतीच्या सुमारे ४० जाती १०००हून अधिक उपप्रजाती आहेत. शेवंतीचे झुडूप छोटे असते. शेवंतीची फुले अर्ध्या इंचापासून १० इंच व्यासापर्यंत मोठी असू शकतात.
शेवंतीची काही फुले चपटी थाळीसारखी असतात तर काही फुले गोंड्यासारखी असतात. शेवंती खासकरून पांढऱ्या व पिवळ्या रंगाची असते, परंतु काही शेवंतीची फुले जांभळी, गुलाबी, लाल, गडद गुलाबी, तांबूस रंगाची सुद्धा असतात.
लाल शेवंती प्रेमाचे, पांढरी शेवंती सत्याचे आणि पिवळी शेवंती ममतेचे प्रतिक आहे.
क्विल, डेजी, बटण, पोमपोम, स्पून, कुशन, स्पायडर आणि अनिमोन हे काही शेवंतीचे प्रकार आहेत.
आशियातील काही भागांमध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या शेवंतीच्या फुलांना उकळून गोड पेय बनविले जाते. तसेच कोरियामध्ये तांदूळ आणि शेवंतीच्या सहाय्याने मद्य बनविले जाते.
शेवंतीच्या फुलांच्या चूर्णापासून पायरेथ्रीन नावाचा एक घटक मिळतो जो कीटकांना व डासांना दूर पळविण्याचे काम करतो.
नासाच्या अभ्यासातून उघडकीस आले आहे की, शेवंतीची झाडे घरात लावल्यास घरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
युरोपमधील काही देशांमध्ये शेवंती मृत्यूचे प्रतिक आहे आणि अंत्यसंस्कार किंवा स्मशानभूमीतच शेवंतीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जपान, कोरिया आणि चीनमध्ये सुद्धा पांढरी शेवंती अधोगती आणि दुःखाचे प्रतिक आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये मदर्स डेच्या दिवशी आईला शेवंतीची फुले देण्याची प्रथा आहे. तसेच काही पुरुषही या दिवशी आईच्या सन्मानार्थ शेवंतीची फुले परिधान करतात.
इटलीमध्ये ऑल सोल डेला मृत व्यक्तीच्या थडग्यावर शेवंतीची फुले वाहण्याची प्रथा आहे. इटलीत कोणालाही शेवंतीची फुले देणे अपमानास्पद आहे.
जपानमध्ये राजेशाही कुटुंबातील व्यक्ती शेवंती फुलाच्या आकाराची मोहर उपयोगात आणीत. ९ सप्टेंबरला साजरा होणाऱ्या फेस्टिवल ऑफ हॅपीनेसमध्ये शेवंतीच्या फुलांची सजावट करतात. त्याचप्रमाणे शेवंती शिकागो शहराचे अधिकृत फुल आहे.
काही ठिकाणी शेवंतीच्या फुलांचा चहा बनवितात जो सुगंधित आणि आरोग्यासाठी लाभदायक असतो. घश्याची सूज, ताप, डोकेदुखी यापासून चहामुळे आराम मिळतो. चीनमधील पारंपारिक औषधामध्ये शेवंतीचा उपयोग केला जातो.
शेवंतीला सहसा ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये फुले येतात. नोव्हेम्बरमध्ये वाढदिवस असल्यास किंवा लग्नाच्या तेराव्या वाढदिवसादिवशी शेवंतीची फुले देण्याची प्रथा काही देशांमध्ये आहे.
शेवंतीची फुले पाने काढून पाण्यात ठेवल्यास दोन आठवड्यापर्यंत राहू शकतात.
फेंगशुईच्या अनुसार शेवंतीची फुले घरात सुख आणि आनंद आणतात.
शेवंतीच्या फुलांचा व पानांचा उपयोग चीनी लोक जेवणात सुद्धा करतात. हे जास्त चविष्ट नसते पण खूप लाभदायक असते.
Shevanti Flowers Wikipedia Language
1 thought on “Chrysanthemum Flower Information in Marathi, शेवंती फुल माहिती”
Ty 4 d info.