Skip to content

Rafflesia Flower Information in Marathi | Rafflesia Flower Essay | रैफ्लेशिया

Rafflesia Flower Mahiti

Rafflesia Flower Information in Marathi

रैफ्लेशिया फ्लॉवर माहिती

Introduction / परिचय :

 • जगातील सर्वात मोठे फुल अशी ओळख असलेले असे राफ्लेशिया हे फुल आहे. फुल तर फुल असते, मग मोठे म्हणजे असे किती मोठे आहे कि जगामधले सर्वात मोठे फुल म्हणून याची ओळख आहे.
 • आपण आपल्या आसपास अनेक प्रकारची फुले बघत असतो जसे कि जाई जुई, गुलाब आणि आपण बघितलेले सर्वात मोठे फुल म्हणजे सूर्यफूल किंवा जरबेरा. पण हे फुल यापेक्षा थोडेसे वेगळे आहे आणि दिसायला देखील इतर फुलांपेक्षा खूप वेगळे आहे.

Description / वर्णन :

 • राफ्लेशिया हे एक अतिशय भव्य असे फुल आहे, सर स्टॅमफोर्ड रॅफल्स या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या नावावरून रॅफलेसिया हे नाव या वनस्पतीला मिळाले आहे.
 • याचा आकार हा साधारणपणे ३ – ४ फूट व्यास असणारा असतो आणि याचे वजन १० किलोग्रॅम पर्यन्त असू शकते.
 • या फुलाला ५ पाकळ्या असतात आणि मध्यभागी एका मटक्यासारख्या असणाऱ्या एका फुगीर भागावर या ५ मोठ्या मोठ्या पाकळ्या जोडलेल्या असतात.
 • आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि आहे कि अवधी मोठी असणारी हि वनस्पती हि एक परजीवी वनस्पती आहे ज्याला मूळ, कंद, फांद्या असे काहीही नाही आणि अन्नजिवीकेसाठी या वनस्पती इतर वनस्पतींवर अवलंबून असतात. जसे कि बुरशी ला स्वतःचे असे काही नसते आणि ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असते.
 • राफ्लेशिया फुल हे लालसर तपकिरी रंगाचे असते आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. हे फुल एवढे मोठे असते परंतु हे फुल दिसायला सडलेल्या मांसासारखे दिसते आणि यातून येणारी दुर्गंधी देखील तशीच असते म्हणून काही देशांमध्ये मासांचे फुल किंवा प्रेताचे फुल म्हणून अशुभ मानले जाते.
 • इंडोनेशिया देशाचे हे अधिकृत राष्ट्रीय फुलांपैकी एक आहे. मूळचे हे फुल दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळते. सुमात्रा आणि बोर्निओच्या पावसाळी जंगलामधील हे स्थानिक फुल आहे, पावसाळी क्षेत्रामध्येच हे फुल आढळले जाते. या वनस्पतीमध्ये फुल हा एकमेव ठळकपणे ओळखता येणासारखा भाग आहे.

Variety and Classification / जाती आणि वर्गीकरण :

 • रॅफ्लेशिया अर्नोल्डी हि एक अतिशय दुर्मिळ वनस्पती आहे आणि ती शोधण्यासाठी अतिशय कठीण आहे.
 • बाकी सर्व वनस्पतींप्रमाणे या वनस्पतीचे देखील वर्गीकरण होते. रॅफ्लेशिया च्या साधारणपणे २८ प्रजाती आहेत.
 • इतर सर्व फुलांप्रमाणे हे फुल देखील आधी कळी असते आणि नंतर मग फुल उमलते. कळी उमलायला कित्तेक महिने लागतात परंतु फुलाचे आयुष्य ५ – ७ दिवस एवढे कमी असते.
 • राफ्लेशिया जातीतील सर्वच फुले आकाराने मोठी असतात या जातीतील सर्वात लहान फुल जेवणाच्या डिश च्या आकाराचे असते.
 • फिलिपाईन्समध्ये, मलय द्वीपकल्प आणि जावा, सुमात्रा आणि बोर्निओ बेटांवर हि फुले आढळतात आणि तेथील स्थानिक नोटांवर, पिशव्यांवर या फुलाचे चित्र बघायला मिळते. तसेच काही भागांमध्ये तर या वनस्पतीला औषधी गुणधर्म म्हणून देखील ओळखले जाते.
 • आतापर्यंतचे सर्वात मोठे फुल हे ४ फूट व्यासाच्या आकाराचे सापडलेले आहे. यामध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया होऊ शकत नाही तसेच हि फुले एकलिंगी आहेत.

Information of Rafflesia Flower in Marathi / Rafflesia Flower Mahiti Wikipedia

1 thought on “Rafflesia Flower Information in Marathi | Rafflesia Flower Essay | रैफ्लेशिया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *