Skip to content

Tulip Flower Information in Marathi, ट्युलिप फुलांची माहिती मराठी Wikipedia

Tulip Marathi Mahiti

Tulip Flower Information in Marathi

Tulip Flower – ट्युलिप माहिती

 • ट्युलिप हे वसंत ऋतूमध्ये फुलणारे सुंदर फुल आहे. याची नैसर्गिक निवासस्थान अफगाणिस्तान, काश्मीर, उत्तर इराण, टर्की, चीन, जपान, सायबेरिया असे देश आहेत.
 • ट्युलिप ह्या फुलाला त्याचे नाव इराणी शब्द टोलीबन ह्या शब्दापासून मिळाले आहे. ह्या शब्दाचा अर्थ आहे पगडी. ट्युलिपच्या फुलांना उलटे केले तर पगडीसारखे दिसतात म्हणूनच त्यांना हे नाव मिळाले आहे. ट्युलिप ही फुले लिलीच्या वर्गामधील आहेत. मध्य आशिया मध्ये उगवणारी ही फुले १५५४ साली ऑस्ट्रेलिया, १५७१ साली हॉलंड आणि १५७७ साली इंग्लंड मध्ये नेण्यात आली आणि हळूहळू त्यांनी जगभरातील लोकांच्या मनावर साम्राज्य स्थापित केले.
 • पूर्वीच्या काळात मध्य आशियामध्ये ही फुले जास्त लोकप्रिय नव्हती परंतु नेदरलँडमध्ये गेल्यानंतर मात्र ह्या फुलांना बरीच लोकप्रियता मिळाली.
 • ट्युलिपच्या फुलांमध्ये भरपूर विविधता आढळते म्हणूनच यांचे योग्य वर्गीकरण कठीण होते. तरीही ह्या फुलांच्या १०० जाती व ४००० हून अधिक प्रजाती आहेत. ही फुले लाल, गुलाबी, पिवळी, सफेद, जांभळी अश्या अनेक रंगात आणि रंगछटांमध्ये आढळून येतात.
 • आपल्या सुंदर रुपामुळे व मोहक रंगांमुळे ही फुले दर्शकांचे मन मोहून घेतात परंतु ह्या फुलांना गंध मात्र नसतो. ही रोपे छोटी असतात आणि याचे कंद असतात ज्यामधून 75 सेमी पर्यंत लांब असे सरळ देठ निघतात. यांच्या कळ्या जवळपास एक सारख्याच दिसतात.
 • बहुतेक ट्युलिपच्या प्रजातींमध्ये एका देठावर एकच कळी उमलते परंतु काही अपवादात्मक प्रजातीमध्ये एकाचे देठाला चार-पाच कळ्या देखील येतात.
 • ट्युलिपच्या फुलांच्या प्रेम आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतिक समजले जाते. ह्या फुलांच्या विविध रंगांचे विविध अर्थ आहेत. लाल रंग अर्थातच प्रेमाचे प्रतिक आहे तर जांभळा रंग निष्ठा दर्शवते. पांढऱ्या रंगाचे फुल क्षमा मागण्यासाठी वापरले जाते.
 • ह्या फुलांची वेगवेगळ्या रंगाच्या जातींची लागवड केली जाते तेव्हा ते शेत अतिशय सुंदर दिसते. ह्या फुलांचे अनेक रंग असले तरीही त्यामध्ये एक गडद जांभळ्या रंगाचे चमकदार असे विशिष्ट फुल आहे ज्याला ‘क्वीन ऑफ नाईट’ असे म्हणतात.
 • हा जांभळा रंग इतका गडद आहे की तो काळा असल्याचा भास होतो. म्हणूनच त्याला हे विशेष नाव मिळाले आहे. ज्याला पार्किन्सन डिसीज फाउंडेशन ट्युलिपच्या फुलांना त्यांचे प्रतिक म्हणून वापरतात.
 • इतिहासात एक काळ असा होता जेव्हा ह्या फुलांना सोन्यापेक्षा जास्त भाव होता. १६००च्या कालावधीत ह्या फुलांची किंमत सर्व सामन्यांच्या घरापेक्षा अधिक होती.
 • सामान्य लोक एका वर्षात जेवढे कमावत त्याच्या दहा पट भाव ह्या फुलांना होता. म्हणूनच सुमारे १६३४ ते १६३७ च्या कालावधीस ‘ट्युलिप मेनिया’ म्हणून ओळखते जात असे.
 • सतराव्या शतकात ट्युलिप ब्रेकिंग व्हायरस मुळे ट्युलिपच्या कंदांना संसर्ग झाला आणि ट्युलिपच्या फुलांच्या रंगामध्ये व पाकळ्यांच्या आकारामध्ये विविधता निर्माण झाली. ही वेगवेगळ्या रंगछटांची फुले लोकांना खूप आवडली आणि लवकरच प्रसिद्ध झाली.
 • ट्युलिपची फुले केवळ दिसायलाच सुंदर नाहीत तर ती खाण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आलेल्या गरिबीमुळे जेव्हा लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते तेव्हा ही फुले आणि यांचे कंद जेवणात वापरले जात. ह्या फुलांचा वापर कांद्याच्या जागी केला जाऊ शकतो. तसेच ट्युलिपच्या फुलांपासून वाईन देखील तयार केली जाते.

Tulip Flowers Wikipedia Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *