Zinnia Marathi Mahiti

Zinnia Flower Information in Marathi, Favourite Flower Essay झिनिया माहिती

Zinnia Flower Information in Marathi

Zinnia Flower – झिनिया माहिती

  • झिनिया ही सुंदर, विविध रंगी फुले बागेची शोभा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ही फुले सूर्यफुलाच्या वंशातील असून ह्या फुलांच्या जवळपास वीस जाती अस्तित्वात आहेत.
  • ह्या झाडांच्या काही प्रजाती वर्षभर जगतात तर काही अनेक वर्ष जगणाऱ्या असतात. यांच्या सुंदर, आकर्षक फुलांमुळे यांची लागवड बागेत, बंगल्याभोवती शोभा वाढवण्यासाठी केली जाते. ह्या फुलामुळे अनेक सुंदर पक्षी व रंगबिरंगी फुलपाखरे तुमच्या बागेत आकर्षित होतात.
  • संयुक्त अमेरिकेतील दक्षिण प्रांतापासून चिली या प्रदेशापर्यंत याचे मूलस्थान आहे. मेक्सिको मधील झिनिया एलेगंस ही वर्षभर उमलणारी फुले भारतातील बगीच्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात लावली जाते परंतु या फुलांची लागवड व्यापारी तत्वावर फारशी केली जात नाही.
  • झिनीयाचे फुले अतिशय आकर्षक, बहुरंगी आणि टपोरी असतात. यांची लागवड करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते व यांची फारशी निगा देखील घ्यावी लागत नाही.
  • लागवड करण्यास सोपे, जास्त खर्चिक नसलेले आणि फारशे लक्ष न द्यावे लागणाऱ्या झिनियाच्या फुलांचे पीक खरीप हंगामात घेतल्यावर खूप फायदा होऊ शकतो. याचे कारण आहे श्रावण महिना.
  • श्रावण महिन्यात हिंदू संस्कृतीमधील अनेक सण साजरे केले जातात. म्हणून श्रावण महिन्यात वरचेवर होणाऱ्या पूजांसाठी ह्या फुलांना भरपूर मागणी असते.
  • झिनियाची फुले साधारपणे सूर्यफुलासारखी दिसतात. झिनियाची फुले अनेक रंगांची असतात. लाल, पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी व जांभळ्या रंगाची ही फुले विविध रंगाची असली तरी निळा रंग मात्र ह्या फुलांमध्ये आढळत नाही.
  • ह्या सुंदर फुलांना सुगंध मात्र अजिबात नसतो. ह्या फुलांची रोपे झुडूप ह्या प्रकारात येतात आणि ही रोपे ६० ते ७५ सेमी पर्यंत वाढू शकतात. झिनियाच्या बऱ्याच प्रजातीतील रोपे सरळ खोडाची असतात. पाने समोरासमोर असतात आणि खरबरीत व अंडाकृती असून त्यांना देठ नसतो.
  • उष्ण व दमट हवामानात ह्या फुलांचे पीक चांगले येते तसेच पावसाळ्यात देखील यांची चांगली वाढ होते. ह्या फुलांना उन्हाची गरज असते, सावलीतील रोपांना चांगली फुले येत नाहीत.
  • तसेच कडक थंडी देखील झिनीयाच्या पिकाला मानवत नाही. चांगला सूर्यप्रकाश व योग्य हवामान असल्यास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत ह्या फुलांचे पीक घेता येते. बटण झिनिया, गेंदा झिनिया आणि बुटका झिनिया ह्या जाती जास्त प्रसिद्ध आहेत.
  • परंतु ह्या सुंदर फुलांना बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया देखील सोसाव्या लागल्या आहेत. स्पॅनिश लोकांनी जेव्हा मेक्सिको मध्ये सर्वात प्रथम ह्या फुलांना पहिले तेव्हा त्यांनी ह्या फुलांना “माल डे ओहोस” म्हणजे डोळ्यांचा आजार असे नाव दिले होते.
  • त्यांच्या मते ही फुले लहान व अनाकर्षक होती. तसेच ही फुले सहजपणे वाढत असल्याने युरोपीयन लोक त्यांना “गरिबाघरची फुले” किंवा “सामन्यांची फुले” समजत.
  • जानेवारी २०१६ मध्ये नासाच्या काही शास्त्रज्ञांनी अंतराळात वनस्पती उगवण्याचा प्रयत्न केला. झिनियाचे रोप अतिशय संवेदनशील असल्यामुळे ह्या प्रयोगात झिनियाची निवड करण्यात आली.
  • स्कॉट केली ह्या शास्त्रज्ञाने अंतराळात सर्वात पहिले झिनियाचे रोप उगवले आणि कधीकाळी सामान्य समजल्या जाणाऱ्या ह्या फुलाने नवीन इतिहास रचला.

Zinnia Flowers Wikipedia Language

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *