Skip to content

Hippeastrum Flower Information in Marathi, हिप्पीस्ट्रम फुलाची माहिती मराठी

Hippeastrum Flower Images

Hippeastrum Flower Information in Marathi

हिप्पीस्ट्रम फ्लॉवर माहिती

Introduction / परिचय :

  • हिप्पीस्ट्रम ही एक फुलाची जात आहे. हिप्पीस्ट्रम या फुलाचे वैज्ञानिक नाव आहे तर सामान्यपणे हे ‘अमरेलीस’ म्हणून ओळखले जाते.
  • हे सदाहरित आहे आणि गडद लाल किंवा जांभळ्या रंगांचे अत्यंत आकर्षक असे मोठे फुल असते. या फुलांचा वापर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. ख्रिसमस मध्ये तर या फुलांची विशेष सजावट केलेली असते.
  • उत्तर गोलार्धामध्ये अनेक घरांच्या बाहेर हे फुले आलेली आढळतात. या फुलांचा मोठ्याप्रमाणावर व्यापार केला जातो. दिसायला अत्यंत आकर्षक अशा या फुलांना जागतिक बाजार पेठेमध्ये देखील मोठी मागणी असते.

Description / वर्णन :

  • हिप्पीस्ट्रम याची रचना म्हणजे खरे तर फुलांचे फुल अशी आहे असे आपण म्हणू शकतो, २५ ते ३० सेमी उंच असणाऱ्या पोकळ देठाच्या दांडीवर याची दोन ते तीन फुले येतात. या फुलांचे मिळून एक फुल दिसेल अशी याची सुंदर रचना होते. सर्व फुलांचा मिळून व्यास हा ५ ते १५ सेमी इतका असू शकतो.
  • या फुलांच्या फुलामधले एक फुल हे साधारणपणे ६ सेमी व्यासापेक्षा जास्त असू शकते. हे फुल आकाराने मोठे आणि संपूर्ण खुललेले असते. साधारणपणे ४ ते ५ पाकळ्या एका फुलाला असतात आणि आतमध्ये परागकल देखील असतात. उंच दांडीवर असलेली हे फुलांची रचना अतिशय आकर्षक वाटते. परंतु इतर फुलांप्रमाणे या फुलांमध्ये सुवास नसतो.

Name and Clan / नाव आणि कुळ :

  • हिप्पीस्ट्रम हे नाव या फुलाला त्याच्या आकारामुळे आणि पानांच्या रचनेमुळे मिळाले आहे. हिप्पीस्ट्रम हे नाव हिप्पीअस आणि स्ट्रॉन अशा दोन ग्रीक शब्दांचा मिळून बनलेला आहे ज्याचा अर्थ घोडेस्वार तारा किंवा नाईट स्टार असा होतो. या फुलाचा आकार एका ताऱ्यासारखा आहे म्ह्णून याला नाईट स्टार असे नाव दिले गेले आहे. हे फुल म्हणजे निश्चय, अतीव प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक आहे.
  • हिप्पीस्ट्रम हे एमेलीलीडासी कुटुंबामधील पोटजात आहे. यांच्या सुमारे ९० उपजाती आहेत ज्यांचे ६०० पेक्षा जास्त संकरित प्रजाती बनवल्या गेल्या आहेत. कॅरेबिअन बेटे, मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेमध्ये याचे मूळ आहे. या फुलाच्या अनेक संकरित जाती देखील आपण बघू शकतो.

Hybrid Varieties / लागवड आणि संकरित जाती :

  • या फुलांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामूळे यांची व्यावसायिक पद्धतीने देखील लागवड केली जाते. तसेच अनेक घरांमधल्या हौशी गृहिणींनी आपल्या घरांमधील कुंड्यांमध्ये देखील याच लागवड केलेली आपल्याला पाहावयास मिळते. या झाडाचे अनेक बियाणे देखील उपलब्ध असतात.
  • याची लागवड करण्यासाठी आधी या बियाणं सीड बेड मध्ये लावण्यात येते आणि कोंब फुटल्यानंतर याना प्रतिरोपीत केले जाते. त्यांना उबदारपणा आणि भरपूर पाण्याची आवशकता असते. बियाणांमधून इच्छित झाडे फुलण्यासाठी साधारणपणे ६ वर्षे लागतात. तर एका हिप्पीस्ट्रम झाडाचे आयुष्य हे ७५ वर्षे असू शकते.
  • या फुलाच्या अनेक संकरित जाती देखील आपण बघू शकतो. ज्या मध्ये अनेक रंगीत फुले उपलब्ध आहेत. जसे पंधरा, पिवळा, फिक्कट गुलाबी. संकरित जातीनुसार फुलांच्या रचनेत थोडाफार फरक आपण अनुभवू शकता. काही संकरित फुलांमध्ये सुगंध देखील असतो.
  • या संकरामध्ये अनेक प्रकारची विविधता बघावयास मिळते जसे एकच मोठे फुल, एका दांडीला दोन विविध फुल किंवा सामान्यांपेक्षा आकाराने जरासे लहान फुल.

Information of Hippeastrum Flower Name in Marathi / Hippeastrum Flower Mahiti Wikipedia

1 thought on “Hippeastrum Flower Information in Marathi, हिप्पीस्ट्रम फुलाची माहिती मराठी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *